पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. २८] शारीरक. हैं दाखविण्याकरितां दोन विशेषणें दिली आहेत. 'राति' ह्मणजे धन (धनदान ) हें मुळातील प्रथमारूप षष्टयर्थी आहे. ते धनाच्या दात्याचें-कर्मकर्त्या यजमानाचें- (शेवटचें) कर्मफल देणारें उत्तम स्थान आहे. शिवाय (त्रिविध ) एषणांतून उठून जाऊन त्या ब्रह्मांतच जो कर्म न करतां राहतो तो तें ब्रह्म जाणतो, ह्मणन तन्निष्ठ तद्विदाला तेंच उत्तम स्थान होय. ह्या ( ऋचेच्या ) संबंधानें पुढील विचार ( लक्ष्यांत घ्यावा. ) आनंदशब्द लोकांमध्यें सुखवाचक प्रसिद्ध आहे, पण ह्या स्थळी आनंदशब्द ब्रह्माचें विशेषण ह्या स्वरूपानें श्रुत आहे, व आनंद तेंच ब्रह्म ( असें झटलें आहे ). अन्य श्रुतीतही "आनंद तें ब्रह्म असें त्यानें जाणिलें." " ब्रह्मांचा आनंद जाणणारा " " ज्यो अर्थी हें आकाश आनंदरूप होणार नाहीं " " जो भूमा तेंच सुख (आनंद) " " हाँच श्रेष्ठ आनंद ” इत्यादि श्रुति आहेत. जें सुख जाणिलें जातें त्याला आनंद ह्मणण्याचा प्रचार आहे. ब्रह्मानंद जर जाणण्यासारखा असेल तर हा आनंद शब्द ब्रह्मास लावणे योग्य होईल. श्रुतिप्रमाणावरून ज्ञेय आनंदरूप ब्रह्म आहेच तर, त्याबद्दल काय विचार करावयाचा आहे ? ( अशी शंका आल्यास तसें ) नाहीं; कारण विरुद्ध श्रुतिवाक्यें आढळतात. आनंद शब्द ब्रह्माला जोडलेला असतो, ही गोष्ट खरी; आणि ब्रह्म एकरूप घेतलें ह्मणजे तें विज्ञानरून आहे, असें ह्मणतां येत नाहीं. “ पण जेव्हां यांचें सगळें आत्मरूपच झाले तेव्हां कोणी कोणाला पहावें, वं कोणी कोणाला जाणावें, " " जेव्हां तो दुसरें कांहीं पहात नाहीं, दुसरें कांहीं ऐकत नाहीं, दुसरें कांहीं जाणत नाहीं, (तेव्हां ) तो भूमाँ (महत्तम ह्मणावा)" "विज्ञानस्वरूप आत्म्यानें वेष्टिला गेला ह्मणजे बाहेरचें कांहीही तो जाणत नाहीं. " इत्यादि विरुद्ध श्रुतिवाक्यें सांपडतात. त्याव- रून विचारकरणें अवश्य आहे. वेदवाक्यांच्या अर्थाचा निर्णय करण्याकरितां ह्मणून, आणि मोक्षवाद करणाऱ्यांत विप्रतिपत्ति (विवाद ) आहे ह्मणून, विचार करणे योग्य आहे. सांख्यां पैक व वैशेषिकांपैकीं मोक्षवाद करणारे मोक्षस्थितीमध्यें जाणण्यासारखा (संवेद्य ) आनंद नाहीं, असा पक्ष घेऊन बसले आहेत. इतर वादी (आत्म्याला) अत्यंत आनंद स्वसंवेद्य आहे असें ( ह्मणतात. ) आनंद वगैरे श्रुत असल्यामुळे यां पैकीं योग्य पक्ष तो कोणता ? " खोतो खेळतो मौज करतो " 'तो जर पितृलोकाच्या इच्छेनें युक्त होतो " " तो १ - आनंदो ब्रह्मेति व्यजानात् । तैतिरीय ३-६-१. २ - आनंदं ब्रह्मणो विद्वान् । तैतिरीय २-९-१, २-४-१. ३ – यदेष आकाश आनंदो न स्यात् । तैतिरीव २-७-१. ४- यो वै भूमा तत्सुखम् । छां. ७-२३-१. ५ – एष परम आनंदः । बृ. ४–३–३३. ६ – यत्र त्वस्य सर्वमात्मैवाभूत्तत्केन कं पश्येत् । वृं. ४-५-१५. ७—“ तत्केन कं विजानीयाद्यत्र नान्यत्पश्यति नान्यच्छुणोति नान्यद्विजानाति स भूमा " ८-" प्राज्ञेनाऽऽत्मना संपरिष्वक्तो न बाह्यं किंचन वेद " बृ. ४-३-२१. प्रमाणः” छां. ८-१२-३. १० - "स यदि पितृलोककामो भवति" छां. ८- २१.