पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहदारण्यकोपनिषद. - ऋचा १७ – वीर्यच (रेत ) ज्याचें अशा सर्वात्म्याच्या अधिष्ठानरूपी पुरुषाला जो वल्क्या. जो तूं सर्वात्म्याचे अधिष्ठान ह्मणतोस तो पुरुष तोच तो. पुढे बोल, शाकल्या. त्याची देवता ह्मणाला. ७० [ अ. ३ ब्रा. ९ आयतन, हृदय हा लोक, मन ही ज्योति, जाणील, तोच तज्ज्ञ होईल, याज्ञ- पुरुष मी जाणतोच. जो हा पुत्ररूप कोण ? प्रजापति अर्से ( याज्ञवल्क्य ) भाष्य - 'रेतच ज्याचें स्थान;' तोच हा. रेतांतच पुत्ररूप पुरुष राहतो. तेंच त्याचे विशेष स्थान; त्यापासून अस्थि, मज्जा, व शुक्र हीं-पित्यापासून झालेली आहेत. त्याची देवता कोणती तर प्रजापति असें ( याज्ञवल्क्य ) ह्मणाला; प्रजापति-ह्मणजे पिता असें ह्मणतात; कारण, पित्या- पासून पुत्राची उत्त्पत्ति आहे. ऋचा १८-- हे शाकल्या, अशी हाक मारून याज्ञवल्क्य ह्मणाला. ह्या ब्राह्मणांनी तुला जणूं निखाऱ्याचें विझवणे (विझवण्याचा चिमटी ) केला आहे. भाष्य - देवरूपानें, लोकरूपानें, व पुरुषरूपानें असे तीन तीन तऱ्हेचे आत्म्याचे भेद करून एक एक प्राणदेव उपासने करितां आठ प्रकारानें सांगितला आहे. आतां दिशाविभागानें पांच ठिकाणी पांच प्रकारचा प्राण सांगितला. तो आत्मरूप आहे, असें गोळा बेरजेनें सांगण्याचा आरंभ आहे. ( दरम्यान ) शाकल्य स्तब्ध झाला. त्याला याज्ञवल्क्य भय उत्पन्न करावें, ह्मणन ह्मणतो; शाकल्या, अशी हाक मारून याज्ञवल्क्य ह्मणाला, तुला जणूं-मूळांतील स्वित् तर्कार्थी आहे-ह्या ब्राह्मणांनी खचित ज्यांत निखारे विझतात, असा चिमटा वगैरे तुला केलेला आहे; पण तूं तें जाणत नाहींस, तुझा आत्मा मी जाळीत आहे, असा ( याज्ञवल्क्याचे बोलण्याचा ) अभिप्राय घ्यावा. ऋचा १९ – याज्ञवल्क्या, अशी हाक मारून शाकल्य ह्मणाला, अरे, कुरुपंचाल देशांतील ब्राह्मणांची निंदा ब्रह्म जाणणारा असून करतोस काय ? ( याज्ञवल्क्य ) ह्मणाला, मीं दिशा, त्यांचे देव व त्यांचीं अधिष्ठाने जाणतों. शाकल्प म्हणाला, दिशा व देव व त्यांची अधिष्टानें जाणत असलास तर ( बरें ). भाष्य - 'याज्ञवल्क्या, अशी हाक मारून शाकल्य ह्मणाला' वगैरे. (तूं) जें हें कुरुपंचाल ब्राह्मणांविषयी फाजील ( निंदापर) बोललास कीं, ते स्वतः भ्याल्यामुळे तुला निखान्याचें विझवणें केलें आहे (तुला तोंडघशी दिलें आहे ), तें हैं ब्राह्मणांच्या निन्देचें भाषण तूं ब्रह्म जाणणारा असून बोलतोस की काय? याज्ञवल्क्य उत्तर देतो की, हें ब्रह्मज्ञान माझें इतक्या पुरतेंच आहे, की दिशा जाणत आहे, दिशासंबंधी पूर्णज्ञान मला आहे. तें केवळ दिशा ( जाण- तों ) एवढेच नाहीं; पण दिशा व्यापून राहणारे देवही जाणतों, आणि दिशांचें अधिष्ठान हिं जाणतों. शाकल्य ह्मणतो, दिशा, देव, व त्यांची अधिष्टानें जाणतों ह्मणतोस, तें तुझें ज्ञान सफल होवो. १ – चिमटा असे आचार्यानी झटलें; पण निखाऱ्याचे भक्ष्य असाही अर्थ होईल.