पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपोद्धात. पुढे शरीरांतील पुरुष, कामपुरुष, आदित्य पुरुष, बुद्धिपुरुष, छायामयपुरुष, अक्षिपुरुष, आपपुरुष, पुत्ररूपपुरुष, अशी त्याच देवाची रूपें आहेत असें सांगितलें. मग शाकल्यानें प्रत्येक दिशेला कोण कोणते पुरुष आहेत हे विचारल्यावरून प्राची दिशेला आदित्यपुरुष, दक्षिणदिशेला यज्ञपुरुष, प्रतीची दिशेला आपपुरुष, उत्तर दिशेला सोमपुरुष, ऊर्ध्व दिशेला अग्निपुरुष असून, ते सर्व मनुष्याच्या हृदयांत राहतात, असे सांगितलें. एवढे मोठें मनुष्याचें हृदय कोणावर अवलंबून आहे, असा शाकल्यानें प्रश्न केल्याबरोबर याज्ञवल्क्य रागावला. हें ठीकच आहे. कारण मनुष्याच्या बुद्धिद्वारें सर्व तत्वांचें ज्ञान होत असून, मनुष्याची बुद्धि आत्म्यावर अवलंबून आहे, हे उघड आहे. याज्ञवल्क्यानें क्रोधाविष्ट होऊन उत्तर दिलें कीं- अरे नीच शाकल्या हें हृदय आत्माश्रयकरून नसते तर, ह्याला कोल्हीं कुत्रीं खाऊन जातीं; व गिधाडें फाडून खातीं. त्यावर शाकल्यानें पुनः प्रश्न केला कीं, अरे किंवा तुझा आत्मा कशावर अवलंबून आहांत ? उत्तर-प्राणावर अवलंबून आहे; प्राण अपानावर, अपान व्यानावर, व्यान उदानावर, उदान समानावर, समान वायूवर, ह्या प्रमाणें उत्तरापाठी मागून उत्तर दिलें; व शेवटी असें सांगितलें की, मुख्य तत्व आत्मा आहे; तो अतीन्द्रिय, अप्रमेय, अविनाशी, असंग, अबद्ध, व्यथारहित, व दुःखरहित आहे. एकंदरींत याज्ञवल्क्यानें आठस्थानें, आठलोक, आठदेव, आठपुरुष, सांगितलें, ते सर्व जाणून जो त्यांच्या पलीकडे जाईल तो उ निषर्णित पुरुष होय. असे सांगून शाकल्याला अशा अडचणींत घातला कीं, तूं तो सर्व श्रेष्ठ पुरुष न सांगशील ( न समजशील ), तर तुझें डोके तुटून पडेल. शाकल्य अत्यन्त मद्भरित अस- ल्यामुळे त्यास ही दहशत दिली; पण त्यानें परमपुरुष समजून न घेतल्यामुळे त्या दहश- तीनें त्याचें डोकें खरोखरी तुटून पडलें; व त्याचे शिष्य त्याच्या अस्थि घेऊन जात असतां तें अस्थीचें गाठोडें चोरांनी नेलें, अशी त्याची दुरवस्था होण्यास त्याचें अज्ञान कारण झालें. ढ त्यानंतर याज्ञवल्क्यानें बाकींचे ब्राह्मणांस तुझी कोणी तरी मला झटलें, पण कोणाचेंही धारिष्ट झाले नाहीं; तेव्हां त्यांस अगदी बालबोध जगाचें मूळ-उत्पादक तत्त्व-काय आहे हे सांगितलें. पाहिजे तें विचारा असें रीतीनें सात लोकांनी