५८ बृहदारण्यकोपनिषद. [ अ. ३. ब्रा. ८ स्थूल नाहीं, ह्मणजे स्थूलाहून भिन्न आहे. असें आहे तर अणुरूप ( असेल). 'अणुरूप नाहीं.' तर मग हस्व ( आंखूड ) असेल. 'हस्व नाहीं. ' तदभावीं दीर्घ (लांब ) असावें तर 'दीर्घ नाही. ' ह्या चारी परिमाणांचा निषेध केल्यानें द्रव्यधर्माचा निषेध केला ह्मणून तें अक्षर द्रव्य नव्हे असें निष्पन्न होतें. द्रव्य नव्हे तर, आरक्तता गुण असेल ( ह्मणावें तर) त्याहूनही निराळें आहे. आरक्तता नव्हे.' आरक्तता अग्नीचा गुण आहे. तर उदकांतील स्निग्धता असेल. नाहीं. ' स्नि- ग्धता नव्हे; ' तर छाया (प्रतिबिंब ) ह्मणूं. पण ब्रह्माचा मुळींच ( अंगुलि ) निर्देश करितां येत नाहीं; ह्मणून छायेहूनही तें निराळें आहे. 'छायारूप नव्हे ' तर अंधकार घ्या, “अंधकार नव्हे.” वायु म्हणावा तर ' वायु नव्हे.' आकाश ह्मणावें तर 'आकाश नव्हे. 'लाखेप्रमाणें संगमनधर्मवि- 6 ' ५ , 66 शिष्ट तरी असेल. नाही. 'असंग आहे.' रस असें ( म्हणावें ) तर 'रस नव्हे;' आणि गन्ध असें ( म्हणावें ) तर 'गन्ध नव्हे. ' डोळा असें (ह्मणावें ) तर 'डोळस नव्हे; ' कारण, त्याला नेत्रे- न्द्रिय नाहीं. ' डोळे नसून पाहतो' अशी श्रुति आहे. “ तो कान नसून ऐकतो " ह्या श्रुतीवरून कर्णयुक्त नव्हे. " वाणी असेल, (ह्मणावें ) तर "वाणी त्याला नाही." तसेच 'त्याला मन नाहीं;' आणि त्याला तेज नाहीं; तें 'तेजरहित' कारण अभ्यादिकांना प्रकाश असतो, तसा प्रकाश त्याला नाही. 'त्याला प्राण नाहीं. ' प्रांण नाहीं या शब्दांनी शारीरिक वायूचा निषेध केला आहे. मुखद्वार असेल (ह्मणावें ) तर त्याला 'मुख नाहीं.' 'परिमाण नाहीं. 2 ज्यानें मोजलें जातें तें परिमाण, तद्रूप तें नाहीं; व त्यानें कांहीं मोज़लें जात नाहीं. पोकळीप्रमाणें आहे म्हणावें तर 'त्याला अभ्यन्तर नाहीं.' त्याला बहिर्भाग असेल ह्मप्पावें तर 'त्याला बहिर्भाग नाहीं.' तें खाणारें असेल (म्हणावें ) तर तें कांहींच खात नाहीं. कोणाचें तरी खाद्य असेल ह्मणावें तर त्याला कोणी खात नाहीं. त्याला कोणतेंच विशेषण देतां येत नाहीं, असा अभिप्राय आहे; कारण एकच द्वितीयरहित आहे तर तें कोणत्या विशेषणानें विशिष्ट करितां येणार ? ऋचा ९ – गार्गी, ह्या अक्षराच्याच आज्ञेमध्यें सूर्य, चंद्र विधृत ( पूर्ण बांधलेले ) राहतात. गार्गी, ह्या अक्षराच्याच नियन्त्रणाने द्यावापृथिवी विधृत राहतात. गार्गी, ह्या अक्षराच्याच नियमनानें मेषोन्मेष, मुहूर्त, दिवस, रात्र, पक्ष, मास, ऋतु, संवत्सर हे वि- धृत राहतात. गार्गी, ह्या अक्षराच्याच नियमनानें श्वेतपर्वतांपासून निघून कांहीं नद्या पूर्वेकडे, कांहीं पश्चिमेकडे, आणि दुसऱ्या ज्या ज्या दिशेकडे गेल्या असतील तिकडे तिक- डेंच, वाहत आहेत. गार्गी ह्या अक्षराच्याच नियमनानें मनुष्यें दान करणारांची, देव यज्ञ करणारांची, पितर दवी (पळी) ची पाठ धरून प्रशंसा करितात. भाष्य – अनेक विशेषणें घेऊन ती त्याला लावितां येत नाहींत. असें प्रयासानें दाखवून अक्षराचें अस्तित्व तर श्रुतीवरून जाणविलें. तथापि लोकदृष्टीनें ज्या अर्थी शंका घेतली आहे, त्या अर्थी अक्षराचें अस्तित्व सिद्ध करण्याकरितां अनुमानप्रमाणाचा आरंभ आहे – 'ह्या अक्षरा- १–' पश्यत्यचक्षुः' श्वे. -३-१९. ३ – पूर्वी वायूचा निषेध केला आहे, अशी शंका येईल ह्मणून हें भाष्य आहे. २ –' स शृणोत्यकर्णः ' श्वे, ३-१९ तर प्राणही वायु असल्यामुळे त्याचा पुनः निषेध कां केला ४--दोन घटिकांनां मुहूर्त ह्मणतात.
पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/६७
Appearance