पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. १०-२४ ] अन्तर्यामी. ऋचा १७ — जो वाणींत राहून वाणीच्या अंतर्भागीं आहे; ज्याची वाचेला ओळख नाहीं; वाणी हें ज्याचें शरीर आहे; व जो वाणीला आंत राहून नियंत्रित करितो; तो तुझा आत्मा अन्तर्यामी अमृत. 3 ऋचा १८ - जो डोळ्यांत राहून डोळ्यांच्या आंत आहे; ज्याला डोळा जाणत नाहीं, ज्याचा डोळा हें शरीर आहे; व जो डोळ्याच्या आंत राहून त्याचें नियमन करितो; तो तुझा आत्मा अन्तर्यामी अमृत. - ऋचा १९ – जो कानांत राहून कानाच्या आंत आहे; कान ज्याला जाणत नाहीं; कान ज्याचें शरीर आहे; व जो कानाच्या आंत राहून कानांचे नियमन करितो; तो तुझा आत्मा अन्तर्यामी अमृत. ०- ऋचा २० - जो मनांत राहून मनाच्याही आंत आहे; ज्याची मनाला ओळख नाहीं; मन हे ज्याचें शरीर आहे; व जो मनांत राहून मनाचें नियमन करितो; तो तुझा आत्मा अन्तर्यामी अमृत. ऋचा २१ – जो त्वचेंत राहून त्वचेच्या आंत आहे. त्वचा ज्याला जाणत नाहीं; व त्वचा ज्याचें शरीर आहे; जो आंत राहून त्वचेचें नियमन करितो; तो तुझा आत्मा अ- न्तर्यामी अमृत आहे. ऋचा २२–जो विज्ञानांत राहतो, व विज्ञानाच्या अंतर्भागीं आहे; विज्ञान त्याला जाणत नाहीं; विज्ञान ज्याचें शरीर आहे; जो विज्ञानाच्या आंत राहून विज्ञानाचें नियमन करितो; तो हा तुझा आत्मा अन्तर्यामी अमृत. ऋचा २३ – जो रेतांत राहून रेताच्या अन्तर्भागी आहे; रेत ज्याला जाणत नाहीं; रेत ज्याचे शरीर आहे; जो रेताच्या आंत राहून रेताचें नियमन करितो; तो तुझा आत्मा अन्तर्यामी अमृत. भाष्य – आतां अध्यात्म – जो प्राणांत ह्मणजे प्राणवायुसहित नाकांत, जो वाणींत, डोळ्यांत, कानांत, मनांत, त्वचेंत, विज्ञानांत ह्मणजे बुद्धीमध्यें, व रेतांमध्यें ह्मणजे उत्पादक बीजांमध्यें ( अन्तर्यामी राहतो ) असें वर्णन झालें. उपसंहार. ऋचौ २४ – अदृष्ट ( न पाहिलेला), द्रष्टा (पाहणारा), अश्रुत ( न ऐकलेला ), श्रोता (ऐकणारा), अमत ( कोणी मनन न केलेला ), मन्ता (मनन करणारा ), अवि- १ – माध्यंदिन शार्खेत विज्ञानाऐवजी आत्मा ( जीवात्मा ) घातला आहे. २ - ही ऋचा संस्कृत पोथ्यांतून ऋचा २३ चें पोटांत घातलेली आहे; पण विषय निराळा असल्यामुळे निराळ्या ऋचेचा जास्त आकडा घालणें विशेष सोयीचें आहे.