पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शाकल्य-ब्राह्मण, --000- शारीरक ( प्राण ) अध्याय ३, ब्राह्मण ९. ऋचा १ - मग त्याला विदग्ध शाकल्यानें प्रश्न केला, याज्ञवल्क्या, देव किती आ हेत? त्यानें ( याज्ञवल्क्यानें ) ह्या निविदेनेंचे उत्तर केलें. जितके वैश्वदेव शस्त्राच्या निविदेनें वर्णिले जातात, (तितके ) ह्मणजे तीन, व तीन शतें, आणि तीन व तीन सहस्त्रें. (विदग्धानें ) झटलें बरें, याज्ञवल्क्या, नक्की देव किती आहेत? तेहतीस. ( विदग्ध ) ह्मणाला बरें. याज्ञवल्क्या, नक्की देव किती आहेत? सहा. (विदग्ध ) ह्मणाला बरें• याज्ञवल्क्या, नक्की किती देव आहेत? तीन. ( विदग्ध ) ह्मणाला बरें. याज्ञवल्क्या, निश्चित किति देव आहेत? दोन. (विदग्ध ) ह्मणाला बरें. नक्की किती देव आहेत? दीड (विदग्ध) ह्मणाला बरें. याज्ञवल्क्या, खरे देव किती आहेत? एक. (विदग्ध ) ह्मणाला, ठीक आहे. ते तीन व तीन शर्ते आणि तीन व तीन सहस्र देव कोणते ? भाष्य --'मग त्याला विदग्ध शाकल्यानें प्रश्न केला. ' (याज्ञवल्क्यानें ) पृथिव्यादिका- पैकीं सूक्ष्म, सूक्ष्मतर, व सूक्ष्मतम ह्या क्रमानें पूर्वीचें पूर्वीचे पुढच्या पुढच्या तत्त्वामध्यें गोवलेलें आहे, असे सांगून सर्वांच्या अभ्यन्तरांत असणारे ब्रह्माचा खुलासा केला; आणि त्या ब्रह्माचा प्रकट झालेल्या विश्वांतील भिन्न भिन्न सूत्रांत नियन्तेपणा ( असतो तें) सांगितलें प्रकट झालेल्या विश्वांत नियन्ता असल्याचें चिन्ह (ज्ञापक) अगदी स्पष्ट आहे, हेंही ( दाखविलें ), त्याच ब्रह्मांत प्रत्यक्षपणा व परोक्षरणा, ज्या देवतांचें ब्रह्म नियमन करितें त्या देवतांची संख्या कमीजास्त झाल्यानें उत्पन्न होतो, हें समजण्यासारखें आहे, ह्मणून ह्या शाकल्य ब्राह्मणाचा आरंभ आहे, मग त्या याज्ञवल्क्याला विदग्ध नांवाच्या शकलपुत्र शाकल्यानें प्रश्न केला कीं, याज्ञ- वल्क्या, देव किती आहेत ? त्या याज्ञवल्क्यानें ह्याच पुढील ( संख्यादर्शक ) निविदेनें, शाकल्यानें जी संख्या विचारिली, ती संख्या सांगितली. जितके देव वैश्वदेवशस्त्राच्या निवि देमध्यें आहेत ( तितके ). निविद ह्मणजे देवतांची संख्या दाखविणारी कांहीं मन्त्रपदें वैश्वदेव शस्त्रांत ह्मणतात, त्या मंत्रपदांना निविद अशी संज्ञा आहे. त्या निविदेत जितके देव ऐकण्यांत येतात तितके देव आहेत; पण ती निविद कोणती? त्या निविदेतील पदें ( याज्ञवल्क्य ) दाखवितो. तीन व तीन शतें; तीन देव आणि तीनशें देव; शिवाय असेच तीन व तीन १ – निविद ह्मणून ' वैश्वदेवशस्त्र' देवसंख्या मोजणारा ऋक्समुदाय आहे.