पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ॠ. २४-२६] शारीरक. तेव्हां त्याचे मस्तक तुटून पडले, आणि त्याच्या अस्थि चोरांनी नेल्या. त्यांस त्या अस्थि दुसरेंच कांहीं आहे असे वाटलें. - भाष्य - हृदय व शरीर हीं आपसांत परस्परांचा आश्रय करून असतात, असें सांगितलें; व कार्यरूपी देह आणि कारणरूपी ( क्रियासाधनीभूत ) आत्मा ही अन्योन्याश्रित आहेत, असें तूं झटलेंस, ह्मणून तुला प्रश्न करितों कीं, तूं ह्मणजे शरीर आणि आत्मा ह्मणजे तुझें हृदय, ही दोन्हीं कोणाचा आश्रय करून आहांत ? ( उत्तर ) प्राणाचा, देह आणि आत्मा प्राणावर ह्मणजे प्रा- णवृत्तीवर (चलनवलनांवर) अवलंबून आहेत. प्राण कोठें रहातो तर अपानांत. अपान ही प्राणाची वृत्ति आहे. अपानक्रियेनें प्राण बांधलेला नसता तर तो निघून जाता. अपान कोठें राहतो, तर व्यानांत. व्यान अपानाची वृत्ति आहे. मध्ये राहणाऱ्या व्यानानें अपानवृत्ति अगाऊ बांधलेली नसती तर, अपान व प्राण हे दोघे निघून जाते. व्यान कोठें राहतो, तर उदानांत. प्राणापानव्यान ह्या तिन्ही वृत्ति (वायूची चलनवलनें ) उदानरूपी खुंटीला बांधलेल्या नसत्या, तर चार चहूंकडे निघून जात्या. उदान कोठें रहातो, तर समानांत; कांतर, समानाच्या आधारावर ह्या सर्व वृत्ति अवलंबून आहेत. असें (एके ठिकाणी ) झटले आहे की, शरीर (व ) हृदयांतील वायु एकमेकांचा आधार घेऊन समुदाय ( शक्ती ) नें बांधलेले असतात; आणि त्यांस विज्ञानमय (आत्म्याच्या ) वांछेची प्रेरणा असते. यावरून ही सर्व आकाशापर्यंत ज्याच्या नियमनांत आहेत, व ज्याच्या आधारावर आहेत, व ज्यांत गोंवलेली आहेत तें (स्वतः ) निरुपाधिक, प्रत्यक्ष, व समक्ष ब्रह्म होय; हे दाखविण्याकरितां हा यत्न आहे. 'तो हा '—जो असा नव्हे, असा नव्हे असें सांगून मधुकांडांत दाखविला- तो हा आत्मा अज्ञेय आहे ह्मणजे त्याचें ज्ञान होत नाही, हें कसें ? तर, तो सर्व कार्यधर्माच्या पलीकडे असल्यामुळे अज्ञेय आहे; कांतर, (बुद्धीनें ) त्याचें ग्रहण होत नाहीं. जी वस्तु व्यक्त झालेली असेल, ती इन्द्रियगोचर होऊन बुद्धिगोचर असते. पण हें आत्मतत्व त्याच्या उलट आहे. तसा तो अशीर्य आहे. शरीरासारखी जी वस्तु परमाणु एकत्र होऊन आकाराला येते, ती शरण ह्मणजे क्षय पावते; पण हा आत्मा त्याच्या उलट असल्यामुळे क्षय पावत नाहीं; ह्मणून अशी आहे. तसेंच आत्मा असंग आहे. मूर्त ह्मणजे आकारयुक्त वस्तु असते ती इतर मूर्त वस्तूला चिकटवितां येते. आत्मा त्याच्या उलट असल्यामुळे कोणत्याही वस्तूला चिकटत नाहीं; ह्मणून असंग आहे. तसाच असित झणजे अबद्ध आहे. मूर्त वस्तु बांधतां येते, पण हा त्यांच्या उलट असून अबद्ध असल्यामुळे त्याला बंधनत्र्यथा होत नाहीं, ह्मणून त्याचा नाश ही होत नाहीं. बुद्धिग्राह्य होणें, क्षय पावणें, चिकटणें, बंधनांत पडणें वगैरे कार्याचे धर्म त्याला नसल्यामुळे, तो नाश पावत नाही, असे समजावें. & (प्रश्नांचा ) क्रम सोडून देऊन, उपनिषद्वर्णित पुरुषाची गोष्ट ( चालली होती ती ) बाजूस ठेवून श्रुतिरूपशब्दांनीं निजस्वरूपाचें धांदलीनें वर्णन केलें; पण पुनः आख्यायिकेचा क्रम धरून याज्ञवल्क्य ह्मणतो कीं, हीं ( पृथिव्यादिक ) आठ स्थानें वर्णिली; 'पृथिवी हीच ज्याचें स्थान आहे' वगैरे; अग्नि लोक वगैरे आठ लोक (वर्णिले ); अमृत वगैरे आठ देव ( वर्णिले ); शारीरिक पुरुष वगैरे आठ पुरुष वर्णिले. जो कोणी ते शारीरादि पुरुष आहेत असें