Jump to content

पान:श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कारभारी पक्षाच्या हकीकती सुद्धां. ( ११ ) राहील तो आजच मेला असे समजावें. " मग बापू बोलले की, " मागची मसलत आम्ही करूं. आम्हांस येथे रहाणें. " तेव्हां मामा बोलले की, " तुम्हांस आम्ही निरोप देववितो. आणि आम्ही येथे रहातो. आम्ही आजच मेलों म्हणून समजावें. परंतु तुम्ही मसलत शेवटास न्यावी. " दुसरे दिवशी बापूंनीं कपाळ बांधिलें. आमांश ज्वर भारी जहाला. आणि निरोप मागूं लागले की, आम्ही पुणे मुक्कामी जातो. बरे जहालों “ आमचे शरीरास समाधान नाही. ह्मणजे येऊं. " मग मामांनी दादासाहेब यांस विनंती केली कीं, " बापूंच्या शरीरास समाधान नाहीं. त्यांस निरोप द्यावा. बरे नहाले म्हणजे येतील, " त्याजवरून दादासाहेब यांणी निरोप दिला. बापू निघोन पुण्यास आले. ब ही 66 नाना फडणीस यांची प्रकृती बिघडली. व हरीपंत तात्या यांच्या पोटांत पोटशूळ उठून फार हैराण जहाले. या प्रमाणे सोंगे करून निरोप मागतात. लबाडी दिसते [ असे दादा बोलले. ] तेव्हां मामांनी उत्तर केले की, “ रडतराव घोड्यावर बसविला असतां तो तरवार मारणार काय आहे ? त्यांचे शरीरास समाधान नाहीं. तेव्हां बराबर घेतल्याचा उपयोग काय ? तर त्यांस निरोप द्यावाच. पुणे मुक्कामी जाऊन आठ चार दिवसांनी बरे जहाले म्हणजे येतील. आम्ही आपले बराबरच आहों. आपण काही काळजी करूं नये. " अशी भुलयाप देऊन मुत्सद्दी यांस निरोप देवविले. ते निघोन पुण्यास आले. दादासाहेब यांस तेथून कूच करून एक मजल पुढे नेले. तेथे शहास गुंतविलें. दहा जण मागे गेले. मग मुत्सद्दी यांणी ताईबाई साठी ही गंगाबाईची आई यांजला बोलावून आणून सांगितलें कीं, “ गंगाबाईस दुखवट्या करितां म्हणून माहेरी आणावी. मग ताईबाई साठी ही वाडयांत जाऊन राजश्री धोंडो खंडाजी कारभारी यांजला मजकूर सांगितला. त्याजवरून कारभारी यांचा निरोप हला. पार्वतीबाई काकू व गंगाबाई यांजला बुरखे बांधून स्वारी ताईबाई साठी यांचे वाड्यांत आली. दोघी- जणी गेल्या हें कारभारी यांजला ठाऊक नाही. तो नारो आपाजी हे पांचरों स्वार बरोबर घेऊन पर्वतीस बसले होते. तो प्रहर रात्रीस साठे यांचे वाड्यापर्यंत येऊन, पुरंदरा पावेतों डांक बसवून, दोघी बायांस पालखीत घालून, मध्यान रात्रीस पुरंदरास घेऊन गेले. मग प्रातःकाळी सखाराम बापू व नानाफडणीस व हरि- पंततात्या वगैरे मुत्सद्दी पळोन गेले. हे वर्तमान कारभारी धोंडो खंडाजी यांस कळले. त्यांनी दादासाहेब यांस कळविले की, दोघी बायांस सर्व मुत्सद्दी मिळोन घेऊन पळोन गेले. मग दादासाहेब यांनी पत्र पाहून त्रिंबकराव मामा यांस बलावून विचारले की, " तुम्ही मुत्सद्दी यांस निरोप देवविले. त्यांनी पाठी मागे