पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. ८-९] प्रशास्तृ- अक्षर. घ्याच '-जें हैं अक्षर सर्वान्तर प्रत्यक्ष व समक्ष ब्रह्म, अशनायादि धर्मापलीकडील आत्मा असें जाणलें, - त्या अक्षराच्याच आज्ञेमध्यें, जसें राजाच्या आज्ञेमध्ये राज्य फुटून न जातां आकळलेले असतें, तसें या अक्षराच्याच हुकमानें, हे गार्गी, सूर्यचंद्र दिवसां व रात्री लोकांनां दिव्यासारखे (उपयोगी पडत आहेत), व त्या (उपयोगाकरितां) त्यांजपासून (हैं) लोककार्य होईल असें आण- पाया नियन्त्याने सर्व साधारण प्राणिमात्रांस प्रकाशद्वारा उपयोगी असल्यामुळे, लौकिक दि- व्याप्रमाणें निर्माण केलेले असावेत; ह्मणून तें (अक्षर) आहे, आणि त्या अक्षरानें (ते सूर्यचंद्र ) ऐश्वर्ययुक्त व स्वतंत्र आहेत तरी, बांधलेले राहतील असे केले आहेत. नेमका काल (गतिकाल) देश (कक्षा ), निमित्त (अदृष्टे), उदय, अस्त, वृद्धि, क्षय हे त्यांस आहेत; यावरून त्यांचें प्रशा- सन करणारें अक्षर, दिवे (असले ह्मणजे त्यांचा ) लावणारा व सांभाळणारा ( असतो त्या) प्रमाणें, आहेच. 'गार्गी, ह्या अक्षराच्याच नियमनानें द्यावापृथिवी' (हीं बांधलेली आहेत). धुलोक आणि पृथिवी अवयवघटित असल्यामुळे फुटून जाण्याच्या स्वभावाचीं, जड असल्यामुळे पतन पावणारी, संयुक्त असल्यामुळे वियोगास पात्र, आणि सचेतन अभिमानी देवतांनी युक्त असल्या- मुळे स्वतंत्र आहेत, तरी त्या अक्षराच्या आज्ञेत 'विधृत (बांधलेली ) राहतात. हें अक्षर सर्वांच्या व्यवस्थेचें बंधन (सेतु ) ह्मणजे सर्वोस मर्यादेत ठेवणारे आहे; ह्मणून ह्या अक्षराची आज्ञा द्यावापृथिवी उल्लंघन करीत नाहीत. ह्यावरून अक्षराचे अस्तित्व सिद्ध झालें. ( द्यावापृथिवी अखंड बंधनामध्ये आहेत), हें (अक्षराच्या अस्तित्वाचें ) ज्ञापक निर्दोष (अपवाद - रहित ) आहे. कोणी तरी संसार (बंधन) रहित, चेतन प्रशासिता (नियन्ता ) असल्याशिवाय हें ( सर्व जगाला ताब्यांत ठेवणें ) घडावयाचें नाहीं. " ज्याच्यामुळे स्वच्छंदी धुलोक व दृढ पृथ्वी " ( नियंत्रित झाली आहे), अशी श्रुति आहे. 'गार्गी, ह्या अक्षराच्या नियमनानें मेषोन्मेष, मुहूर्त' हीं कालमानें सर्व भूत, भविष्य, वर्तमान, उत्पत्तिमान् (जगताचें ) आकलन करणारी आहेत. उदाहरण, लोकांमध्ये मालकानें नेमलेला हिशेबनवीस सर्व जमाखर्च सावधगिरीनें करितो, त्याप्रमाणें मालकाच्या स्थानी असणारें (अक्षर) या कालभागांचा नियन्ता आहे. तसेंच ' प्राच्य ' ह्मणजे पूर्वदिशेकडे जाणाऱ्या ( बर्फाच्या पांघरुणानें सफेद झालेल्या) श्वेत-हिमालय वगैरे-पर्वतांपासून निघणाऱ्या गंगादि नद्या वाहत जातात; (पण ) जशी त्यांच्या प्रवाहाची योजना केली आहे, तशाच त्या नेमक्या जातात; अन्य दिशेला त्यांचा वाहण्याचा कल असतो तरी, ( ह्या नद्या नियमाप्रमाणें वाहत आहेत). हें (कोणी तरी ) नियमन करणारा अस- ल्याचें ज्ञापक आहे. दुसन्या 'प्रतीच्य' ह्मणजे पश्चिमेकडे जाणाऱ्या सिंधु आदिकरून नद्या पश्चिमेकडेच वाहतात; व इतर नद्या ज्या ज्या दिशेकडे गेल्या ती ती दिशा कधीं सोडीत नाहीत, हेंही (नियन्ता असल्याचें ) ज्ञापक आहे. आणखी अशी गोष्ट आहे कीं, आपली अडचण करून सुवर्ण वगैरे (दुसऱ्यांस दान कर- णाऱ्या लोकांची शहाणे लोक देखील प्रशंसा करितात. ह्या दानाच्या बाबतीत जें कांहीं दान केलें १ - प्राणिमात्राच्या अदृष्टाप्रमाणे उत्पत्ति स्थिति नाश व ग्रहग्रस्तपणा सूर्यचंद्राचे पाठीस लागला आहे. २ -- “ज्यानें द्युलोक धरिला आहे, ज्यानें स्वर्ग (धरिला आहे ), जो अन्तरिक्षांतील परमाणु मोज- णारा आहे, कोणत्या देवाला हविर्भाग देऊन आह्मी पूजावें. " अशीहि श्रुति आहे. ऋग्वेद मंडल १०४