पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. १०-१६] शारीरक. भाष्य-'आकाशच ज्याचें आयतन' वगैरे. जो हा कानांत असणारा (ऐकणारा) परंतु प्रत्येक ऐकण्याचे वेळीं विशेष (व्यक्त) होतो (ओ देतो ), त्याची देवता कोणती तर दिशा, असें ह्मणाला. कारण, हा शारीरिक पुरुष दिशांतून उत्पन्न होतो. ऋचा १४ – तम ( अन्धकार ) च ज्याचें आयतन; हृदय ज्याचा लोक; (अवलो- कनसाधन); मन ज्याचा प्रकाश; अशा त्या सर्व आत्म्याच्या श्रेष्ठस्थानाला जो जाणतों, तो जाणणारा होईल, याज्ञवल्क्या. ज्या सर्व आत्म्याच्या श्रेष्ठस्थानाविषयीं तूं सांगतोस, त्या पुरुषाला मी जाणतों आहे. जो हा छायारूप पुरुष तोच हा. पुढे बोल, शाकल्या. ( शाकल्याने विचारलें ) त्याची देवता कोणती ? त्याची देवता मृत्यु. भाष्य-'तम हेंच ज्याचें आयतन' वगैरे. तम ह्मणजे रात्रीचा वगैरे अंधकार घेतला आहे. त्याचें स्थूल स्वरूप छायामय, अज्ञानमय ( प्रतिबिंब ) स्वरूप आहे. त्याची देवता कोण? असें विचारल्यावरून मृत्यु असें उत्तर दिलें. अधिदैवत मृत्यु ( ईश्वर ) त्याचा (जीवाचा ) उत्पादक आहे. - ऋचा १५ – रूपें (तेजें ) हींच ज्याचें आयतन आहे, चक्षु ज्याचा लोक, मन ज्याची ज्योति; असा जो सर्वात्म्याचें श्रेष्ठ अधिष्ठान आहे; त्यास जो जाणील तो, जाणता ह्मणावा, याज्ञवल्क्या. तूं ज्या सर्वात्म्याच्या अधिष्ठानाविषयीं सांगतोस, त्या पुरु- पाला मी जाणतो आहे. जो आरशामध्ये दृष्टीस पडतो तो हाच पुरुष. पुढे बोल, शाकल्या. (शाकल्य विचारतो ) त्याची देवता कोणती ? ( याज्ञवल्क्य ) ह्मणाला, प्राण. भाष्य-‘रूपें ज्याचें आयतन वगैरे.' (बाराव्या ऋचेंत) पूर्वी साधारण रूपें सांगितली. ह्या ठिकाणी प्रकाश देणारी विशिष्ट रूपें (तेजें ) घेतलीं आहेत. रूपाधिष्ठित देवतेचें विशेष स्थान प्रतिबिंबाला आधारभूत आरसा वगैरे होय. त्याची देवता कोणती विचारल्यावरून, त्या प्रतिबिंबसंज्ञक पुरुषाच्या उत्पत्तीला असु ह्मणजे प्राण कारण आहे असे सांगितलें. ऋचा १६ – उदक हेंच ज्याचें आयतन, हृदय ज्याचा लोक, व मन ज्योति, असा सर्वात्म्याचें अधिष्ठान जो पुरुष त्याला जो जाणतो, तो पंडित होय, याज्ञवल्क्या. मीं त्या सर्वात्म्याच्या अधिष्ठानाला, तूं सांगतोस त्या पुरुषाला, जाणतों; जो उदकांत पुरुष असतो तोच हा. पुढे बोल, शाकल्या. शाकल्य विचारतो ) त्याची देवता कोण ? वरुण असें ( याज्ञवल्क्य ) ह्मणाला. भाष्य-'उदकच ज्याचें आयतन' वगैरे. साधारण सर्व उदकें ( त्याचें ) घर. विहिरी, कुवे, तळी वगैरे यांत असणान्या उदकांत (त्याचें ) मुख्यत्वें रहाणें आहे. त्याची देवता कोणती तर वरुण आहे. ( मूत्रादि ) संचय करणारें शारीरिक उदक तेंच विहिरीवगैरेंतील उदक; त्याची उप्तात्त वरुणापासून होते. १ – सूर्यकिरणद्वारा पृथ्वीवर उदक पडतें. त्याला वरुण असे नांव आहे. आनन्दगिरि.