पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. ५-१०] शारीरक. तो प्राण ब्रह्म आहे. सर्व देवरूप असल्यामुळे मोठा अर्थात् ब्रह्म होय. त्यावरून तो ( प्राण ) तें (त्यत्) असें ह्मणतात. 'तें' ह्या परोक्षवाचक शब्दानें ब्रह्म असें ह्मणतात. यावरून देव एक व अनेक आहेत असें होतें. देव अनन्त आहेत, त्याचा निविदपदांनीं निर्दिष्ट केलेल्या ( ३३०६ ) संख्येंत अन्तर्भाव होतो. त्यांचाहि क्रमानें तेहतीस वगैरे एका प्राणापर्यंत संख्येंत अन्तर्भाव करावा. एका प्राणाचाच अनन्त संख्येपर्यंत विस्तार आहे; ह्यावरून एक, अनन्त, किंवा दरम्यानच्या संख्यांनी निर्दिष्ट केला तो प्राणच. आणि त्यांत एका देवाचींच (प्राणाचींच ) नामें, रूपें, कर्में, गुण, व शक्ति ही त्याचा भिन्न भिन्न अधिकार मनांत आणून, भिन्न भिन्न होतात. ऋचा १० – ज्या (प्राणाचें) आश्रयस्थान पृथ्वीच आहे, अग्नि हा डोळा (लोक) आहे, मन ही ज्योति आहे, अशा त्या पुरुषाला सर्व आत्म्याचें श्रेष्ठस्थान (तत्व ) ह्मणून जो जाणील, तो जाणरारा पंडित होईल, याज्ञवल्क्या. ( याज्ञवल्क्य ) - सर्व आत्म्याचें श्रेष्ठस्थान ह्मणून सांगतोस तो पुरुष मी जाणतोंच आहे. अरे जो हा शारीर पुरुष तोच तो, पुढे बोल ( विचार ) शाकल्या. ( शाकल्य ) त्याची देवता कोणती? अमृत असें ( याज्ञवल्क्य ) ह्मणाला. भाष्य – आतां त्या प्राणरूप ब्रह्माची भिन्न भिन्न आठ स्वरूपें सांगण्यांत येत आहेत:- ज्या देवाचें पृथिवी हेंच आश्रयस्थान, अग्नि ज्याचा लोक (डोळा ); ज्यानें अवलोकन करितो तो लोक; अग्निद्वारें पाहतो (अनुभवितो) असा अभिप्राय आहे. मन ही ज्याची ज्योत ह्मणजे संकल्पविकल्परूप कामे करण्यास जें ज्योतीप्रमाणें उपयोगी होतें; तो हा (प्राण ) मनो- ज्योति ह्मणावा. पृथ्वीरूप देहयुक्त, अग्निरूप दृष्टियुक्त, मनानें संकल्प करणारा, पृथ्वीचा अभि-- मानी देहेंद्रिय समुदाययुक्त असा (तो प्राण) देव आहे असा अभिप्राय ह्या गुणांनी युक्त त्या पुरुषाला जो पूर्णपणे जाणील, आणि सर्व आत्म्यांचा ह्मणजे अध्यात्मिक देहेंद्रिय समुदायरूप आत्म्याचें तो श्रेष्ठस्थान (असें जाणील); (प्रत्येक पुरुषाला ) आईच्या देहापासून त्वचा, मांस व रक्त मिळतात, तें क्षेत्र (शेत-जमीन) आणि बापाच्या शरीरापासून शुक्र, मज्जा, व अस्थि मिळतात, तें बीज त्याचें श्रेष्ठस्थान व इंद्रियांचें श्रेष्ठस्थान असें जाणील; तो पण्डित ह्मणावा.. असा अभिप्राय जाणावा. 'याज्ञवल्क्या,' तूं त्या पुरुषाला जाणणारा नसूनही पाण्डित्याचा अभिमान धरणारा असावास, असा ( या संबोधनाचा ) तात्पर्यार्थ आहे. 9: जर तशा पुरुषाचे ज्ञानानें पाण्डित्य मिळत असले, तर जो सर्व आत्म्याचें श्रे- स्थान ह्मणून सांगतोस, तो पुरुष मी जाणतोंच आहे. यावर शाकल्याचें भाषण गर्भित घ्यावें की जर तूं त्या पुरुषाला जाणत असलास तर त्याचें कांहीं विशेषण सांग. ( याज्ञवल्क्य ह्मणतो) त्याचे विशेषण आहे तें ऐक.. ' ( अरे ) तो हा शारीर ह्मणजे पृथिव्यंश शरीरांत आईच्या तीन धातूंच्या रूपानें (जननीत्वानें) असणारा (असा अभिप्राय आहे); हे शा- कल्या, तूं विचारिलास, 'तो हा देव' (प्राण); परन्तु त्याला दुसरें विशेषण द्यावयाचे आहे करितां ' हे शाकल्या, विचारच ( पुढें विचार ). ' याप्रमाणें (शाकल्य) चिडविला तेव्हां, अंकुशानें पीडिलेल्या हत्तीप्रमाणें रागाच्या स्वाधीन होऊन, शाकल्य ह्मणतो- - त्या शारी