पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. २६-२८] शारीरक. पुढें येऊन मला विचारावें; ( किंवा ) तुझीं सर्वांनी मला विचारावें; अथवा याज्ञवल्क्यानें आपणांस विचारावें अशी ज्याची इच्छा असेल त्यास, किंवा तुझांसर्वास मी विचारितों. ते ब्राह्मण मुळींच धजावले नाहींत; (याज्ञवल्क्यानें ) बोलाविलें असून कोणीही कांहींच प्रत्युत्तर देण्यास सरसावला नाहीं. ऋचा २८ – मग याज्ञवल्क्यानें त्यांस श्लोकरूपाने पुढील प्रश्न केले:- जसा वनस्पती तरू । तसाच सत्य हा नरू । त्याचे केस पर्णपरी । शुष्क साल दोहोंवरी ॥ १ ॥ भाष्य – ते ब्राह्मण तटस्थ झाले तेव्हां त्यांस लोकरूपाने पुढील प्रश्न केले. वनाचा पति लौकिकी वृक्ष जसा असतो - मूळांतील वनस्पतिशब्द तरूचें विशेषण आहे – 'तसाच सत्य नरू' (वृक्षासारिखा पुरुष हें ह्मणणें ) सत्य आहे. त्याचे केस-त्या नराचे केस एरव्ही तरूच्या पानां सारखे आहेत. त्या नराची बाह्य शुष्क त्वचा (चर्म) वनस्पतीच्या शुष्क सालीप्रमाणें आहे.. वाहतें चि हो रक्त ह्यांतुनी । चीक जेवि तो तरुत्वचेंतुनी । चर्म फाटतां रक्त ओसरे । वृक्ष तोडितां चीक पाझरे ॥ २ ॥ भाष्य -ह्या पुरुषाची ( त्वचा फाटली ह्मणजे ) त्यांतूनच रक्त वाहतें. वृक्षाची सालं ( काढली ह्मणजे ) त्यांतूनच रसाचा प्रवाह फुटतो. ज्याअर्थी वनस्पतीचें व पुरुषाचें हें सर्व खेंच आहे; त्याअर्थी पुरुषाच्या त्वचेवर घाव घातला झणजे त्याचें रक्त बाहेर जातें; तसेंच वृक्ष तोडला ह्मणजे त्याचा रस बाहेर पडतो. मांसे याचीं, शकलें त्याचीं। अंतसली स्नायुपरी । हाडें आंतिले काष्टें त्याचीं । मज्जद मज्जेपरी खरी ॥ ३ ॥ भाष्य - ह्याप्रमाणेंच ह्या पुरुषाचीं मांसें लोचे) असतात, तशीं वृक्षाची शकलें, असा अर्थ घ्यावा. वृक्षांचें 'किनाट' ह्मणजे शकलाच्या आंत ज्याची वल्कलें होऊं शकतात अशी लांकडाला चिकटलेली अंतर्साल असते, ती पुरुषाच्या स्नायूप्रमाणें बळकट असते. पुरुषाच्या अस्थि ह्मणजे स्नायूंच्या आंत हाडें असतात, त्याप्रमाणे ' किनाटाच्या' आंत लांकडे असतात. वनस्पतीची मज्जा पुरुषाच्या मज्जेप्रमाणेंच असते. अधिक दुसरे कांहीं नसतें. वनम्पतीची मज्जा तशी पुरुषाची, व पुरुषाची मज्जा तशी वनस्पतीची. वृक्ष हा बळें तोडिला तरी । येतसें पुन्हा मूळ ते वरी। मर्त्य मृत्युनें छाटिला रखें । कोणत्या मुळीं वाढतो स्त्रयें ॥ ४ ॥ भाष्य—वृक्ष तोडला असतांना पुनः पुनः मूळांतून नवा अंकुर फुटतो व पहिल्यापेक्षां टवटवीत होतो-मुळांत (यत्-) जरी--तरी असें ह्मटलें आहे; त्यावरून पूर्वी वनस्पतीचा वं. पुरुषाचा सर्वस्वी सारखेपणा दाखविला; परंतु वनस्पतींत एक अधिक गोष्ट दृष्टोत्तीस येते ती ही कीं, तो तोडला तरी ( मूळ शिल्लक असतें त्यांतून ) पुनः वाढतो. परंतु पुरुष मृत्यूनं