पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. २-८] प्रशास्तृ- अक्षर. ५७ ऋचा ६ — ती ह्मणाली, याज्ञवल्क्या, जें झुलोकाच्यावर आहे, जें पृथ्वीच्या खा- लीं आहे, दोहोंच्या दरम्यान आहे, आणि द्यावापृथ्वी हीं दोन्हीं तेंच, व ज्यास भूत, वर्त- मान, व भविष्य असें ह्मणतात, तें कशांत गोंवलेलें आहे ? ऋचा ७—तो ह्मणाला, हे गार्गी, जे झुलोकाच्यावर, पृथ्वीच्या खालीं, दोहोंच्या दरम्यान, व जे द्यावापृथिवी हीं दोन्हीं, आणि ज्याला भूत, वर्तमान, भविष्य असें ह्मण- तात, तें आकाशांतच गोवलेले आहे. आकाश कशांत गोवलेलें आहे ? , भाष्य - बाकी व्याख्यान (तिसऱ्या व चवथ्या ऋचेवर ) झालें. ती ह्मणाली, 'याज्ञव लक्या, ज़ें वर, वगैरे. (गार्गीचा) प्रश्न व याज्ञवल्क्याचें उत्तर ही पूर्वी झाली. त्यांत सांगितलेला आशय पक्का ध्यानांत राहण्याकरितां तीं पुनः आली आहेत. ह्यांत नवें कांहीं सांगितलेलें नाहीं, गार्गीनें ह्मटलेलें जसेंच्या तसे उच्चारून पूर्वी दिलेले उत्तरच याज्ञवल्क्यानें निश्चयपूर्वक 'आका- शामध्येंच' असें सांगून दिलें, गार्गी ह्मणते----' आकाश कशांत गोवलेले आहे; ' अव्यक्त आकाशच अगोदर कालत्रया- पलीकडे असल्यामुळे तें सांगणे कठीण आहे. ज्यांत आकाश गोंवलेले आहे तें अक्षर तर त्याहून ज्यास्त दुर्बोध आहे; त्यामुळे तें शब्दप्रतिपाद्य नाही. या कारणामुळे तें समजत नाहीं; ( ह्मणून अप्रतिपत्ति दोष येतो), ती अप्रतिपत्ति (अनवगम्यता) न्यायशास्त्रांत निग्रहस्थान (वादीला अडविण्याची जागा) आहे. आतां अवाच्य वस्तु ही याज्ञवल्क्य सांगेल तर विप्रतिपत्तिनामक दोष येईल. विप्रतिपत्ति ह्मणजे विरुद्ध प्रतिपादन. अवाच्य असून सांगणें ( ही विप्रतिपत्ति होते ); झणून ( आपला ) प्रश्न सांगणें फार कठीण आहे असें गार्गी समजत होती. ऋचा ८ - तो ह्मणाला, गार्गी, त्याला ब्राह्मण अक्षर ह्मणतात. तें स्थूल नाहीं, अणुरूप नाहीं; ऱ्हस्व ( आंखूड ) नाहीं, दीर्घ (लांब ) नाहीं, आरक्तता नव्हे, स्निग्धता नव्हे, छायारूप नव्हे, अंधकार नव्हे; वायु नव्हे, आकाश नव्हे; असंग आहे, रस नव्हे, गन्ध नव्हे, डोळस नव्हे, कर्णयुक्त नव्हे, वाणी नव्हे, मन नव्हे; तेजयुक्त नव्हे, प्राण नव्हे; त्याला मुख नाहीं, परिमाण नाहीं; त्याला अभ्यन्तर नाहीं, बहिर्भाग नाहीं; तें कांहीं खात नाहीं, व त्याला कोणी खात नाहीं. भाष्य – (अप्रतिपत्ति व विप्रतिपत्ति ) हे दोन्हीं दोष दूर करण्याच्या इच्छेनें (याज्ञवल्क्य) ह्मणतो --- तो याज्ञवल्क्य ह्मणाला, आकाश कशामध्यें गोवलेलें आहे असें तूं विचारलेंस, तें हेंच. तें कायतर, अक्षर. अक्षर ह्मणजे जें कधीं क्षय किंवा क्षरण पावत नाहीं. हे गार्गी, त्याला ब्रा- ह्मण ह्मणजे ब्रह्मज्ञानी अक्षर ह्मणतात. ब्राह्मणांचें ह्मणणे सांगून मी अवाच्य वस्तु सांगणार नाहीं, किंवा न समजतां सांगणारा नाहीं, हें सुचवून (अप्रतिपत्ति व विप्रतिपत्ति) दोन्हीं दोष याज्ञव- ल्क्यानें उडविले. अशा प्रकारें प्रश्नाचें उत्तर झाल्यावर - जें ब्राह्मण सांगतात तें अक्षर कोणतें तें सांग-असा गार्गीचा पोटप्रश्न कल्पावा, तो प्रश्न आल्यावरून ( याज्ञवल्क्य ) उत्तर देतो--तें