पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपोद्धात. ब्राह्मण ७. 3 मग आरुणि उद्दालकानें काप्य पतंचलऋषीच्या बायकोच्या अंगातल गन्धर्वानें सांगित- लेल्या सूत्र व अन्तर्यामी या तत्त्वांच्या ज्ञानाविषयीं याज्ञवल्क्यास प्रश्न केला. त्यावरून माळें- . तील मण्यांनां धरणारें सूत्र असतें, त्याप्रमाणें सर्व जगांतील भिन्न भिन्न वस्तूंना एकत्र धरणारें · वायुरूप सूत्र आहे, असें याज्ञवल्क्यानें सांगून अन्तर्यामी आहे तो कोण? ह्या प्रश्नासंबंधानें सांगितलें की, पृथ्वी, आप, अग्नि, अन्तरिक्ष, वायु, द्युलोक, आदित्य, दिशा, चन्द्रतारका, आकाश, अंधकार प्रकाश ह्या देवतात्मक विभूति व भौतिक पदार्थ, व शारीरिक वस्तु झणजे प्राण, वाणी, चक्षु, श्रोत्र, मन, त्वचा, जीवात्मा (विज्ञान), रेत, इत्यादिकांच्या आंत राहून, आंतून त्यांचें नियमन करितो; परंतु त्यांस ज्याची ओळख पटत नाहीं, तो अन्तर्यामी अन्तरात्मा हाये. ब्राह्मण, वाचक्नवी गार्गीनें इतर सर्व ब्राह्मणांच्या अनुमतीनें पुनः दोन प्रश्न केलें. त्यापैकी प्रथम प्रश्नास उत्तर दिलें कीं, जें तत्व पृथ्वीच्या खालीं, आकाशाच्यावर, व द्यावापृथ्वीरूपानें, भूत वर्तमान भविष्यरूपानें नांदत आहे, तें आकाशस्वरूपांत ओंवलेलें भरलेलें आहे. त्यावरून गार्गीनें दुसरा असा प्रश्न केला कीं, तें आकाश कशांत गोंवलेलें आहे ? याज्ञवल्क्यानें उत्तर दिलें कीं, तें अक्षरतत्वांत गोंवलेलें आहे, आणि अक्षर तत्वाचें निषेधरूप शब्दांनीं वर्णन केलें. अक्षर स्थल नाहीं, सूक्ष्म नाहीं, आंखूड नाहीं, लांब नाहीं; आरक्त नाहीं, स्निग्धता नव्हे; छायारूप नाहीं, तमोरूप नाही वगैरे. त्याच अक्षराचें सत्तास्वरूपानें असें वर्णन केलें कीं, सूर्य, चन्द्र, द्यावा- पृथिवी, मेषोन्मेष, तास, दिवस, रात्र, मास, पक्ष, ऋतु, संवत्सर वगैरे कालमानें त्याच्या हुकुमानें चालली आहेत. त्याच्या हुकुमानें पूर्ववाहिनी, पश्चिमवाहिनी, दक्षिणोत्तरवाहिनी सर्व नद्या आप- आपल्या दिशेला वाहत जातात. त्याच्या हुकुमानें देव यज्ञाची, व पितर श्राद्धहोमाची आशा करून असतात. असें सर्वांचें प्रशासन करणारें तें अक्षर आहे. तें दिसत नसून पाहणारें, एकू येत नसून ऐकणारें, मनन करितां येत नसून मनन करणारें, ओळखतां येत नसून सर्वस ओळखणारें आहे. त्याहून दुसरें कोणी पाहणारें, ऐकणारें, मननकरणार, जाणणारें नाहीं. हें ऐकून वाचक्नवी गार्गी स्तब्ध झाली. ब्राह्मण ९. अश्वलप्रभृति गार्गीपर्यंत कर्ममुक्ति, प्रहमुक्ति, पारिक्षितमुक्ति, सर्वान्तरआत्मा, एषणात्याग, अक्षर, सूत्र, अन्तर्यामी, प्रशास्त्र अक्षर, ह्या तत्त्वांविषयीं यशवल्क्याशीं विवाद झाल्यावर, त्याला विदग्ध शाकल्यानें देव किती आहेत ? असा प्रश्न केला. त्यासंबंधानें तीन हजार तीनशेंसहा देवांच्या विभूति आहेत; त्यांत मुख्य-आठ वसु, अकरा रुद्र, बारा आदित्य, व इंद्र आणि प्रजापति मिळून तेहतीसच आहेत. इंद्र ह्मणजे पर्जन्य देवता; व प्रजापति ह्मणजे यज्ञ देवता; असें सांगि- तलें. त्या तेहतीसांची निवड करितां सहाच देव राहतात; त्यांत तीन मुख्य-त्यांत प्राण देवता सर्वांचे अभिवृद्धीला कारण आहे झणून ती मुख्य, व शेवटीं ब्रह्मसंज्ञेनें एकच देव आहे असे सांगितलें.