पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहदारण्यकोपनिषद. [ अ. ३ ब्रा. ८ पीडा करणारें-हें विशेषण आहे-हातांत घेऊन अंगावर धांवत येतो, त्याप्रमाणेंच मी बाणाऐवजी दोन प्रश्न घेऊन तुजजवळ उभी राहिल्यें आहें. तूं ब्रह्मज्ञानी असलास तर त्यांची उत्तरें दे. याज्ञ- वल्क्यानें उत्तर दिलें; गार्मी, विचार. ऋचा ३ —ती ह्मणाली, याज्ञवल्क्या, जें झुलोकाच्या उर्ध्वभागीं आहे, जें पृथ्वी- च्या अधोभागीं आहे, जे द्युलोक आणि पृथ्वी यांच्या मध्यभागी आहे, आणि द्यावापृथ्वी हीं दोन्हीं तेंच, व ज्याला भूत, वर्तमान, भविष्य ह्मणतात तें कशांत गोंवलेलें आहे ? भाष्य – ' ती ह्मणाली' द्युलोकाच्या ऊर्ध्वभागी ह्मणजे ब्रह्मांडाच्या वरच्या शकलाच्या वर जें आहे, आणि जें पृथ्वीच्या ह्मणजे ब्रह्माण्डाच्या खालच्या शकलाच्या खाली आहे, जें द्यावापृथ्वी यांच्या मध्यभागी आहे, आणि जें द्यावापृथ्वी ही दोन्हीं, आणि जें भूत ह्मणजे झालेलें, वर्तमान ह्मणजे स्वतःचा व्यापार चालू ठेवणारें, भविष्य ह्मणजे वर्तमानाच्या पुढच्या काळीं होणाऱ्या चिन्हां वरून कळणारें; — जें हें सर्वश्रुतीवरून सांगण्यांत येतें— तो सर्व द्वैतस- मुदाय ज्या (सूत्रा) मध्यें एक होतो - असें तात्पर्यानें घ्यावें- तें पूर्वी ( ब्रा. ७ ऋ. १ ) सांगि- तलेलें सूत्र, उदकांत जशी पृथ्वी गोंवलेली असतें, तसें कोणत्या वस्तूंत गोंवलेलें आहे ? ऋचा ४ — तो ह्मणाला, हे गार्गी, जें द्युलोकाच्या वर, पृथ्वीच्या खालीं, व दोहोंच्या दरम्यान असतें, व द्यावापृथिवी हीं दोन्हीं तेंच, आणि ज्याला भूत, वर्तमान, भविष्य असें ह्मणतात, तें आकाशांत गोंवलेले आहे. भाष्य – तो दुसरा ( याज्ञवल्क्य ) ह्मणाला- हे गार्गी, जें तूं द्युलोकाच्या वर इत्यादि ह्मणतेस तें सर्व ह्मणजे ज्याला सूत्रात्मा ह्मणतात, तें सूत्र आकाशांत सर्वत्र ओंवलेले आहे. जें हैं व्यक्त झालेलें सूत्ररूप जगत् अव्यक्त आकाशांमध्यें, ज्याप्रमाणें पृथ्वी तिन्हीं काळीं ह्मणजे उत्पन्न होतांना, वर्तमानकाळी, व लयकाळी उदकांत व्यापलेली असते, त्याप्रमाणें गोंवलेलें आहे. -ती ह्मणाली–याज्ञवल्क्या, ज्या अर्थी तूं मला हा प्रश्न सांगितलास, त्या अर्थी तुला नमस्कार असो. आतां दुसरा प्रश्न ऐकण्यास तयार हो. गार्गी, विचार, ऋचा ५. - - भाष्य – पुनः ती ह्मणाली ' तुला नमस्कार असो' वगैरे वाक्य प्रश्न फार कठीण होता असें दाखविण्याकरितां आहे. ज्या अर्थी तूं माझा हा प्रश्न चांगला सांगितलास, त्या अर्थी तूं म- जवर उपकार केला आहेस. हा प्रश्न सांगणे कठीण होतें, याचें कारण सूत्रच आधीं दुसन्यास समजणें कठीण, व सांगणे कठीण; तर मग तें सूत्र अमुकांत गोंवलेले आहे, हे सांगणे किती क- ठीण आहे ? मी तुला नमस्कार करिते. दुसरा प्रश्न ऐकण्यास चांगला तयार हो असें (ह्मणण्या- चा गार्गीचा ) आशय आहे. दुसऱ्या बाजूनें याज्ञवल्क्यानें हे गार्गी, प्रश्न कर, असें झटलें. १ – मध्यभागीं जें अन्तरिक्ष आहे त्याचाहि ऋचेनें संग्रह केला आहे. अन्तरिक्षाचा संग्रह नाहीं असें मॉक्समुल्लरास ( Max Muller ) कां वाटतें तें कळत नाहीं.