Jump to content

पान:श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर लहानपणापासून नारायणराव साहेब यांचा लाड बहुत करीत होती. याचे कारण की, भाऊसाहेब हे गिलच्यांचे लढाईत गर्द जहाले म्हणोन त्यांची स्त्री पार्वतीबाई पोटी संतान नाही म्हणोन बहुत श्रमी होऊं लागली. याजक. रितां नानासाहेब यांणी सांगितले, " तुम्ही कष्टी होऊं नये. नारायणराव साहेब हा तुमचा मुलगा ! याचे संरक्षण तुम्ही करावें. सर्व राज्यकारभार तुमचा आहे. " म्हणोन पार्वतीबाईकाकू बहुत विचारवंत होती. नंतर त्रिंबकराव मामांनी झोळा करून नारायणराव साहेब यांचा मुर्दा घालून तेलंग यांच्या खांद्यावर देऊन बाहेर काढिला. पूर्वी मुत्सद्यांनी सर्व तयारी करून बसले होते. मग सर्वांनी मिळोन साहेब मजकूर यांचे दहन केले. दादासाहेब गादी सोडून दूर बसले. सुतक धरिलें. नंतर मग दुसरे दिवशी सर्व मुत्सद्दी येऊन दादासाहेब यांस भेटले. दादासाहेब यांणी बारा दिवस जहाल्यावर मग दादासाहेब कारभार करूं लागले. दादासाहेब यांणी वेदशास्त्र संपन्न राजमान्य रामशास्त्री यांस बोलावून विचार केला की, " कांही संगतीच्या योगे करून मजवर अभिश्राप व जन होऊन अपकीर्ति जहाली की, निमित्य आले. आतां याचे प्रायश्चित काय ?" त्याजवरून शास्त्रीबोवा यांणी साफ उत्तर केलें कीं, एतद्विषयों प्रायश्चित दुसरे नाहीं. देहांत [ प्रायश्चित्त ] आहे. " याप्रमाणे बोलोन कुटुंबसुद्धां पुण्याहू- न निघोन बाईक्षेत्रापासोन तीन चार कोसांवर भुगावीं कृष्णा तीरी स्नानसंध्या- दिक षट्कर्मे करून राहिले. 99 1 नंतर दादासाहेब यांणी दोन महिने कारभार केला. गंगाबाईसाहेब गरोदर खरी, त्याजवरून आनंदी बाईसाहेब यांणी सातखणीत गंगाबाई व पार्वतीबाई यांचा बंदोबस्त करून ठेविल्या. एक दिवशी नानाफडणीस सातखणी वरून गणेश दरवाज्याकडेस जात होते. तो गंगाबाई व पार्वतीबाई काकू सातखणी- च्या खिडकीत उभयत बसल्या होत्या. त्यांणी फडणीस यांस खुणावून जवळ बोलाविलें. आणि पार्वतीबाईनें सांगितलें कीं, " गंगाबाईस दोन महिने होऊन तिसरा महिना लागला आहे. हिच्या पोटी अवतार होईल. आतां तुम्ही चार मुत्सदी आहां. याचा विचार करावा. नानांनी विनंती केली 99 66 99 की, " कोणता विचार करावा ! मग पार्वतीबाई काकू बोलिल्या की, 'दादासाहेब यांस धरावयाचा मनसोबा करावा. हे ऐकून नानांनी विनंती केली की, “ आम्ही या मनसोब्यांत आहोत व आपलीही आज्ञा होत आहे. त्यापेक्षां याचा विचार होईल. " अशी विनंती करून लौकर बाहेर निघोन गेले. त्या वेळेस पहारेकरी कोणी जवळ नव्हते. नाना वाड्यांत जाऊन तेच