पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहदारण्यकोपनिषद. [ अ. ३ ब्रा. ८ त्याहन दुसरें मनन करणारें नाहीं; तेंच सर्वत्र सर्वोच्या मनाच्याद्वारे मनन करितें. त्याहून दुसरें जाणणारें नाहीं; सर्वोच्या बुद्धीच्या द्वारें जाणण्याची क्रिया करणारें तेंच अक्षर आहे; अचेतन प्रधान अगर दुसरें कांहीं नाहीं. 'हे गार्गी, खचित ह्या अक्षरांमध्यें आकाश गोवलेलें आहे.' में प्रत्यक्ष व समक्ष ब्रह्म, जो सर्वोतर आत्मा, अशनायादिक संसारधर्माच्या पलीकडे असणारा, ज्यांत आकाश गोवलें आहे, ती) ही पराकाष्ठा, ही परागति, हेंच परब्रह्म, हेंच पृथिव्यादि आकाशापर्यंत सत्याचें सत्य होय. ऋचा १२-- मग त्या गार्गीनें भाषण केलें, हे पूज्य ब्राह्मणांनो, तुह्मी याला नमस्कार करून आपली सुटका करून घेतली असतां, तीच मोठी गोष्ट असें माना. तुमच्यापैकीं या ब्रह्मवादीला जिंकणारा कधीं कोणी निघेल असें नाहीं. इतकें बोलल्यावर वाचक्नवी स्तब्ध राहिली. भाष्य – ' मग त्या गार्गीनें भाषण केलें, हे पूज्य ब्राह्मणांनो, ' माझें ह्मणणे ऐका-'तीच मोठी गोष्ट असें माना ? ती कोणती ? ह्या याज्ञवल्क्यापासून नमस्कारानें तुझी आपली मुक्तता करून घ्यावी हेंच फार असें माना; असा श्रुतीचा अभिप्राय, की ह्याला जिंकिणें मनांत देखील आणणें योग्य नाहीं; मग कृतीनें कोंठून होणार ? कांतर तुमच्यापैकी या ब्रह्मवांदी याज्ञवल्क्याला जिंकणारा कधींही कोणी निघेल असें नाहीं. दोन प्रश्न सागेल तर ( ह्याला तुमच्यापैकी ) कोणी जिंकणारा होणार नाही, अशी मी पूर्वीच प्रतिज्ञा केली आहे, आता ही ब्रह्मवादित्वाच्या संबंध माझी खातरी होत आहे की, या सारखा कोणी नाहीं. 'इतकें बोलल्यावर वाचक्नवी स्तब्ध राहिली. ' 6 आतां (मागील) अन्तर्यामी ब्राह्मणामध्यें असें सांगितलें कीं, ज्याला पृथिवी जाणत नाही, आणि ज्याला सर्वभूतें जाणत नाहीत. (आतां ) ज्या अन्तर्यामीला जाणत नाहींत ( तो परमात्मा ); व जे जाणत नाहीत ( ते क्षेत्रज्ञ.) आणि ( या ब्राह्मणांत ) जें पाहण्याची वगैरे क्रिया करीत असल्यामुळे सर्वांचें चैतन्यरूप बीज आहे, तें अक्षर असें झटलें; पण या ( तिहीं - मध्यें ) फरक काय; किंवा सारखेपणा कोणता ? ह्यासंबंधानें कांही लोक ह्मणतात – महासमुद्रस्थानापन्न परब्रह्मरूप अविकृत अक्षराची किंचित् बदललेली जी अवस्था (तो) अन्तर्यामी, अत्यंत बदललेली अवस्था (तो ) क्षेत्रज्ञ. तो त्या अंतर्यामीला जाणत नाहीं ( असें वर्णन केलें ). ( ह्याशिवाय ) दुसऱ्या अशा पाच अवस्था आहेत, अशी ते कल्पना करितात. मिळून आठ अवस्था ब्रह्माच्या आहेत, असें ह्मणतात. दुसरे ( कांहीं ) लोक (ह्या ) आठ अक्षराच्या शक्ति आहेत असें ह्मणतात; आणि अक्षराच्या अनंत शक्ति आहेत असेंही ह्मणतात. आणि दुसरे तर हे अक्षराचे विकार आहेत असें ह्मणतात. १ – येथें श्रुतीनें अक्षराला विज्ञानक्रियाकर्तृत्व सांगितलें तें अचेतनाला संभवत नाहीं, झणून सांख्य वगैरे अचेतन प्रकृति, कर्म, स्वभाव वगैरे जगाचीं मूळ कारणें आहेत असें ह्मणतात तें अग्राह्य आहे.. २ - - पहा. अध्याय ३ ब्राह्मण ८ ऋचा १-२. आचार्यांच्या मण्डळींपैकीं लोकांचें मत सांगतात. ३ – आचार्यानीं विकारपक्षांत अवयवपक्षाचाही समावेश केला आहे.