पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६ बृहदारण्यकोपनिषद. [ अ. ३ ब्रा. ९ निश्चयाबें दाखवील, आणि ३२ भेदांनी लोक व्यवस्था झाली आहे असे दाखवून, पुनः प्राची दिशा वगैरेंच्या द्वारानें ( पुरुष विभाग जिकडचे तिकडे ) लावून, उपाधिरूप हृदयादि (दृश्य ) रूपापलीकडे जाऊन, शुद्ध स्वात्मस्वरूपानें राहील, तोच औपनिषद पुरुष. त्या (औपनिषद षा) ला भूक तहान वगैरे असत नाहीं; (तो औपनिषद ह्मणजे) त्याचें ज्ञान उपनिषदांचें अध्य- यन केल्यानें होतें, इतर प्रमाणांनीं होत नाही. असा तो तूं विद्याभिमानी पुरुष आहेस, त्या तुला (च) विचारतों. त्या (औपनिषद ) पुरुषाचें तूं मला स्पष्ट व्याख्यान करून न दाखविशाल तर तुझें शिर तुटून पडेल; असें याज्ञवल्क्य ह्मणाला. पण शाकल्याचें तो औपनिषद पुरुष असें मत नव्हतें; व त्यास त्याचें विज्ञान झालेंच नव्हतें. (त्यामुळे ) त्याचे शिर तुटून पडलें. गोष्ट झाली, तो औपनिषद पुरुष असे त्याचें मत नव्हते वगैरे श्रुतीचें ह्मणणे आहे. आणखी ही (श्रुति ) असें ह्मणते की, त्याच्या ( शाकल्याच्या ) अस्थि, त्याचे शिष्य सं- स्कार करण्याकरितां आपल्या घरी नेत असतांनां, चोरांनी चोरून नेल्या. ( चोरांनीं ) कां ( नेल्या? ) तर ( त्यांस त्या अस्थि गाठोडयांत बांधलेल्या असाव्या आणि शिष्य ) धन ( नेत आहेत,) असें चोरांनां वाटलें. पूर्वकाली झालेली गोष्ट ह्यांत सुचविली आहे. अष्टाध्यायींत समान वायूपर्यंत शाकल्याचा व याज्ञवल्क्याचा जो संवाद झाला तो दिला आहे; व त्यांत याज्ञवल्क्यानें शाप दिला की, "पुरांतं, अतिथ्यांत तूं मरशील; व तुझीं हाडें ही तुझ्या घरी पोहोचणार नाहीत.” त्याप्रमाणेंच तो मला. त्याच्या अस्थि देखील, चोरांना हें कांहीं दुसरेंच आहे असे वाटल्यावरून त्यांनीं उचलून नेल्या. याकरितां कोणी कोणाशीं उलट वाद घालू नये; कांतर एखादा ( याज्ञव स्क्यासारखा ज्ञानी) प्रतिवादी भेटतो. वर सांगितलेली गोष्ट ( ब्रह्मवेत्त्याशीं नम्र ) असावें या बद्दल आहे; व (ब्रह्म) विद्येच्या स्तुतीदाखल आहे. ऋचा २७ – मग ( याज्ञवल्क्य ) म्हणाला, हे पूज्य ब्राम्हणहो, तुमच्यापैकीं ज्या- ची इच्छा असेल त्याने मला प्रश्न करावा, किंवा सर्वांनी मला विचारावें. ( अगर ) तु- मच्यापैकीं ज्याची इच्छा असेल त्यास मीं विचारतों; किंवा तुम्हां सर्वांना मीं विचा- रितों. त्या ब्राम्हणांचें धैर्य झालें नाहीं. प्रस्ताव भाष्य-ज्या ब्रह्माचें 'असा नव्हे असा नव्हे' असें अन्यनिषेधपर वर्णनानें व्याख्यान केलें; त्या ब्रह्माविषयीं तें असें आहे, असें विधिरूप वर्णन कसें करावें, हें दाखविण्याकरितां पुनः तीच गोष्ट धरून, विश्वाचें मूळ सांगावें, ह्मणून श्रुति ह्मणते. मागील गोष्टीचा संबंध इतकाच की, ब्रह्म न जाणणारे ब्राह्मणांचा पराभव करून गायी याज्ञवल्क्यानें घ्याव्या, हा न्यायच होईल, असें मानून श्रुति सांगत आहे. - ऋग्भाष्य - 'मग याज्ञवल्क्य ह्मणाला.' मग ब्राह्मण स्तब्ध बसले असतां (याज्ञवल्क्य) ह्मणाला.. हे पूज्य ब्राह्मणहो ! तुमच्यापैकी याज्ञवल्क्यालय प्रश्न करावा अशी ज्याची इच्छा असेल त्यानें १- बृहदारण्यकाच्या पूर्वीचा एक अष्टाध्यायी ग्रंथ आहे. २ - पुण्यक्षेत्र नाहीं अशा देशांत. ३ – पवित्र तिथि नव्हे अशा काळीं.