पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

1 बृहदारण्यकोपनिषद. [ अ. ३ ब्रा. ९ भाष्य – 'आदित्य कोणते?' संवत्सराचे बारा महिने-कालभाग - प्रसिद्ध आहेत. हे आदित्य कसे ? हे पुनः पुनः फेरे खाऊन प्राण्यांची आयुष्यें, व कर्मफलें ( आददान) घेऊन ( यन्ति ) जातात. आणि ते, ज्याअर्थी या प्रकारें हें सर्व घेऊन जातात, त्याअर्थी आदित्य होत. ऋचा ६ - इन्द्र कोणता ? प्रजापति कोणता ? गरजणारा तोच इन्द्र. यज्ञ तो प्रजा- पति. गरजणारा कोण ? अशनि. यज्ञ कोण ? पशु, भाष्य -- 'इन्द्र कोणता ?' 'प्रजापति कोणता?' गरजणारा तोच इन्द्र; यज्ञ तो प्रजापति, गरजणारा कोण? अशनि. अशनि ह्मणजे अर्थात् वीर्य (शक्ति), अर्थात् बल ( समुदायशक्ति ) जें प्राण्यांचा संहार करितें, तो इन्द्र; कारण इंन्द्रोचें तें काम आहे. 'यज्ञ कोण? पशु' कां तर पशु यज्ञसाधनें आहेत. यज्ञ ( वस्तुतः ) अरूपी आहे. आणि पशुरूपसाधनाचा आश्रय करितो, ह्मणून पशु तेच यज्ञ असें ह्मणतात. ऋचा ७ – सहा कोणते ? अग्नि, पृथिवी, वायु, अन्तरिक्ष, आदित्य, आणि ग्रु- लोक हे सहा, कारण ह्या सहामध्यें हें सर्व आहे. भाष्य--‘सहा कोणते?’ तेच अग्न्यादिक वसु नावाने सांगितले. ते चंद्रमा व नक्षत्रे वगळून सहा बाकी राहतात; कारण हे तेहतीस वगैरे पूर्वी सांगितलेले सर्व हेच सहा होत. वस्वादिक सर्व विस्ताराचा ह्या सहांत समावेश होतो. ऋचा ८ - ते तीन देव कोणते ? हे तीन लोक आहेत तेच; कारण ह्यांमध्ये सर्व देव आहेत. दोन देव कोणते ? अन्न व प्राण. दीड देव कोणता ? जो हा वाहतो. भाष्य – 'ते तीन देव कोणते? हे तीन लोक आहेत तेच.' पृथ्वी व अग्नि एकत्र करून एक देव, अन्तरिक्ष व वायु एकत्र करून दुसरा, युलोक व आदित्य एकत्र धरून तिसरा. तेच तीन देव होत. आणि ज्या अर्थी ह्या तीन देवांत सर्व देव येतात त्या अर्थी हेच तीन देव असा कांही नैरुंक्तवादींचा पक्ष आहे. दोन देव कोणते ? अन्न व प्राण हेच दोन देव होत. ह्यांमध्ये वर निर्दिष्ट केलेल्या सर्वांचा अन्तर्भाव होतो. दीड कोणता ? जो वायु वाहतो तो. ऋचा ९ -- त्या संबंधानें ह्मणतात कीं जो हा एकसारखा वाहत आहे, तो दीड कसा ? ज्याअर्थी हे सर्व ह्या ( वायूमध्यें ) वाढलेले आहे त्याअर्थी दीड होय. एक देव कोणता ? प्राण. तो ब्रह्म 'त्यत्' (तत्) असें ह्मणतात. भाष्य - त्या बाबतींत ह्मणतात ह्मणजे प्रश्न करितात कीं, हा वायु एकासारखाच ह्मणजे एकच वाहत आहे, तर दीड कसा ? ज्याअर्थी हें सर्व ह्यांमध्यें वाढलेलें आहे, ह्मणजे वायु अस- तां हैं सर्व अधिक वाढीस पावतें; त्याअर्थी दीर्डे (अध्यर्ध) ह्मणावा. एक देव कोणता ? प्राण. १ - - या ठिकाणीं बलालाच लक्षणेनें इन्द्र झटले आहे. २ -- केवळ तीन लोक हेच तीन देव असा कांहींचा पक्ष व नैरुक्तवादींचा ' त्रयोलोका' येथे तीन जोड्या घ्याव्या असा पक्ष आहे. – तत् ( चिनी लोकांचें 'तव् ' ) ब्रह्मार्थी आहे. ३ ४ अर्ध ह्मणजे वाढ. अध्यर्ध वाढीसह एक हाणजे दीड-दीड हा शब्द अध्यर्ध-दिडूढ-दीढ-दीड असा झाला आहे.