पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८० बृहदारण्यकोपनिषद. [ अ. ३ ब्रा. ९ " संर्वज्ञ व सर्व जाणणारा आहे " " सर्व इष्ट फलें भोगितो ” इत्यादि श्रुतीवरून मोक्ष स्थितींत जाणण्यासारिखें ( संवेद्य ) सुख आहे, असें (होतें. ) शंका- (ब्रह्म) एकरूप घेतलें ह्मणजे क्रिया साधनांचा (कारकांचा ) (ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान) असा विभाग पडत नाही; ह्मणून ज्ञान होण्याचा संभव नाहीं; कारण विज्ञान ही क्रिया आहे, आणि प्रत्येक क्रियेला अनेक क्रियासाधनें लागतात, ( असा दोष येईल; पण ) हा दोष येत नाहीं. वैदिकवचनें प्रमाणभूत असल्यामुळे आनंदरूप ब्रह्माचें विज्ञान होत असेल. तें विज्ञानरूप व आनं- दरूप आहे; इत्यादि वेदवाक्यें ब्रह्माची आनंदरूपता जाणण्यायोग्य नसती तर अयोग्य होतील, असें आह्मी ह्मटलेंच. समाधान-पण, अग्नि थंड आहे, व उदक जात्या ऊष्ण आहे असें वचन असले तरी, अग्नि थंड व उदक ऊष्ण असू शकत नाही. कारण (वस्तुधर्म) जाणवण्याचा मात्र वाक्यामध्ये गुण आहे. देशांतरामध्यें अग्नि थंड असतो, किंवा जेथें जातां येत माहीं अशा अन्य देशांत उदक ऊष्ण असतें, असें वाक्यांनीं जाणवणे शक्य नाहीं; ( अशी ) शंका येईल, तर ती शंका नाहीं, कारण, प्रत्यगात्मस्वरूपामध्यें आनंद व ज्ञान प्रत्यक्ष आहे; तें विज्ञानरूप व आनंदरूप आहे; इत्यादि वाक्यांमध्यें अग्नि शीत आहे वगैरे वाक्याप्रमाणे प्रत्यक्ष ज्ञानाला विरुद्ध अर्थ दाखवि- प्याचा धर्म नाहीं. त्यांचा अर्थ प्रत्यक्षाला अनुरूप आहे असें अनुभवास येतें. मीं सुखी आहे असा आपला सुखीपणा आपण होऊनच कळतो. त्यावरून ती वाक्यें अत्यंत प्रत्यक्षानुरूप आहेत; ह्मणून ब्रह्म आनंदरूप व विज्ञानरूप असून आपण होऊनच कळतें. अशा रीतीनें आनंदवर्णणाऱ्या " खातो, खेळतो, रमतो " वगैरे पूर्वोक्त श्रुति अन्वर्थ होतील. सिद्धांत-(हें कांहीं खरें) नव्हें. देह किंवा इंद्रियें यांच्या अभावीं (आंनदाचे वगैरे) ज्ञान होतें असें ह्मणतां येत नाहीं. शरीराचा (अगदी) वियोग होणें हाच शेवटचा मोक्ष. आणि शरीराभावीं इन्द्रियें असूं शकत नाहींत; कारण त्यांस रहाण्यास जागा नसते. आणि मग देह व इंद्रियें नसलीं ह्मणजे विज्ञान असू शकत नाहीं; आणि देहाद्यभावीं विज्ञान उत्पन्न होतें असें ह्मणावें ह किंवा इंद्रियें घेण्याचें मुळींच कारण नाहीं असें येऊं लागेल. शिवाय ( ब्रह्माच्या ) एकत्वास बाध येऊं लागेलः श्रेष्ठ ब्रह्म आनंदरूप असल्यास, नित्य विज्ञानरूप असल्यामुळें (आत्म्याला ) नेह- मी जाणीलच, ( असें ह्मणाल तर तसेंही ह्मणतां येत ) नाहीं. संसारी मनुष्य घेतला तरी संसा- रांतून मुक्त झाला आहे, असें ह्मटलें ह्मणजे) तो स्वस्वरूपाप्रत पावणार. तळ्यांत ओंजळभर पा- णी टाकिलें तर तें पृथक् रहात नाहीं; ( त्याप्रमाणें मुक्त मनुष्य ) आनंद स्वरूप ब्रह्म जाणण्याला (पृथपणें राहू शकत नाहीं.) त्या स्थितीत मुक्त आपल्या आनंदरूप आत्म्याला जाणतो हैं ह्मणणें व्यर्थ आहे. आतां पृथक् राहून माझा आत्मा आनंदरूप आहे, असें जाणतो असें ह्मणावें तर (ब्रह्म) एक आहे, या सिद्धांताला विरोध येतो; आणि तसें घेतलें ह्मणजे सर्व श्रुति परस्पर विरुद्ध होतात. १ – “ स सर्वज्ञः सर्ववित्. " मुंडक १-१-९ न्यास १-१-९. २ – “सर्वान् कामान् समश्नुते." छा. ७-१०-२ तैतिरीय. २-५-१, ३ - स्थूलसूक्ष्मादि शरीरांचा अगदीं वियोग होणें याचें नांव मोक्ष.