पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६० बृहदारण्यकोपनिषद. [ अ. ३ ब्रा. ८ जातें तें, जे लोक देतात ते व जे लोक दान घेतात ते, यांचा इहलोकींच समागम व वियोग प्रत्य- क्ष दिसत असतो. पुंढचा लाभ तर दिसत नाहीं. तरी दान करणाऱ्या लोकांस दानाचें फल प्राप्त होतें, असें ज्यांस दिसत असतें ते श्रुतिप्रमाण जाणणारे ( दान करणाऱ्या लोकांची ) प्रशंसा करितात. कर्त्याची कर्मफलाशीं गांठ घालणारा व कर्मफलाची वांटणी कशी करावी हें जाणणारा प्रशास्ता ( कोणी तरी ) असल्याशिवाय ती गोष्ट (जन्मांतरींची फलप्राप्ति) होणार नाहीं; कां तर दान करण्याची क्रिया नष्ट झाल्याचें प्रत्यक्ष दिसत असतें. ह्यावरून दान करणाऱ्यांची व फलांची गांठ घालणारा (कोणीतरी ) आहे. (एक) अपूर्व (अदृष्ट अथवा कर्मसंस्कार ह्मणून फल देणारें तत्व ) असतें, असें ह्मणाल तर तसें नाहीं; कारण अपूर्व असल्याबद्दल कांही प्रमाण सांपडत नाहीं. प्रशास्ता (ईश्वर) आहे, यालाहि प्रमाण नाहीं, असें ह्मणाल तर, तसें नाहीं; कारण ( ईश्वर आहे) हें श्रुतीचें ताप्तर्य ( प्रमाण ) सिद्ध आहे; आणि श्रुति नेहमीं सत्य सांगत असतात, असे आह्मीं पूर्वी सांगितलें आहे. शिवाय अशी गोष्ट आहे की अपूर्वाची कल्पना करतांना (ज्या अर्थापत्तिप्रमाणाचें कारण पडतें ) तें अर्थापत्तिप्रमाण, (फलप्राप्ति कांही प्रसंगी ) अन्यरीतीनें होत असल्यामुळे जातें; कारण सेवाकर्माचें फल सेव्य ह्मणजे स्वामी देतो, मध्यें अपूर्व ( कर्मसंस्कार तत्त्व ) उप्तन्न व्हावें लागत नाहीं, ) हें पाहिलें आहे. सेवा ही क्रिया आहे, व सेवेसारख्याच याग, दान, होम वगैरे क्रिया, यांचें सेव्य ईश्वरा- दिकांपासून फल मिळणें योग्य आहे. प्रत्यक्ष (दिसणारें ) क्रियाधर्माचें सामर्थ्य न सोडून देतां फलप्राप्तीची कल्पना बसत असतां, प्रत्यक्ष क्रियांचें सामर्थ्य सोडून देणें योग्य नाहीं. आणि (अपूर्वाची) कल्पना अधिक आहे. ईश्वर कल्पावा, की अपूर्व कल्पावें ? त्यामध्यें (सेवारूप) क्रियेच्या स्वभावामुळे सेव्य ईश्वरापासून फलप्राप्ति होते हैं प्रत्यक्ष दिसतें. अपूर्वापासून फल होतें हैं, व अपूर्व, हीं दोन्ही प्रत्यक्ष दिसत नाहीत. त्यापैकी प्रत्यक्ष नाहीं असें अपूर्व कल्पावें तर त्या अपूर्वाला फल देण्याचें सामर्थ्य आहे हें, आणि सामर्थ्य असून तें फल देतें, इतकें अधीक कल्पावें लागतें; पण आमच्यापक्षी सेव्य ईश्वर आहे इतकेंच कल्पिलें तर, त्याला फल देण्याचें सामर्थ्य आहे, आणि तो देतो, हैं कल्पिण्याचें कारण पडत नाहीं; कारण सेव्य (स्वामी ) पासून फलप्राप्ति होते, हें सर्वांनी पाहिले आहे. द्यावापृथिवी ( ईश्वराचे आज्ञेनें ) बांधलेली आहेत, ( त्यावरून ईश्वर आहे ) इत्यादि दुसरे अनुमानही दाखविले. याप्रमाणेच देव, (स्वतः) समर्थ असून उपजीविकेकरितां यज्ञ करणाराची पाठ धरून भात पुरोडाश वगैरे खाद्य वस्तूंसाठी, इतर रीतीनें जिवंत राहण्याची उत्कंठा (मनांत ) असतांही, हीनदीन वृत्ति धरून राहतात, हें प्रशास्त्याच्या (ईश्वराच्या) आज्ञेनें होत असले पाहिजे. तसेंच १ – परलोकीं होणारा; व आज दिसत नाहीं, पण कांहीं कालानें या लोकींच होणारा, लाभ. अत्युत्कटैः पुण्यपापैरिहैव फलमश्नुते ॥ २ – आज केलेल्या कर्माचें फळ कांहीं काळानें व्हावयाचें झटलें ह्मणजे मध्धें अपूर्व कल्पावें लागतें, ह्णणावें तर सेवा कर्माचें फळ स्वामी देतो. तेव्हां अपूर्वाचें कारण नाहीं.