पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपोद्धात. ट ह्याप्रमाणें यज्ञादिक नित्य कर्मामध्ये त्या त्या प्रसंगी त्या त्या ऋत्विजांविषयीं, ऋचा विषयीं, आहुतीविषयीं, व इतर कर्माविषयी अलौकिक देवतादृष्टि व समजूत ठेविली असतां स्वर्गप्राप्तिरूप मुक्ति व अतिमुक्ति प्राप्त होते, असा या ब्राह्मणाचा सारांश आहे. ब्राह्मण २, आर्तभाग ऋषीनें प्रश्न केला की, एकंदर कर्माशी आपला जो संबंध आहे तो कित्येक ग्रहांनी व अतिप्रहांनी उत्पन्न केलेला आहे, आणि हे प्रहातिग्रह जर मुत्युरूप संसारसंबंधाला कारण आहेत, तर ते ग्रह व अतिग्रह किती आहेत ? व त्यांपासून मुक्ति व अतिमुक्ति कशी होईल. याज्ञवल्क्यानें उत्तर दिले की, ग्रह आठ, व अतिग्रह आठ आहेत. ( १ ) घ्राणेन्द्रिय ग्रह अपान वायुरूप अतिग्रहानें बद्ध असून गन्धज्ञान देतो. ( २ ) वाणी हा ग्रह असून संज्ञारूप शब्दातिग्रहानें बद्ध आहे, त्यांचे योगानें शब्दज्ञान होतें. ( ३ ) जिव्हा हा ग्रह असून रसज्ञान देण्यास रस अतिग्रह आहे. ( ४ ) नेत्र हा ग्रह असून रूपज्ञान देणारें रूप हा अतिग्रह आहे. ( ५ ) कान हा ग्रह असून ध्वनिज्ञान देणारा ध्वनि हा अतिग्रह आहे. ( ६ ) मन हा ग्रह असून कामाभिनिवेश उत्पन्न करणारा काम अतिग्रह आहे. (७) हात हा ग्रह असून क्रियाशक्ति देणारा कर्मरूप अतिग्रह आहे. (८) त्वचा हा ग्रह असून स्पर्शज्ञान देणारा स्पर्श अतिग्रह आहे. आर्तभागानें दुसरा प्रश्न असा केला की, एकंदर संसार मृत्यूचें अन्न आहे, पण मृत्यूला खाणारी एखादी देवता आहे की नाहीं ! अग्नि सर्व भक्षक असून त्याला शान्त करणारें उदक आहेच; ह्याप्रमाणें मृत्यूचा नाश करणारी देवता कोणती ? याज्ञवल्क्यानें उत्तर दिलें कीं, मृत्यूचा नाश करणारी देवता आत्मा हाये. ह्या प्रश्नांत मृत्यूचा मृत्यु आहे असें झटल्यास मृत्यूच्या मृत्यूचाही मृत्यु असला पाहिजे, अशी अनवस्था होऊन याज्ञवल्क्य घोटाळ्यांत पडेल असें आर्तभागास वांटल्यावरून त्यानें मोठा बिकट प्रश्न केला; परंतु सर्व गोष्टींचा विनाशक, व स्वतः अमृत स्वरूप आत्मा आहे, त्याचें ज्ञान झालें असतां विनाश पावणाऱ्या सर्व वस्तु मिथ्या ठरतील, अशा वल्क्यानें उत्तर दिलें. शयानें आर्तभागानें पुनः प्रश्न केला की, हा देह मृत झाल्यावर आत्मा उठून जातो की नाही ? याज्ञवल्क्यानें उत्तर दिलें कीं सर्वव्यापी ज्ञानी आत्मा उठून दुसरीकडे जाण्यास काहींच कारण नाही. त्यावर आर्तभागानें विचारिलें कीं, देह मृत झाल्यावर आत्म्याला सुटत नाहीं तें काय ? याज्ञवल्क्यानें सांगितलें कीं, कांही काळ पर्यंत नाम सुटत नाहीं. नामशेष राहतो. मग आत्मा- नुषंगी देहाची काय व्यवस्था होते ? हे विचारल्यावरून याज्ञवल्क्याने सांगितलें कीं वाणी अग्नीप्रत, प्राण वायूप्रत, डोळे आदित्याप्रत, मन चंद्राप्रत, कान दिशाप्रत, शरीर पृथ्वीप्रत, हृदय आकाशाप्रत, अंगावरील लव औषधीप्रत, केस वनस्पतीप्रत, रक्त व रेत उदकाप्रत जातात; आणि कर्मानुषंगी आत्मा पुण्यकर्मानें पुण्यरूप, व पापकर्मानें पापरूप होतो. ब्राह्मण ३, . नंतर लाह्यायनि भुज्यूनें याज्ञवल्क्याशी वाद केला. त्यांत अश्वमेधयाजी परिक्षित (अन्तरिक्ष गोलाच्या पलीकडे असणारे) कोठें जातात ? ह्या प्रश्नावरून सूर्याच्या रथाच्या