पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अ उपोद्धात. अध्वर्यु ऋत्विज्, व अध्वर्यूच्या नात्यानें आपले डोळे व डोळ्यांचा अधिपति आदित्य, हीं तिन्हीं एकच आहेत, व अध्वर्यु, डोळा, व आदित्य आपणच आहोत अशी दृष्टि ठेविली असतां जी मुक्ति प्राप्त होते, तीच अतिमुक्ति. ह्या उत्तराचा भावार्थ पूर्वी प्रमाणेंच भाष्यकारांनी दाखविला आहे. अश्वलानें तिसरा प्रश्न असा केला कीं, ( २ ) चालू मानानें तिथि व शुक्ल कृष्ण पक्ष येतात, तत्स्वरूपी काल मृत्यूच होय. त्यांतून मुक्ति कशी होईल ? याज्ञवल्क्यानें उत्तर दिलें की, उद्गाता ऋत्विज्, प्राण वायु, व वायुदेवता आपणच आहों, असे मानलें असतां मुक्ति क अतिमुक्ति प्राप्त होते. अश्वलानें चौथा प्रश्न असा केला की, स्वर्ग प्राप्ति होते, त्या स्वर्गावर चढण्यास निराधार अन्तरिक्षामध्यें निश्चित मार्ग दिसत नाहीं. मार्ग असल्यास तो कोणता ? याज्ञवल्क्यानें उत्तर दिलें, ब्रह्माऋत्विज्, मन, आणि चन्द्र एतद्रूप आपण आहों, असें मानिलें ह्मणजे त्या दृष्टीच्या- द्वारें स्वर्गावर चढतां येतें. सदरीं मुक्तीचे मार्ग सांगितले; पण इहलोकीं यज्ञादिक कर्मे करतांना याज्ञिकांच्या कांहीं समजुती असतात, ह्या समजुतींना संपत्ति ( संपादणुकी) ह्मणतात. त्यासंबंधानें अश्वलानें चार प्रश्न केले. पहिला प्रश्न – होता ऋत्विज कांही विशिष्ट ऋचा ह्मणत असतो, त्या ऋचा कोणत्या ? व त्या ऋचा झटल्यापासून काय मिळतें, ह्मणून समजत असते ? याज्ञवल्क्यानें उत्तर दिलें की, होता पुरोनुवाक्या नांवाचा ऋक्समुदाय, याज्या नावाचा ऋक्समुदाय, व शस्या नांवाचा ऋक्समुदाय ह्मणत असतो; व ह्या ऋचा झटल्यानें त्रैलोक्य आपल्या स्वाधीन राहील असें मानीत असतो. प्रश्न दुसरा - अध्वर्यु कांहीं विशिष्ट आहुति देत असतो, त्या कोणत्या ? व त्या आहुति दिल्यापासून त्यास काय प्राप्त होतें ज्ञवल्क्यानें उत्तर दिलें कीं, लखलखीत जळणाऱ्या आहुति आहेत, कांही आवाज करणाऱ्या आहुति आहेत, व तळाशीं जाणाऱ्या कांहीं आहेत, पैकी दीप्तिमान् आहुति दिल्यापासून देवलोक प्राप्त होतो; दुःखसूचक आवाज करणाऱ्या आहुतीपासून पितृलोक प्राप्त होतो, व तळाशी जाणाऱ्या आहुति दिल्यापासून पृथ्वीलोक प्राप्त होतो असें अध्वर्यु समजतो. तिसरा प्रश्न – यज्ञाच्या दक्षिण भागी बसणारा ब्रह्माऋत्विज कोणत्या देवतेचें आव्हान करून यज्ञ रक्षण करितो ? याज्ञवल्क्यानें उत्तर दिलें, तो अनंत मनोदेवतेचें ध्यान करून अनंत विश्वेदेवांचा लोक मिळेल असें समजतो. चौथा प्रश्न – उद्गाता ऋत्विज् कोणत्या ऋचा ह्मणतो ? आणि त्यापासून त्यास काय प्राप्त होतें ? त्यास याज्ञवल्क्यानें उत्तर दिलें कीं, तोही सामवेदाच्या छंदानें पुरोनुवाक्या नांवाचा ऋक्समुदाय, याज्या नांवाचा ऋक्समुदाय, व शस्या नांवाचा ऋक्समुदाय ह्मणतो, व त्या ऋचा झटल्यापासून प्राण, अपान, व्यान वायूंचा निरोध होऊन स्वर्ग प्राप्त होतो.