पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७४ बृहदारण्यकोपनिषद. [ अ. ३. बा. ९ झाली होती. देवतासहित व आधारसहित दिशा, नामरूपें, व कर्मे यांशी याज्ञवल्क्य एकरूप झा ल्यामुळे, त्याला (दिशा) आत्मरूप झाल्या होत्या. रूप तितकें सर्व प्राची दिशेसहवर्तमान याज्ञव- ल्क्याच्या हृदयांत साठविलें होतें. पुत्रोत्पत्तिरूप जें केवल कर्म तें ज्ञानासहवर्तमान, फलासहवर्तमान, व तदधिष्ठात्री देवतेसहवर्तमान, दक्षिण दिशा, पश्चिम दिशा, व उत्तर दिशा, ( ह्या सर्व दिशा ) कर्मफलरूप होऊन याज्ञवल्क्याच्या हृदयांतच येऊन बसल्या होत्या. ध्रुवदिशेसहवर्तमान एकंदर नामें वाणीच्याद्वारें हृदयांत सांठविली गेली. हेंच ( हृदयच ) आणखी सर्व रूपें, कर्में, नांवें ह्मणून जी आहेत, ती सर्व हृदयरूपच आहेत. आतां सर्वरूप जें हृदय तें कोठें राहतें ? असा ( शाकल्याचा ) प्रश्न आहे. ऋचा २५ – अंहल्लिका, अशी हाक मारून, याज्ञवल्क्य म्हणाला, जर हैं हृदय आपणास सोडून अन्य ठिकाणी आहे असें मानितोस, अथवा जर हैं हृदय आपणाहून अन्य ठिकाणी असेल; तर कुत्रीं तें खातील किंवा पक्षी त्याचा चुरा करतील. भाष्य - अहल्लिक असें दुसरें नांव ठेवून, याज्ञवल्क्यानें हाक मारिली, आणि ह्मणाला. जेव्हां (जर) हें हृदय ह्मणजे ह्या शरीराचा आत्मा आपणापासून अन्य देशीं कोठें तरी असतो असें मानतोस; किंवा हें हृदय शरीराहून अन्य ठिकाणी राहील; तेव्हां ( तर ) शरीर मृत होईल; व कुत्रीं त्याला खातील किंवा पक्षी त्याचा चुरा करतील; तुकडे ओढून नेतील. ( असें सांगून याज्ञवल्क्य सुचवितो ) कीं, शरीराचा आश्रय करून आत्मा आहे; व नाम, रूप, कर्मों हेंच शरीराचें रूप असल्यामुळे तेंही हृदयावर अवलंबून आहे. ऋचा २६ – तूं आणि तुझा आत्मा, दोघे कोठें राहतां ? ( याज्ञवल्क्य ) प्राणांत. ( शाकल्य ) प्राण कोठें राहतो ? (याज्ञवल्क्य) अपानांत. (शाकल्य) अपान कोठें राहतो ? (याज्ञवल्क्य) व्यानांत. (शाकल्य) व्यान कोठें राहतो? (याज्ञवल्क्य) उदानांत. (शाकल्य) उदा- न कोठें राहतो ? ( याज्ञवल्क्य ) समानांत. तो हा आत्मा असा नव्हे, असा नव्हे म्हणून ज्ञेय नाहीं; कांतर, त्याचें ज्ञान होत नाहीं; तो क्षय पावत नाहीं, म्हणून अशीर्य आहे; कोठे चिकटून राहत नाहीं, म्हणून असंग आहे; व तो अबद्ध ( बांधलेला नव्हे ) असा आहे; व म्हणूनच दुःख पावत नाहीं, किंवा विनाश पावत नाहीं. हीं आठ स्थानें, हे आठ लोक, आठ देव, व आठ पुरुष आहेत. जो कोणी त्या पुरुषांचा निश्चय करून, व ते सर्व आपले ठिकाणी आहेत असे प्रत्ययास आणून, पलीकडे असतो, त्या उपनिषदांनीं वर्णिले- ल्या पुरुषाविषयीं तुला माझा प्रश्न आहे. त्या पुरुषाची जर फोड करून मला न सांग- शील, तर (शाकल्या) तुझें मस्तक पडेल. हे याज्ञवल्क्याचें म्हणणें शाकल्यानें मानलें नाहीं, १ - दिवसां लीन होणाऱ्या लपून राहणाऱ्या भुतांना अहल्लिक हाणतात. हृदय कोठें आहे हें ठाऊक असून छळवादाकरितां प्रश्न केला, असें जाणून निंद्य नांवानें हाक मारली.