Jump to content

पान:श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कारभारी पक्षाच्या हकीकती सुद्धां. लौकिक कराल यास्तव रूकार घालतो. परंतु दादासाहेब यांस तुम्ही कसे घराल ?" मामा बोलले की, " रुकार घालावा. मग सांगूं. " नंतर बापूंनी खिजमतगार याजपासून कलमदान आणवून यादीवर रुकार घातला. व गीतागंगाजळी व फुलें, तुळशी, बेलभंडार मामांनी आणवून बापुंचे हातांनी उचलून घेतली. बापू बोलले की, " गंगाजळी सुद्धां जहालो. आतां दादासाहेब यांस कसें धरणार हे सांगावें. " मग मामा बोलले कीं, आजच तुम्ही पुसूं नये. आमची मसलत जेयें होईल तेथें उदईक आपणांस बोलावणे येईल. तेथें यावें म्हणजे उत्तर सांगूं. १ इतके बोलले व मामा घरी निघोन गेले. ही बातमी दादासाहेब यांस काहीच लागली नाहीं. हा आणि दुसरे दिवशी रात्री नानांचं वाड्यांत अकराजण जमले आणि बापूंसही बोलावणे पाठविलें. आणि बापूही आले. नंतर मनसोबा केला कीं, दादासा- हेब वाडयांत सांपडणार नाहीत. बापू बोलले कीं, बाहेर काढिले पाहिजेत. आणि हैदराबादेस निजाम अल्ली मोंगल याची दोस्ती बंधूप्रमाणेच होती, त्यास पत्रे लिहिली की, “ दादासाहेब यांणी नाराणराव साहेब यांस ठार मारिलें. पुत्र त्या नानासाहेब यांचा मारला नाहीं, तुमचा मारला, असे समजावे. लाख फौज घेऊन आपण पुण्यावर यावें. " याप्रमाणे त्यांस पत्रे लिहावी. म्हणोन बोलिले. ही मसलत अवध्यांचे मनास आली. मग गंगाभागीरथी पार्वती- बाई काकूसाहेब यांचे नांवची पत्रे मोंगलास एक [ ब ] पेशवे यांजकडील वकील राजश्री कृष्णराव काळे यांस एक अशी पत्रे लिहिली. वकील यांचे पत्रांत लिहिले की, "नबाबास दर कुचास लाख रुपये कबूल करून लाख फौज बाले- घाटाचे सुमारे घेऊन यावें. " या प्रमाणे दोन पत्रे लिहिली. रातोरात लखोटे रवाना केले. दररोज वाड्यांत येऊं जाऊं लागले. सबब आम्हांस जरूर जाण्याची. याजवर महिना पंधरा दिवशी जासुदाने दाखल केली. वकीलाने पत्र पाहून निजाम अल्ली यांस पाठविले, मग नबाब बोलले कीं, " नानासाहेब याचा मुलगा मारला नाहीं. आमचा मुलगा मारिला. याजवरून नबाब याणे आपली लाख फौज पुण्यावर तयार करून बाहेर डेरे दिले आणि उतरले. मग कृष्णराव काळे वकील यानें दादासाहेबांस पत्र लिहिले, " निजाम अल्ली आपलेकडेस लाख फौजेनिशी निघणार आहे. मोहीम आहे. " आंतून पत्रे मुत्सदी यांस पत्रे निराळी व सरकारांस निराळी. या प्रमाणे पत्रे लिहीत गेले. दादासाहेब यांस दाखल केली. पुण्यावर एका महिन्यांनी वकील यांची पत्रे घेऊन पुण्यास दादासाहेब यांणों पत्रे वाचून पाहून सखाराम बापू व त्रिंबकराव मामा व नाना फडणीस, हरिपंत फडके यांस बलावून आणून