पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहदारण्यकोपनिषद. [ अ. ३ ब्रा. ७ ऋचा १०-- जो दिशांत राहून दिशांच्या पोटांत आहे, ज्याला दिशा ओळखीत नाहीत, ज्याचें दिशा शरीर आहे; जो दिशांच्या आंत राहून दिशांचेंही नियमन करितो तो तुझा अमृत आत्मा अन्तर्यामी. ऋचा ११ --जो चंद्रतारकांत राहून चन्द्रतारकांच्या अन्तर्भाग आहे; ज्याला चंद्रतारका जाणत नाहींत; ज्याचें चंद्रतारका शरीर आहे; व जो चंद्रतारकांच्या अन्तर्भागीं; राहून त्यांस ( नियमित कक्षा ) नेमून देतो; तो तुझा अविनाशी आत्मा अन्तर्यामी होय. ऋचा १२ – जो आकाशांत राहून आकाशाच्याही पोटांत आहे; आकाश ज्याला जाणत नाहीं; आकाश ज्याचें शरीर आहे, व जो आकाशाच्याही अभ्यन्तरीं राहून आकाशाचें नियमन करितो; तो तुझा आत्मा अन्तर्यामी अमृत होय. १३- - जो अन्धकारांत रहात असून अंधकाराच्याही अन्तर्भाग आहे; ज्याला अन्धकार जाणत नाहीं; अन्धकार ज्याचें शरीर आहे, व अन्धकारांत राहून त्याचें नियमन करितो; तो तुझा आत्मा अन्तर्यामी अमृत. ऋचा १४.—जो तेजांत राहतो व तेजाचें अन्तर्भागी आहे, जो तेजाला अविदित आहे; तेज ज्याचें शरीर आहे; जो तेजांत राहून त्याचें नियमन करितो; तो तुझा आत्मा अन्तर्यामी अमृत. येथपर्यंत आधिदैवत ह्मणजे देवतासंबंधानें झालें. भाष्य – इतर ( तिसरे ऋचे) सारखें. जो उदकांत, अग्नीत, अंतरिक्षांत, वायूंत, सु- लोकांत, आदित्यांत, दिशांत, चंद्रतारकांत, आकाशांत, अंधकारांत ह्मणजे जो बाह्य अंधकार ( दृष्टीचें ) आच्छादन करितो त्यांत, तेजांत ह्मणजे अंधकाराला उलट बाह्य जो जो प्रकाश आहे त्यांत राहतो, असें आधिदैवत ह्मणजे देवतांमध्यें अन्तर्यामी आहे, असें वर्णन झालें. अन्तर्यामीपैकी आधिभौतिक काण्ड. आतां अधिभत ह्मणजे भूताच्या संबंधानें. - ऋचा १५ – जो सर्वभूतांमध्ये राहून सर्व भतांच्या अभ्यंतरांत आहे; पण ज्याची सर्व भतांना ओळख नाहीं; सर्व भूतें ज्याचें शरीर आहे, जो सर्व भूतांत राहून त्यांचा नियन्ता आहे; तो तुझा आत्मा अन्तर्यामी अमृत. हे अधिभूत प्रकरण झालें. 3 भाष्य - 'आतां अधिभूत — अधिभत ह्मणजेब्रह्मादि तृणापर्यंत भूतांमध्यें अन्तर्यामी पहाणें हें अधिभूत. अन्तर्यामीपैकी अध्यात्मिक काण्ड. आतां अध्यात्म ह्मणजे शरीराविषयी. ऋचा १६. – जो प्राणांत राहून प्राणाच्या पोटांत आहे; ज्याला प्राण जाणत नाहीं; प्राण हे ज्याचें शरीर आहे; जो प्राणाचे अन्तर्यामीं राहून त्याचें नियमन करितो; तो तुझा आत्मा अंतर्यामी अमृत.