Jump to content

पान:श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १० ) श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर 66 सांगितलें कीं, वकील यांची पत्रे आली आहेत की, “निजाम अल्ली बाहेर निघाले आहेत. पुण्यावर मोहीम आहे. हे वर्तमान काय ? " मग सखाराम बापू बोलले की, " वकील खोटे लिहिणार नाहीं. इकडे येण्याची बातमी खास आहे. त्यांस समजलें असेल म्हणोन लिहिले आहे. आपण काळजी करूं नये. पेशवे यांचे वेळेस मोंगल आले त्यांनी येऊन काय केले ? आपण खांशी स्वारी फौज सुद्धां तयार करून तोंडावर चलावे. विपर्यास दिसल्यास पारिपत्य करूं. काय चिंता आहे ? " असें बापू बोलले. ११ मग हुजुरात मानकरी पन्नास हजार फौज तयार करून दादासाहेब चिरंजीव अमृतराव हे दत्तपुत्र होते ते, आनंदीबाई व सर्व मुत्सदी झाडून [बरोबर घेऊन] गारपिरावर जाऊन उतरले. जिकडे तिकडे सरंजामी व शिंदे होळकर यांस 66 राखावा. पत्रे पाठविली कीं, निजाम अल्लीवर मोहीम आहे. तुम्ही सर्वांनी फौजेनिशी यावे. तो नबाब कूच दरकूच बालेघाटाचे सुमारे आला. तो दादासाहेब कूच करून कोरेगांवचे मुक्कामी गेले. तेव्हां दादासाहेब बोलले की, " पुण्यास बाया घरी दोघी जणी आहेत. पार्वतीबाई व गंगाबाई यांचे रखवाली करितां कोण ठेवावें. कारण गंगाबाई गरोदर तीन महिन्यांची आहे. " मग धोंडो खंडाजी पट्टशिष्य होते. त्यांस मुतालकीचीं वस्त्रे शिक्के कटयार दिल्ही. आणि सांगितले की, तुम्ही पुण्यास जाऊन वाड्याचा बंदोबस्त व शहरचा बंदोबस्त या प्रमाणे सांगितलें. मग धोंडो खंडाजी कारभारी हे निघोन पुण्यास आले. वाडयाचा व शहरचा बंदोबस्त केला. दादासाहेब यांस मुत्सद्दी यांणी पुढे शहास गुंतविले व नबाब यांस मुत्सद्दी यांणी आंतून पत्रे पाठविली की, तुम्हीं बालेघाटावर रहावें. आमचे इकडून जशी पत्रे येतील या प्रमाणे करावें. यावर एक दिवशी रात्री मुत्सद्दी जमले. आणि यांस बापू बोलले की, " आतां बायांची मसलत कशी करावी ? " दोन्ही बाया पुण्याहून पुरंदरास न्याव्यात. तो नारो आपाजी याजकडेस किल्ला आहे. तेव्हां सखाराम बापू यांणी नारो आपाजी यांस सांगितले की, तुम्हांस निरोप देववितों. तुम्ही पुरंदरास जावें आणि किल्यावर बायांस पळवून न्याव्यात. या प्रमाणे विचार करून दादासाहेब यांस मुत्सद्दी यांणी सांगितले की, “ पुरंदरास खाली रामोशांचा फार दंगा जहाला त्यास नारो आपाजी यांस माघारे पाठवावें. म्हणजे नारो बंदोबस्त करतील. त्याजवरून नारो आपाजी यांस निरोप देवविला. ते पुरंदरास आले. दुसरे दिवशी अकरा जण मुत्सद्दी एके ठिकाण जमून विचार केला कीं, " आपल्यांतून दहा जणांनी मागे फिरावें. आणि एकानें येयें 66 आहे. आपाजी ११ रहावें. त्याने मागची मसलत करावी. येथे कोण रहातो ते बोलावे. येथे जो