पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. ९-११ ] प्रशास्तृ- अक्षर. पितर देखील त्यामुळे दवला (ह्मणजे पळी घेऊन लोक (पितृ ) होम करितात ) त्या होमाला चिकटून असतात असें तात्पर्य निघतें. बाकी सर्व वर प्रमाणे. ऋचा १० – हे गार्गी, जो कोणी हैं अक्षर न जाणून इहलोकीं होम करितो, यज्ञ करितो, किंवा हजारों वर्षे तप करितो, त्याचें तें ( कर्मजन्य पुण्य ) क्षीण होतें. जो कोणी हे गागी, हें अक्षर न जाणतां इहलोक सोडून जातो, तो कृपण ह्मणावा; पण जो हैं अक्षर जाणून हे गार्गी, इहलोक सोडून जातो तो ब्राह्मण ह्मणावा. भाष्य-त्या अक्षराचें अस्तित्व पुढील गोष्टीनें ही सिद्ध होतें. ज्या अर्थी अक्षरज्ञान करून घेतलें नाहीं तर निश्चयानें संसारांत पडतो, आणि तें जाणल्यानें संसारविच्छेद होतो, त्या अर्थी अक्षर असले पाहिजे असे न्यायप्राप्त आहे. कर्मापासूनच संसाराचा विच्छेद होईल असें ह्मणाल तर नाहीं. हे गार्गी, जो कोणी हें अक्षर न जाणतां ह्मणजे त्याचें पूर्णज्ञान करून न घेतां या लोकीं होम करितो, यज्ञ करितो, तप करितो, आणि तें कर्म हजारों वर्षे करीत असला तरी, त्या कर्माचें फळ नाशवंत ( क्षीण ) होणारें असतें; कां तर सर्व कर्मफल भोगाचें शेवटीं क्षीण होणा- रच. आणखी ( अशी गोष्ट आहे की), ज्याच्या ज्ञानानें कार्पण्यनाश व संसारविच्छेद होतो, आणि ज्याचें ज्ञान नसलें तर, कर्मकर्ता कृपण ह्मणजे कर्मफलाचाच उपभोक्ता राहून, जन्म- मरणचक्रांत पडून, संसारांत पडतो, तें नियामक अक्षर आहे, ही गोष्ट श्रुति सांगते-- जो कोणी हे गार्गी, हें अक्षर न जाणतां इहलोक सोडून जातो तो कृपण ह्मणावा. किंमत देऊन विकत घेतलेल्या दासाप्रमाणें ( दीन असतो ); पण जो हें अक्षर जाणून हे गार्गी, इहलोक सोडून जातो, तो ब्राह्मण ह्मणावा. ऋचा ११ – हे गार्गी, तेंच हैं अक्षर अदृष्ट ( न पाहिलेलें ) आहे तरी पाहणारें ( द्रष्टृ ) आहे. अश्रुत आहे तरी श्रवण करणारें ( श्रोतृ ), अमत आहे तरी मनन कर णारें मन्तृ, अविज्ञात आहे तरी जाणणारें (विज्ञातृ ) आहे. त्याहून दुसरें-पाहणारें, ऐ- कणारें, मनन करणारें, जाणणारें कांहीं नाहीं. ह्या अक्षरांमध्यें खचित, हे गार्गी, आकाश गोवलेलं आहे. भाष्य - अग्नींत जाळण्याचा व प्रकाश देण्याचा ( स्वाभाविक ) धर्म आहे, त्याप्रमाणे अचेतनांतच नियमन करण्याचा स्वभाव असेल ( अशी शंका येईल ); ह्मणून ( श्रुति ) ह्मणते- 'हे गार्गी, तें च हें अक्षर अदृष्ट ह्मणजे कोणीही न पाहिलेलें, कां तर (तें दृष्टीचा) विषय नाहीं; तरी तें स्वतः ' पाहणारें आहे.' कां तर पाहणें (दृष्टि ) हेंच त्याचें स्वरूप आहे. तसेंच श्रोत्राचा विषय नाही ह्मणून अश्रुत तरी श्रवणस्वरूप असल्यामुळे श्रवण करणारे आहे. त्याप्रमाणें मनाचा विषय नसल्यानें अमत तरी मनन (मति ) रूप असल्यानें तें स्वतः मनन करणारें आहे. तसेंच बुद्धीचा विषय नसल्यामुळे अविज्ञात तरी स्वतः ज्ञानस्वरूप असल्यामुळे जाणणारें आहे. आणखी या अक्षरांहून दुसरें कांहीं पाहणारें नाहीं. हेंच अक्षर सर्वत्र दर्शन- क्रिया करणारें आहे. तसेंच याहून दुसरें ऐकणारें नाहीं; तेंच अक्षर सर्वत्र ऐकणारें आहे. १-—सांख्यमताप्रमाणें अचेतन ( जड ) प्रकृति जगाचें मूळ कारण आहे.