पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

॥ श्री बृहदारण्यकोपनिषद | -मुनिकांड- ( जनकसभेत अनेक ऋषींचा याज्ञवल्क्याशीं झालेला तत्वविषयक बाद किंवा जल्प ) अश्वलब्राह्मण मृत्युमुक्ति-अतिमुक्ति. अध्याय ३ ब्राह्मण १. श्रीपरमात्मने नमः ॥ हरिः ॐ ॥ ऋचा १ – वैदेह जनकानें बहुदक्षिण यज्ञ केला. त्यांत कुरुपंचाल देशांतील ब्राह्मण गोळा झाले. त्या वैदेह जनक राजाला या ब्राह्मणांमध्ये मोठा पढीक विद्वान कोण ? असें जाणण्याची इच्छा झाली. नंतर त्यानें ( एका गोठ्यांत ) एक हजार गायी बांधल्या; व प्रत्येक गायीच्या शिंगांस दहा दहा (सोन्याचे) पाद (तोळे) बांधले. भाष्य – ( उपोद्घात ) – 'वैदेह जनकानें' इत्यादि (श्रुतीनें ) याज्ञवल्क्यकांडाचा ( मु निकांडाचा ) आरंभ केला आहे. (हें कांड ) उपपत्तिप्रधानं असल्यामुळे मागील मधुकांडांचा व ह्या कांडाचा विषय एकच आहे तरी, पुनरुक्ति दोष येत नाहीं; कारण, मधुकांड श्रुति- प्रधान आहे. आत्मा एकच आहे हें समजावण्यास श्रुति आणि उपपत्ति ही दोन्ही असतील तर ती तें तळहातावरील बेलफळाप्रमाणें ( स्पष्ट ) दाखवूं शकतात. (आत्म्याचें ) “श्रवर्णं करावें, मनन करावें " असे सांगितलें आहे. त्याकरितां श्रुतिगत अर्थाचाच युक्तीनें निश्चय करण्याक- रितां (हें ) उपपत्तिप्रधान याज्ञवल्क्यकांड आरंभिलें आहे. १ --ज्यांत पुष्कळ दक्षिणा दिली जाते असा, किंवा अश्वमेध. २ --ज्यांत उपपत्ति झणजे युक्ति अथवा तर्क ह्यांची मुख्यत्वें योजना असते. ३ -- अध्याय २, ब्राह्मण ५ यांत आत्मा सर्व भूतांस मध आहे ( ऋचा १४ ) अर्से सांगितलें आहे. त्या ५ व्या ब्राह्मणाला मधुकांड ह्मणतात. ४ – " [ आत्मावा अरे द्रष्टव्यः ] श्रोतव्यो मन्तव्यः " बृह. २-४-५ ४-५-६ 33