पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७८ बृहदारण्यकोपनिषद. [ अ. ३ ब्रा. ( यमानें ) छाटिला तर त्याची पुनः वाढ दृष्टोत्पत्तीस येत न.हीं; पण कोठून तरी त्याची पुनः उत्पत्ति होत असावी; ह्मणून तुझाला विचारितों कीं, यावत् मनुष्य मृत्यूनें तोडिला तर कोणत्या मुळापासून वाढतो. मरण पावलेल्या पुरुषाला कोणत्या तऱ्हेनें पुनः बाढ आहे ? हैं ( याज्ञवल्क्यप्रश्नाचें ) तात्पर्य आहे. रेतोद्भव ह्मणूं नका । रेत प्रेतां असेल कां ? । बीजोद्भव वनस्पती | बीजींच स्पष्ट जन्मती ॥ ५ ॥ - जीवंत भाष्य - वीर्यातून मनुष्य पुनः उत्पन्न होतो असें ह्मणाल तर तसें ह्मणूं नका; कारण पुरुषापासून वीर्य उत्पन्न होतें-मेलेल्या पुरुषापासून वीर्योत्पत्ति नाहीं. आणखी अशी गोष्ट आहे की, धान्यबीजापासूनही वृक्ष होतो, केवळ कलम लावल्यानें नवा वृक्ष वाढतो असें नाहीं. ( संस्कृत मूळांत ) ' इव' शब्द आहे तो निरर्थक आहे. वृक्ष देखत देखत ( स्पष्टपणें ) मरून जाऊन बीजापासूनही पुनः वृक्षाची उत्पत्ति होते.. मुळे उपटुनी वृक्ष काहिला । तो पुन्हा नसे जन्म पावला || परी मर्त्य हा तोडितां में । वाढतो पुन्हा मूळ ना गमें ॥ ६ ॥ भाष्य - जर मुळे व बीज यासहवर्तमान वृक्ष उपटून टाकून दिला तर, तो पुनः उत्पन्न होऊन वाढणार नाहीं, ह्मणून मी तुझांच सर्व जगाचें मूळ विचारितों; मर्त्यप्राणी मृत्यूनें तोडून टाकिला तर तो पुनः कोणत्या मूळापासून साढतो ? (हें समजत नाहीं. ) जाहलाचि हा ? नाहीं, जन्मतो । त्या पुन्हा कोण जन्म घालितो । विज्ञानानंद ते ब्रह्म दानाची मुख्य ती गति ॥ 1 तज्ज्ञ तनिष्ठ पावती ॥ ७ ॥ भाष्य – तो झालेलाच आहे असे जर तुझी मानतां तर त्याविषयी प्रश्न काय करावयाचा आहे ? अशी शंका घ्याल; कारण होणाऱ्याची उत्पत्ति विचारावी; झालेल्याची विचारूं नये. हा तर झालेलाच आहे, ह्मणून त्याविषयी प्रश्नच योग्य होत नाही; असे ह्मणाल तर, (श्रुति सांगते ) नाहीं. कांतर मेलेला पुनः होतोच (असें मानिले पाहिजे, न मानावें तर) न केल्या कर्माच्या फळाची प्राप्ति व केल्या कर्माचा नाश होऊं लागेल; सबब मी तुझांस विचारितों कीं मेला ह्मणजे त्याला पुनः कोण उत्पन्न करितों ? त्या ब्राह्मणांना, मेला ह्मणजे ज्यांतून पुनः उत्पन्न होतो, तें जगाचें मूळ, , हें ठाऊक नव्हते. त्यावरून याज्ञवल्क्य ब्रह्मनिष्ठ ठरून त्यानें ब्राह्मणांस जिंकिलें; व गायी घेतल्या. गोष्ट संपली. जगाचें जें मूळ, आणि ( श्रुति ) शब्दानें ( प्रत्यक्ष ) असें वर्णिलें, व ज्याविषयीं याज्ञवल्क्यानें ब्राह्मणांना प्रश्न केला, तें निजरूपानें श्रुति आपणास सांगते. तें विज्ञान ह्मणजे शुद्धज्ञानरूप व आनंदरूप आहे. तें ज्ञान विषयज्ञानाप्रमाणे कोणत्याही दुःखानें अनुषक्त असत नाहीं. तें काय ( आहे, ह्मणाल) तर, प्रसन्न, शांत, अनुपम, कष्टरहित, नित्यतृप्त, व एक ( मधु- रानंद) रसात्मक तत्व होय; असें. (शेवदी-अ - अध्याय समातीला) श्रुति सुचवीत आहे. तें ब्रह्म कोणतें