पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६८ बृहदारण्यकोपनिषद. [ अ. ३ बा. ९. देवाची देवता कोणती? ज्यापासून जो उत्पन्न होतो त्याची ती देवता, असें ह्या प्रकरणांत सुचवावयाचें आहे. ( याज्ञवल्क्य ) ह्मणाला, अमृत. अमृत ह्मणजे खाल्लेल्या अन्नाचा जो रस होतो, तो आईच्या रक्ताला उत्पन्न करण्यास कारणीभूत होतो; कारण त्या अन्नरसापासून रक्त . उत्पन्न होतें. तें स्त्रीच्या अंगांत असते, आणि त्यापासून (रचलेलें ) रक्तमय शरीर बीजाला आश्रय होतें. ऋचा ११ -काम (वासना) च ज्याचें आयतन; हृदय (बुद्धि ) ज्याचा डोळा; मन ज्याची ज्योति; अशा त्या पुरुषाला सर्व आत्म्याचें श्रेष्ठस्थान ह्मणून जो जाणील, तो जाणणारा होईल, याज्ञवल्क्या. सर्व आत्म्याचें श्रेष्ठस्थान ह्मणून ज्याला ह्मणतोस त्या पुरुषाला मी जाणतों. तोच हा काममय पुरुष. बोल पुढे शाकल्या. त्याची देवता कोण ? ( याज्ञवल्क्य ) स्त्रिया असें ह्मणाला. भाष्य--बाकी सारखेंच. काम ( वासना ) च ज्याचें आयतन. काम ह्मणजे स्त्रीसंयोगा- ची इच्छा. काम त्याचें शरीर असा अर्थ घ्यावा. हृदय हा त्याचा डोळा. हृदयानें ह्मणजे बुद्धीनें पाहतो, असा जो काममय पुरुष तो अध्यात्म (शारीर) काममयच. त्याची देवता कोण ? (याज्ञ- वल्क्य ) ह्मणाला, स्त्रिया. कांतर स्त्रियांपासून कामाचें उद्दीपन होतें. ऋचा १२ -- रूपें (रंगच ) ज्याचें आयतन, चक्षु हें ज्याचें पहाण्याचें साधन, मन ( ही ज्याची ) ज्योति, अशा त्या पुरुषाला जो सर्व आत्म्याचे श्रेष्ठस्थान (तत्व) जा- णील, तो जाणणारा ( पंडित ) होईल, याज्ञवल्क्या. सर्वात्म्याचें श्रेष्ठस्थान ह्मणून जें तूं सांगतोस, त्या पुरुषाला मी जाणतोंच आहे. आदित्यामध्यें जो पुरुष आहे, तोच हा. पुढे बोल, शाकल्या. ( शाकल्प विचारतो त्याची ) देवता कोणती ? (याज्ञवल्क्य ) ह्मणाला सत्य. भाष्य -- 'रूपें ज्याचें आयतन' वगैरे. पांढरें, काळे रूप वगैरे (हें त्याचें स्थान. ) जो हा आदित्यामध्ये पुरुष आहे, तो सर्व रूपांचें विशिष्ट कार्य आहे. त्याची देवता कोणती तर सत्य, असें (याज्ञवल्क्य ) ह्मणाला. चक्षूला सत्य असें ह्मणतात. कारण शारीरिक चक्षूपासून अधिदै- वत आदित्याची उत्पत्ति आहे. ऋचा १३ --ज्याचें घर आकाश, कान ज्याचा लोक( डोळा), ज्याचा ज्योति मन, ( अशा ) त्या पुरुषाला सर्व आत्म्याचें श्रेष्ठस्थान ह्मणून जो जाणील, तो ज्ञाता होईल, याज्ञवल्क्या. तूं ज्या सर्वात्म्याच्या श्रेष्ठस्थानाला सांगतोस, त्या पुरुषाला मी जाणतोंच आहे. जो हा कानांतील प्रतिश्रवण प्रसंगी पुरुष गोचर होतो, तोच हा. पुढे बोल, शाकल्या. ( शाकल्य ह्मणाला) त्याची देवता कोणती ? दिशा असें (याज्ञवल्क्य ) ह्मणाला. १–' चक्षाः सूर्योऽजायत' चक्षुपासून सर्य जाहला. पुरुषसूक्त ' चंद्रमा मनसा जातः' इत्यादि. १