पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. २-९] अन्तर्यामी. असें 'जाणत नाहीं, ' ' ज्याचें पृथ्वी शरीर' ह्मणजे पृथ्वी हेंच शरीर आहे, दुसरें नाहीं. पृथ्वी देवतेचें जें शरीर तेंच ज्याचें शरीर. शरीर शब्द दिग्दर्शनाकरितां आहे-ह्मणजे, पृथ्वीचीं जीं इंद्रियें तींच त्याची इंद्रियें; पृथ्वी देवतेचें जें शरीर व जीं इंद्रियें तीं पृथ्वीच्या कर्माची फळे आहेत; तींच ह्याची ( अंतर्यामीची); कां तर, अन्तर्यामी स्वतः अक्रिय ( कर्म न करणारा ) नित्यमुक्त आहे. इतरांचें हित करावें असा त्याचा स्वभाव आहे, ह्मणून इतरांचें जें शरीर व इंद्रियें तींच त्याचीं. त्याला स्वतःचें नाहीं त्यावरून (श्रुति ) ह्मणते – 'ज्याचें पृथ्वी शरीर आहे. ' देवतांची शरीरें व इंद्रियें यांच्या क्रिया ईश्वराचें फक्त साक्षित्वेंकरून सान्निध्य अस- ल्यामुळे नियमानें चाळूं किंवा बंद असतात. असा जो नारायण नांवाचा ईश्वर (तो) पृथ्वीला णजे पृथ्वी देवतेला तिच्या पोटांत राहून तिच्या स्वतःच्या क्रियांकडे लावितो. जो तूं अन्तर्यामी विचारलास ‘तो हा तुझा आत्मा.' हें ह्मणणें- तुझा, माझा, सर्वभूतांचा अशा दिग्द- र्शनाकरितां आहे. अमृत ह्मणजे सर्व संसारधर्मरहित ( अविनाशी ) असा. ऋचा ४ - जो पाण्यांत राहून पाण्याच्या आंत आहे; ज्याला पाणी जाणत नाहीं, ज्याचें पाणी हें शरीर आहे; जो पाण्याच्या आंत राहून पाण्याचें नियमन करितो; तो हा तुझा आत्मा अविनाशी अन्तर्यामी. ऋचा ५ - जो अनींत राहून अग्नीच्या आंत असतो; ज्याला अग्नि जाणत नाहीं; ज्याचें अग्नि हें शरीर आहे; व जो अग्नीच्या आंत राहून त्याचें नियमन करितो; तो हा तुझा अविनाशी अन्तर्यामी आत्मा. ऋचा ६ - जो अन्तरिक्षांत राहत असून अंतरिक्षाच्या अभ्यंतरी आहे; ज्याला अंतरिक्ष जाणत नाहीं; अन्तरिक्ष ज्याचें शरीर आहे, व जो अन्तरिक्षाच्याही आंत राहून त्याचें नियमन करितो; तो तुझा आत्मा अन्तर्यामी अमृत आहे. ऋचा ७ - - जो वायूंत राहून वायूच्या अन्तर्भाग आहे; ज्याला वायु जाणत नाहीं; ज्याचे वायु हें शरीर आहे, व जो वायूच्या अगदीं आंत राहून वायूचें नियमन करितो; तो तुझा आत्मा अन्तर्यामी अमृत आहे. ऋचा ८- - जो धुलोकांत (गन्धर्वलोकांत ) राहून धुलोकाच्या मध्यबिंदूंत आहे; ज्याला द्युलोक जाणत नाहीं; ज्याचें युलोक शरीर आहे, व जो द्युलोकाच्या पोटांत राहून त्याचें नियंत्रण करितो; तो हा तुझा अविनाशी आत्मा अन्तर्यामी ह्मणावा. ऋचा ९ – जो आदित्यांत राहणारा, आदित्याच्या आंत असणारा; ज्याला आ- दित्य जाणत नाहीं; आदित्य ज्याचें शरीर आहे; व जो आदित्याच्या आंत राहून त्याचें नियमन करितो; तो हा तुझा अमृत अन्तर्यामी आत्मा होय.