Jump to content

पान:श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कारभारी पक्षाच्या हकीकती सुद्धां. ( १३ ) शंखध्वनी केली. मग तव्यावरून खाली उतरले. आणि दुखणे लागले. त सेच शिकस्त स्वारी बराबर होते. तो इकडे सवाई माधवराव यांस बारा दिवस जहाले. पाळण्यांत घातले. नांव सवाई माधवराव ठेविलें. आणि गादीवर बसविलें. तो साताऱ्याहून पत्रे व वस्त्रे आली ती पुढे ठेविली. पार्वतीबाई काकू यांनी सवाईचे शिक्के, कटारी, सनदा वैगैरे ठोकिल्या. सनदा व साखरा महालों महाली सरदार व नबाब मोंगल व टिपू सुलतान [ सुद्धां ] सर्वांस पाठविल्या. इकडे दादासाहेब यांस साखरा पाठविल्या. मनांत खुषी जहाली. आणि बातमीदार यानेंही सांगितली. पळोन गेले. दुसरे दिवशीं बापू व हरीपंततात्या फौजे सुद्धां तयार जहाले. तिकडे नबा- ब यांस सूचना केली कीं, तुम्ही तिकडोन यावें आम्ही इकडोन येतो. मध्येच दादासाहेब यांस धरावें. अशी बातमी दादासाहेब यांस समजली. आणि त्याजवरून दादासाहेब ज्या मुक्कामों होते तेथून आणि बापू व हरीपंत तात्या पाठीस लागले. ते पळून ना- शिकास गेले. निजामअल्ली व मोंगल पुढे नाशिकावर सामोरे गेले. साहेब धोडपच्या किल्यावर गेले. पुढे बापू व हरीपंत येऊन पोचले. किल्यांत फितूर करून दादा साहेब यांस 'धैरिलें. मग नबाब यांच्या व राम बापू व हरीपंत तात्या यांच्या भेटी जहाल्या. नबाब यांचा इतमाम बहुत राखला. व त्याच्या जवळ खर्चास राहिले नाही कारणाने मनास आणून जागीर पासष्ट लक्षांची व 'दौलताबादचा किल्ला दिल्हा. आणि मेजवानी केली. नंतर नबाब यांस निरोप दिल्हा. मग दादासाहेब यांस घेऊन पुण्यास आले. आणि वाडयांत बंदोबस्त करून ठेविलें. नंतर बापू व हरीपंत तात्या पुरंधरास गेले आणि कारभार झाडून पुरंधरासच चालू लागला. दादा- आणि सखा- पुढे सहा महिन्यांनी दादासाहेब फितूर करून निघाले. फौज घेऊन हरीपं- त तात्या पाठीस लागले. दादासाहेब हे पळत पळत बन्हाणपुरास गेले. तेथेंही पाठीस लागले. दादासाहेब हे उज्जनीस गेले. तेथे पवार यांचे गांव धारा म्हणोन शहर आहे. तेथे आनंदीबाई प्रसूत नहाली. तो बाजीराव साहेब यांचा जन्म जहाला. मग बारा दिवस जहाल्यानंतर तेथून कूच करून सुरतेस आले. तेथें पंधरा दिवस मुक्काम केला. तो इतक्यांत हरीपंत तात्यांनी फौजेत फितूर केला कीं, दादासाहेब यांस धरावें. तो दादासाहेब व आनंदीबाई साहेब व अमृतराव व बाजीराव साहेव सुद्धां निघून गलबतांत बसून मुंबईस गेले. तो १२. धोडपच्या किल्यांत माधवरावा- च्या वेळी दादांस धरिलें होते. १२. भाऊसाहेबांनी उदगीरची लढाई मारून घेतलेला मुलुख.