पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. २१-२४] शारीरक. " या प्रश्नावर रेतांत, असें उत्तर दिलें. "रेतापासून उदक उत्पन्न केलें आहे. " अशी श्रुति आहे. रेत कोठें राहतें, तर हृदयांत; कांतर, रेत हृदयांतून उत्पन्न होतें. कामवासना होणें हृदयाची वृत्ति आहे. कामुक मनुष्याच्या हृदयांतून रेत पडतें, ह्मणूनच बापासारखा पुत्र झाला असें लोक ह्मणतात. ह्या बापाच्या जणूं हृदयांतून हा पुत्र बाहेर पडला; जणूं हृदयांतून निर्माण झाला; असें झणतात. सोन्यांतून कुंडल उत्पन्न होतें, त्याप्रमाणें उत्पन्न होतो. ह्यावरून हृदयांतच रेताचा सांठा आहे. असेंच हें खरें याज्ञवल्क्या. 5 ऋचा २३. -ह्या उत्तर दिशेला आहेस; तुझी देवता कोण ? ( याज्ञवल्क्य ) सोम माझी देवता. ( शाकल्य ) तो सोम कोठें राहतो ? ( याज्ञवल्क्य ) दीक्षेमध्यें. (शाकल्य ) दीक्षा कोठें राहते? ( याज्ञवक्ल्य) सत्यामध्यें. म्हणूनच सत्य बोल, असें दीक्षिताला म्हण- तात; कारण सत्यांतच दीक्षा असते. ( शाकल्य ) सत्य कोठें राहतें ? ( याज्ञवल्क्य ) हृदयांत; कांतर, हृदयानें सत्य जाणतो, आणि हृदयांतच सत्याची कायमची वस्ती आहे. ( शाकल्य ) असेंच हैं, याज्ञवल्क्या. भाष्य – ' या उत्तर दिशेला तुझी देवता कोण.' वगैरे. 'सोम माझी देवता. ' साम नांवाची लता आणि सोम देवता एकत्र घेऊन सोमसंज्ञा दिली आहे. तो सोम कोठें असतो, तर दीक्षेत यज्ञ करणारा ( दीक्षिणीया इष्टी केल्यावर ) दीक्षित झाला ह्मणजे, सोम विकत घेतो, व विकत घेतलेल्या सोमाचा याग करून ज्ञानी होऊन, उत्तर दिशेला जातो; त्या दिशेची अधिष्ठात्री देवता सोम असल्यावरून तिला सौम्या ह्मणतात. दक्षिा कशामध्यें राहते ? हें विचारल्यावरून सत्यांत असें ( उत्तर दिलें तें) कसें? ज्याअर्थी सत्यांत दीक्षा रहाते; त्याअर्थी दीक्षिताला (यज- मानाला ) सत्य बोल असें ह्मणतात. कारणनाश होऊन कार्यनाश न व्हावा, असा (सांगणा- रांचा हेतु असतो ). सत्यांतच दीक्षा राहते; पण सत्य कशांत राहतें ? असें विचारल्यावरून ( याज्ञवल्क्य ) ह्मणाला हृदयांत; कारण, हृदयानें यजमान सत्य जाणतो; ह्मणूनच हृदयांत सत्याची वस्ती आहे. ( असें बोलल्यावरून शाकल्य ) ह्मणाला असेंच हें, याज्ञवल्क्या. ऋचा २४ – ह्या ( ध्रुव ) ऊर्ध्व दिशेला तूं आहेस, तेव्हां तुझी देवता कोणती ? ( याज्ञवल्क्य ) अग्नि माझी देवता. ( शाकल्य ) तो अग्नि कोठें असतो ? ( याज्ञवल्क्य ) वाचेमध्यें. ( शाकल्य ) वाचा कोठें राहते ? (याज्ञवल्क्य) हृदयांत. ( शाकल्प ) हृदय कोठें राहतें ? भाष्य - ' ह्या ध्रुव दिशेला तुझी देवता कोणती ? मेरुपर्वताच्या आसमंतात् राहणाऱ्या लोकांना दिशाभेद होत नाहीं. ऊर्ध्वदिशाच नेहमी दिसत असते. त्यामुळे तिला ध्रुव (निश्चल) असें झटले आहे. याज्ञवल्क्यानें उत्तर दिलें कीं, ( त्या दिशेला ) अग्नि माझी देवता. ऊर्ध्व दिशेला प्रकाश फार असतो, आणि प्रकाश हाच अग्नि. तो अग्नि कोठें राहतो? वाणींत. वाणी कोठें रहाते? हृदयांत. याज्ञवल्क्यानें आपलें हृदय सर्व दिशेला पसरलेले असल्यामुळे, त्याला सर्व दिग्रूपें प्राप्त १ –' रेतसो ह्यापः सृष्ठा; ' ( ' रेतस आपः ' ऐतरेय १-४. ·