पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. १७-२०] शारीरक. ७१ ऋचा २०- -( शाकल्य ह्मणतो) या प्राची दिशेला तूं आहेस; प्राचीरूप आहेस असें घेतलें असतां तुझी देवता कोण ? (याज्ञवल्क्य) आदित्य माझी देवता. (शाकल्य) तो आदित्य कशांत राहतो ? ( याज्ञवल्क्य ) - डोळ्यांत. (शाकल्य) - डोळा कशांत राहतो? ( याज्ञवल्क्य ) रूपांमध्यें. ( शाकल्य ) - डोळ्यांनें रूपें पाहतों, पण रूपें कशांत राहतात ? ( याज्ञवल्क्य ) ह्मणाला, हृदयांत; हृदयानेंच रूपें जाणतों. हृदयांतच रूपें ( प्रतिष्ठित ) स्थिर झालेलीं आहेत. (शाकल्प ) - होय; याज्ञवल्क्या, हे सर्व असेंच. भाष्य-दिग्रूप तूं झाल्यावर तुझी देवता कोणती ? तो याज्ञवल्क्य आपल्या हृदयरूपाला पांच भागांनी दिशांत वाटून देऊन दिग्रूपी झाला. आणि त्या रूपानें, सर्व जगत् आत्मरूप जाणून मीं दिगात्मा आहे, असें ह्मणून तद्रूप झाला; ( मग ) पूर्वेस तोंड करून ( शाकल्यास दि- शा व त्यांची ) अधिष्ठानें सुद्धा ( मी जाणतों असें ) भाषण केलें होतें; ज्या क्रमानें याज्ञवल्क्या- ची प्रतिज्ञा होती, त्याच क्रमानें (शाकल्यानें ) प्रश्न केला की, ह्या (पूर्व ) दिशेत ( पूर्व दिशेकडे तोंड करून उभा ) तूं आहेस; तुझी देवता कोण ? सर्वदा देहामध्ये असतांना ज्या ज्या देवतेची पुरुष उपासना करितो; त्या त्या देवतेचें रूप त्याला इहलोकींच प्राप्त होतें. असेंच पुढें श्रुति सांगेल की " देव होऊन देवांप्रत जाँतो. ” ( आतां ) ह्या प्राची दिशेला तद्रूप तूं झाल्यावर कोणती देवता तुला व्यापून असते. या प्रश्नाचा अर्थ असा की, कोणत्या देवतेने तूं प्राचीदिक्रूप पावला आहेस. दुसरा याज्ञवल्क्य ) उत्तर देतो की, प्राची दिशेला मी आदित्य देवतेनें व्याप्त असतों, व आदित्य माझी देवता. ( कोणत्या ) देवतेसह ( दिग्रूप येतें ) हें सांगितलें; पण, तत्स्थानासह देवता सांगावयाच्या होत्या; ह्मणून (शाकल्य ) ह्मणतो की, तो आदित्य कोठें प्रतिष्ठित आहे ? (उत्तर) डोळ्यांत. मन्त्रब्राह्मणांमध्यें असें ह्मटले आहे कीं, अध्यात्म ( शारीरिक ) चक्षुपासून आदित्य उत्पन्न झाला. " चक्षूपासून सूर्य झालां.” “ चक्षू- पासून आदित्यं " वगैरे श्रुति आहेत. कार्य कारणांतर्गत असतें. चक्षु (हें कार्य ) कशांत आहे ? रूपामध्यें. रूपविषय ग्रहण करण्याकरितां रूपमय चक्षु, रूपानें उत्पन्न केला आहे; रूपांनीं तो उत्पन्न केला, त्यांनीच आत्मा ग्रहण करण्याकरितां चक्षु उत्पन्न केला आहे. ह्मणून आदित्यासहवर्तमान, व प्राचीदिशेसहवर्तमान, व त्या दिशेला असणाऱ्या सर्व वस्तूसहवर्तमान चक्षु रूपामध्यें राहतो. चक्षुःसंयोगानें सबंध प्राचीदिशा रूपमय झाली आहे. ती रूपें कशांत रहातात? असें विचारल्यावरून ती हृदयांत राहतात, असें याज्ञवल्क्यानें उत्तर दिलें. हृदयांतून रूपें उत्पन्न होतात, व हृदयही रूपमय झालेलें आहे. ज्याअर्थी हृदयाच्या साहाय्याने सर्व लोकांस रूपज्ञान होतें, आणि हृदय हा शब्द बुद्धि व मन एकत्र करून योजला आहे; त्याअर्थी हृदयांत रूपें रहातात, (हें ह्मणणें योग्य आहे. ) हृदयांत वासनात्मक रूपांचें स्मरण होतें. त्यावरून हीं रूपें हृदयांत राहतात असा अभिप्राय आहे. असेंच हें याज्ञवल्क्या, ( असे शेवटी शाकल्यानें झटलें.) १ “ देवो भूत्वा देवानप्येति " बृह. ४-१-२. २ – " चक्षोः सूर्योऽजायत. " पुरुषसूक्त. ३ – “ चक्षुष आदित्यः " ऐ. १-४.