पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. २८. ] शारीरक. ( मुक्त ब्रह्माहून भिन्न आहे व अभिन्नही आहे अशी ) तिसरी कल्पना योग्य नाहीं. ब्रह्माला निरंतर ( एकसारखें ) आत्मानंदविज्ञान आहे, असें ह्मटलें असतां, ( केव्हां ) विज्ञान असते व ( केव्हां ) विज्ञान असत नाही, ही कल्पना व्यर्थ होईल. आत्मानंदाविषयीं ब्रह्माला निरंतर एकसारखें ज्ञान असणे हाच ब्रह्माचा स्वभाव आहे तर तें आनंद जाणतें अशी कल्पना अयोग्य होईल; यथार्थ असते. (कोणी मनुष्य) कारण ) आनंदाचें ज्ञान होत नसतें त्या प्रसंगीच ती कल्पना आपणाला जाणतो, व दुसन्यालाहि जाणतो असें (पृथक् बुद्धि व पूर्वी अज्ञान असतें ह्मणून ) ह्मणतात. बाणावर वगैरे ज्याचें मन ( एकसारखें ) चिकटलेले आहे, ( बाण व आपण जणूं एकच झाला आहे, ) त्याला बाणाचें ज्ञान आहे, किंवा नाहीं अशी कल्पना करणे यथार्थ होत नाहीं. ज्याला खंड आहे अशा आत्मानंदाला तो जाणतो, (असें ह्मणावें ) तर आत्मविज्ञानाला खंड झाला असतां, दुसरा विषय ज्ञानछिद्रामध्ये घुसण्याचा प्रसंग येईल; आणि आत्मा स्वस्वरूप बदलतो असे होऊन तो विकारयुक्त अनित्य नश्वर आहे असें ह्मणण्याचा प्रसंग येईल. ( हे सर्व दूर करावयाचें ) ह्मणून ब्रह्म विज्ञानरूप व आनंदरूप आहे हें श्रुतिवाक्य ब्रह्माचें स्वरूप वर्णन करण्यापुरतें आहे. ब्रह्मानें आत्मानंद जाणण्यासारखा (संवेद्य ) आहे अशा अर्थाचें नाहीं. तो 'खातो खेळतो' वगैरे श्रुतिवाक्यांशी विरोध येईल असें ह्मणाल तर, नाही. कारण, ब्रह्म सर्वात्मक असल्यामुळे जसें लक्षांत येईल तसे वर्णन करणारी ही अति आहे. मुक्ताचा सर्वात्मपणा गृहीत झाला ह्मणजे कोठें योग्यांमध्ये किंवा देवांमध्ये असतांनां खाण्याचें वगैरे घडतें, त्या प्रमाणे त्याचें वर्णन करितात. आणि मुक्त पुरुष सर्वात्मा असल्यामुळे सर्वात्मरूप मोक्षाची स्तुति करण्याकरितां असें ह्मणतात. जसा प्रसंग पडेल तसें ह्मणण्यात येतें; हा पक्ष घेतल्यास ह्याजकडे दुःखीपणाही येईल. योग्यांमध्यें खाणें वगैरे असतें त्याप्रमाणें स्थावरामध्ये असतांना दुःखीपणाही प्राप्त होईल, असें ह्मणाल तर नाहीं. सुखीपणा व दुःखीपणा वगैरे विशिष्टस्थितनामरूपें दिलेल्या देहे- न्द्रियांच्या उपाधीपासून भ्रांति उत्पन्न होते, त्या भ्रांतीमुळे आरोप केला जाऊन ती उत्पन्न होतात, असें ध्यानांत आलें ह्मणजे सर्व शंकांचा परिहार होतो. परस्परविरुद्ध श्रुतींनीं काय दर्शविलें जातें हैं आह्मी ( पूर्वी ) सांगितलेंच आहे. ह्या कारणाकरितां " ह्याचा हा श्रेष्ठ आनंद श्रुतीप्रमाणे सर्व आनंदद्वाक्यें आहेत असें जाणावें. " ह्या अध्याय ३ समाप्त. १ –' जाणते' ह्मणणें आनंद न जाणण्याचा प्रसंग पडतो ह्मणून यथार्थ होतें. २ – बुद्धितत्व पृथक् कायम असतें व तद्वारा ज्ञान होत असतें तोपर्यंत मी अमूक व दुसरा अमूक न्य ज्ञान होते. एरव्ही होत नाहीं; त्या प्रसंगी जाणतों ह्मणणे योग्य असतें. परंतु ब्रह्माचा स्वभाव असल्यामुळे अज्ञान प्रसंग नाहीं व तें आनंद जाणतें ह्मणणे योग्य नाहीं. हैं रण देऊन स्पष्ट केलें आहे. आनंदगिरि,