पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहदारण्यकोपनिषद. [ अ. ३ ब्रा. ७ निघून गेल्यावर ) पुरुषाला प्रेत ( गेला ) ह्मणतात. त्याचीं अंगें अस्ताव्यस्त ( ढिलीं ) होतात; कारण, गौतमा, वायुरूपसूत्रानें ( अंगें ) बांधलेली असतात. याज्ञवल्क्या, असेंच हें. ( आतां ) अंतर्यामी सांग. 6 भाष्य–त्या याज्ञवल्क्यानें उत्तर दिलें. हल्लीं जशी उदकांत पृथिवी गोंवलेली आहे, त्याप्रमाणे ज्यांत ब्रह्मलोक गोंवलेले आहेत, तें श्रुतीनें कळणारें सूत्र सांगावयाचें आहे त्यासाठी निराळा प्रश्न केला. ह्मणून त्याचा निर्णय करण्याकरितां ( याज्ञवल्क्य ) ह्मणतो, गौतमा, तें सूत्र वायूच होय; दुसरें कांहीं नाहीं. वायु ह्मणजे-आकाश ज्याप्रमाणे पृथिव्यादिकांस धरून आहे त्याप्रमाणें. एक सूक्ष्म तत्व आहे. आणि तद्रूप सतरा प्रकारांचा लिंग ( देह असतो ). त्यांत प्राण्यांच्या कर्मवासना राहतात, असें जें समष्टिव्यष्टिरूप आहे, त्याचे बाह्यात्कारी भेद समुद्राचे लाटांप्रमाणे- - एकूणपन्नास मरुद्गण आहेत. त्या वायुरूप तत्वाला सूत्र ह्मटलें आहे. गौतमा ( प्राण ) वायुरूप सूत्रानेंच हा लोक, परलोक, व सर्व भूतें संग्रथित आहेत, ही गोष्ट प्रसिद्ध आहे; आणि लोकांत प्रसिद्धि कशी आहे तर, ज्या अर्थी वायु सूत्र आहे आणि वायूनें सर्व धरलें आहे, त्या अर्थी (च) गौतमा, पुरुषाला प्रेत ( गेला ) ह्मणतात; ( कारण त्यावेळी ) त्याची सर्व अंगें विस्रस्त ह्मणजे शिथिल (गळ्हाटलेली) असतात. (माळेतील ) दोरा काढला ह्मणजे मणी वगैरे सर्व वस्तु ओंवलेल्या असतात, त्या गळून पडतात, हें पाहिलेंच आहे. त्याप्रमाणें वायु हा दोरा असन त्यांत मण्याप्रमाणें पुरुषाची अंगें ओवलेली असतील तर वायु निघून गेला ह्मणजे अंगें शिथिल होणें योग्यच आहे. ह्मणून गौतमा वायुरूप सूत्रानें अंगें बांधलेली असतात असा सिद्धांत (श्रुति ) सांगते. " ' याज्ञवल्क्या असेंच हैं; ' सूत्र बरोबर सांगितलेंस. आतां त्या सूत्राचेही आंत, त्या सूत्राचें नियमन करणारा अन्तर्यामी आहे तो सांग, असें ह्मटल्यावरून याज्ञवल्क्य सांगतो. अंतर्यामीपैकी आधिदैवत काण्ड. - ऋचा ३ - जो पृथ्वीमध्ये राहतो, पृथ्वीच्या आंत आहे; ज्याला पृथ्वी जाणत नाहीं, ज्याचें पृथ्वी शरीर आहे, जो आंत राहून पृथ्वीचें नियमन करतो; तो हा तुझा अविनाशी आत्मा अन्तर्यामी होय. भाष्य- ‘जो पृथ्वीमध्यें राहतो' तो अन्तर्यामी. सर्व कांहीं पृथ्वीवर राहतें ह्यामुळे सर्व वस्तूंना अन्तर्यामी शब्द न लागावा ह्मणून ( पुढील ) स्पष्टता केली आहे. पृथ्वीच्या आंत आहे असें ह्मटलें तरी ( पृथ्वीच्या आंत असणारी ) पृथ्वी देवताच अन्तर्यामी, असे होईल, ह्मणून श्रुति ह्मणते --' ज्या' अन्तर्यामीला 'पृथ्वी' देवता देखील, मजमध्यें दुसरा कोणी आहे १ – वेदांतसार-पांच प्राण, पांच ज्ञानेंद्रियें, पांच कर्मेंद्रियें, मन, व बुद्धि मिळून सतरा तत्वांचा, लिंगदेह बनतो. आनंदगिरि–पंचभूतें, दहा बाह्येद्रियें, प्राण, व अंतःकरण.