पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. १-५.] शारीरक. सहस्रे, इतके ( ३३०६ ) देव आहेत. शाकल्यानेंहि बरें, असें ह्मटलें. अशी यांची मध्यम ( गोळा बेरजेनें ) संख्या स्पष्ट समजली, पण त्या देवांची संकोच पावणारी ( कमी कमी होणारी ) संख्या (विदग्ध ) विचारितो. याज्ञवल्क्या, नक्की किती देव आहेत ? ( त्यास प्रश्नानुक्रमानें ) तेहतीस, सहा, तीन, दोन, दीड, एक, अशी उत्तरें दिलीं. देवांची संक्षिप्त व विस्तृत संख्या विचारिल्यावर पुनः परिगणित देवांचें स्वरूप विचारितो— ते तान व तीन शतें, आणि तीन व तीन सहस्रं देव कोणते ? ऋचा २ – त्यानें उत्तर दिले; ह्यांच्या (तेहतीस देवांच्या ) ह्या ( ३३०६ ) विभूतिच आहेत; परन्तु देव तेहतीसच आहेत. ते तेहतीस कोणते? आठ वसु, अकरा रुद्र, बारा आदित्य, मिळून एकतीस; व इन्द्र आणि प्रजापति मिळून तेहतीस. भाष्य – त्या दुसऱ्यानें (याज्ञवल्क्यानें ) उत्तर दिले, ह्या तेहतीस देवांच्या ह्या तीन व 'तीनशे वगैरे विभूति आहेत; परन्तु खरें झटलें असतां तेहतीसच देव आहेत. ते तेहतीस कोणते ते सांगतो. 'आठ वसु, अकरा रुद्र, बारा आदित्य, मिळून, एकतीस;' व 'इंद्र आणि प्रजापति ' ह्यांनी तेहतीस संख्या पुरी होते. ऋचा ३ –– वसु कोणते ? अग्नि, पृथिवी, वायु, अन्तरिक्ष, आदित्य, द्युलोक, चंद्र- मा, आणि नक्षत्रे हे वसु. ह्यांवर हे सर्व वसवलें आहे ह्मणून ते वसु. भाष्य – 'वसु कोणते ?' ह्या प्रश्नानें त्यांतील प्रत्येकाचें स्वरूप विचारिलें आहे. अग्नि व पृथिवी वगैरे अग्न्यादिनक्षत्रांपर्यंत वसु होत. प्राण्यांच्या कर्मफलांस आश्रय होऊन, देहेंद्रियसमु- दायरूपानें आणि ( देहांची ) राहण्याची जागा ह्या रूपांनी परिणत होऊन, ( प्राण्यांच्या ) कर्म- फलांस आश्रयीभत झाल्यामुळे व प्राण्यांस राहण्याला स्थल दिल्यामुळे हे सर्व जग वसवितात, आणि (आपण ) त्यांत राहतात. ते ज्या अर्थी वसवितात त्या अर्थी त्यांस वसु ह्मणावें. ऋचा ४-- -रुद्र कोणते ? हे पुरुषाचे दहा प्राण ( इंद्रियें ) व अकरावा आत्मा (मन) हीं जेव्हां या मर्त्य शरीरांतून उठून जातात, तेव्हां आप्तवर्गीस रडवितात ह्यणून, ज्या अर्थी रडवितात त्या अर्थी, रुद्र होत. भाष्य – ‘रुद्र कोणते ?’ पुरुषाची कर्मेंद्रियें व बुद्धींद्रियें मिळून दहाप्राण ( इंद्रियें ), व अकरावें मन, ते हे ( अकरा ) प्राण, जेव्हां प्राण्यांच्या कर्मफलभोगाचा क्षय होतो, तेव्हां ह्या नाशवन्त शरीरांतून उठून जातात. त्यावेळी त्याशी संबंध ठेवणारे आप्तांस रडवितात, ह्यावरून ज्याअर्थी संबंधी जीवांस रडवितात त्या अर्थी, ते रुद्र ( रडविणारे ) होत. ऋचा ५ - आदित्य कोणते? संवत्सराचे महिने बारा, तेच आदित्य; कारण हे सर्वकांहीं घेऊन जातात. आणि ज्याअर्थी ते हें सर्व घेऊन जातात, त्याअर्थी आदित्य ( आददान ( घेणारे ) यन्त ( जाणारे ) होत. १ प्राण शब्द श्रुतींत इंद्रिय वाचकही असतो.