Jump to content

पान:श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कारभारी पक्षाच्या हकीकती सुद्धां. ( १५ ) R तरवार चालविली. आणि तोफा बंद केल्या. व तोफांच्या सांखळ्या तोडून वीर आंत मिसळले. तरवार चालविली. नंतर हातघाई झाली. ते समयी इप्रुर फांकडा हा एका झाडावर चढून दुरभिण लावून सरकारचा सरं- जाम पहात होता. तो ते समयी पानशे यांजकडील गोलंदाज उभा होता. त्याची नजर त्या झाडावर गेली. हे पाहून मनांत म्हणतो की, " हा कोणी तरी खांसा आहे. म्हणोन त्याजवर शिस्त धरून लावून तोफेस बनी दिली. त्या गोळ्याने इष्टुर फांकडा इंग्रज ठार जहाला. खांसा पडतांच इंग्रजांचा मोड जहाला. नंतर दादासाहेब पळों लागले. पाटीलबावा व हरोपंततात्या त्या सर्व "" फौजेसुद्धां पाठीस लागले. पळतांपळतां खंडाळे म्हणोन गांव आहे तेथें दादा- साहेब यांस धरिलें. इंग्रजांचे पलटणीची खात्री जहाली. व कांही पलटण राहिली ती पनवेलीस राहिली. मग पाटीलबोवा फौजेसुद्धां कोंकणपट्टी लुटून मागते परत पुण्यास आले. हरीपंततात्या यांणी दादासाहेब यांस धरून नाशि- काजवळ आनंदवल्ली म्हणोन गांव तेथे नेऊन उभे केले आणि गंगेचें उदक हातावर ठेविलें. आणि पुसले की, " नारायणरावसाहेब यांस मारावा ही अक्षरें कोणी घातली तें खरें बोलावे. मग दादासाहेब बोलले की, ' मारावें ' ही अक्षरें बोललो नाहीं व आमचे हातची ही आक्षरे नाहीत. 'धरावें' ह्मणोन लि. हिली. 'ध' चा 'मा' [ कोणीं ] केला. ही बातमी मजला ठाऊक नाही. " अशी आक्षरे बोलले. ते सर्व समजले. मग दादासाहेब यांचा बंदोबस्त करून आनंदवल्लीचे वाड्यांत ठेविलें. आणि दानधर्माचा बंदोबस्त यथास्थित ठेविला. सर्व कारखाने सुरू जहाले. दोन हजार स्वार व पायदळ पांच हजार व हत्ती दहा पंधरा असा सरंजाग कारभारी गोविंदपंत गोडबोळे यांस ठेविले. आणि तात्या निघोन पुण्यास आले. या मंग श्रीमंत सवाईमाधवराव साहेब यांस पर्वतीस आणोन राज्य करूं लागले. मोठया समारंभानें पुण्यास आणिले. पुढे वर्ष सहामाहनें बापू व नाना फडणीस एक विचारें कारभार करीत होते. तो बापूंचे मनांत आले की नानांस व हरीपं. त तात्यांस धरावें. असे मनांत आणून मोरोबा दादा फडणीस यांस सांगून फितूर केला. मोरोबादादानी फडणीशी करावी. आपण कारभार करावा. प्रमाणे फितूर केला. ती चिठ्ठी नानांस सांपडली. त्यावेळेस महादजी शिंदे हिंदुस्थानांत जाण्याकरितां गेले तो नाशिकावर मुक्काम केला. मग नानांनी पाटी- लबावा यांस चिट्ठी पाठविली की, " आपले भेटीचें प्रयोजन आहे, तर लवकर यावे." ती चिठ्ठी पावतांच पाटीलबोवा माघारे परतले. पाटीलबोवा यांचा व नानांचा घरोबा बहुत होता. म्हणोन पाटीलबोवा पुण्यास आले. त्यांजला भेटा-