Jump to content

पान:श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८) श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर 66 99 66 66 मेस कसा येईल? मामा आमचे वाड्यांत कधी येणार नाहीत. पुन्हा " पहारेकरी बोलले की, " आपण म्हणतां खरें पण मामा खाली उभे आहेत. " इतकें ऐकून बापू दिवाणखान्यांतून उठोन धांवत आले. तो मामांनी नमस्कार केला. मग बापू म्हणों लागले की, "मामा, सूर्योदय पूर्वेचा पश्चिमेस कसा उगवला ! मग मामांनी उत्तर केले की, “ ईश्वर कृपेचा खेळ कोणास समजण्याचा नाही. कांहीं काळे करून पश्चिमेसही सूर्योदय होईल यांत संशय नाहीं. ही ईश्वरी माया कोणास समजण्यासारखी नाही. आम्ही आलो खरे. तुम्हांशी चार गोष्टी बोला- बयाच्या आहेत. एकांत स्थळी मक्षिकेचा सुद्धां प्रवेश नाहीं तेथें चलावें. " मग बापूंचा हात धरून दिवाणखान्यांतून खोलीत गेले. मग मामा बोलिले की, “ आम्ही तुम्हापाशी मागणे मागावयासि आलो आहोत. मागूं ते बक्षीस द्यावे. " मग बापू बोलले की, बक्षीस मागावयाची गोष्ट निटोप्याची असल्यास बक्षीस आहे. " तर याप्रमाणे वचन द्यावे. थोरांचें वचन पाहिजे. थोर आहेत ते वच- नाचे बेवचन करीत नाहीत." मग बापूंनी वचन दिल्हें. मग मामा बोलिले की, " दुसऱ्याच गोष्टी बोलावयच्या आहेत. आपणास ग्रहण करावयाचे अस ल्यास करावें. नाही तर आम्ही बोललों नाहीं व तुम्हीं ऐकिले नाही. या गोष्टीचे वचन असावें. " मग बापू बोलले की, " आम्हांस ग्रहण जहाल्यास करूं. नाहीं तर आम्ही कांहीं ऐकिले नाहीं. " याप्रमाणे दुसरे वचन दिले. मग मामा बोलले की, " ही याद आणिली आहे ती वाचून पहावी. मग बापूंनी याद पुढे वाचून पाहिली आणि बोलले कीं, " तुम्ही काय बोलतां?" त्रिंबकरावमामा बोलिले की, " या यादीवर रुकार घालावा. " तेव्हां बापू बोलले की, " आम्ही रुकार कसा घालावा ? आम्ही दादासाहेब यांजकडील. तुम्ही आम्हांस वचनांत घेऊन फसविलें. आमचे ध्यानांत हा मजकूर काहीच नाही. " इतकें बोलोन पावघट- कापर्यंत उगीच बसले. मग मामांनी उत्तर केले की, " आपली मर्जी असल्यास रुकार घालावा. आमचा आग्रह नाही. याद फाडून टाकितों. आणि आपले घरास जातो. आमचा तरी काय खोळंबा आहे ? आम्ही काही बोललो नाही व तुम्ही कांही ऐकिलें नाहीं. परंतु बोलतों तें ऐकावें. बापूनी वचनाचे बेवचन केले असे होईल. थोरास वचनांत धरावे. तुम्हीं वचन दिल्हें कीं, मागाल तें देईन. याप्रमाणे करार केला, तर रुकार घालावा. 39 मग बापू बोलले की, "आम्ही दादासाहेब यांजकडील आहो तर रुकार कसा घालावा ?" मग मामा बोलले की, “तुम्ही दादासाहेब यांजकडील आहां म्हणोनच रुकार पाहिजे. आम्हांस अकराजणांस मसलती करितां येत नाहींत की काय ? " मग बापू बोलले की, " वचनाचें बेवचन केले तर बापूंचे बोलण्याचे प्रमाण नाही. असा 66 99