पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. १-२.] अन्तर्यामी. < तो' गंधर्व ' काप्य पतंचलाला आणि आह्मां याज्ञिकांस' त्याच्या शिष्यांस ' ह्मणाला '- - अरे काप्या, तें सूत्र तूं जाणतोस काय ? तें कोणतें ? ज्या सूत्रानें हा लोक ह्मणजे हा जन्म, व परलोक जे अन्य जन्म, पुढे मिळवावयाचा तो, व ब्रह्मापासून तृणापर्यंत सर्व भूतें बांधलेली, ह्मणजे एक ठिकाणी दोयनें माळ गुंफलेली असते त्याप्रमाणें, गुंफलेली ( ह्मणून ) स्थिर राहणारीं आहेत, तें सूत्र तूं जाणतोस काय ? हा प्रश्न केल्यावरून त्या काप्यानें उत्तर दिलें कीं, 'हे मान्य पुरुषा, ' मी तें' सूत्र 'जाणत नाहीं. पूज्य पुरुषा, असें मोठ्या आदरानें ह्मटलें. , मग तो गन्धर्व काप्य गुरूला व आह्मांस ह्मणाला, अरे काप्या, तूं तो अन्तर्यामी जाणतोस काय ? अन्तर्यामी (शब्दाचा) विशेष खुलासा असा केला कीं, जो ह्या लोकास व परलोकास व सर्व भूतांस आंत राहून नियंत्रण करितो तो; लांकडी यंत्राप्रमाणें फिरवितो तो; व ज्याचा त्याजकडून आपआपला योग्य व्यापार करवितो तो; याप्रमाणें प्रश्न केला, तेव्हां काप्य पतंचल परमादरानें महाराज, असें ह्मणून, मला ठाऊक नाहीं असें ह्मणाला. त्यानंतर गन्धर्वानें भाषण केलें ( तें ), सूत्र व तदंतर्गत अन्तर्यामी यांच्या ज्ञानाच्या स्तुतीदाखल आहे. जो कोणी, हे काप्या, तें सूत्र जाणील व सूत्रार्न्तगत त्या करणारा अन्तर्यामी आहे त्यास जाणील, तशा प्रकारानें जो (कोणी ) जाणील- तो ब्रह्मज्ञानी ह्मणजे परमात्मज्ञानी. तो पृथिवी आदिकरून (जे ) लोक अन्तर्यामीनें नियंत्रित केले आहेत, त्यांस जाणतो; तो देवांस ह्मणजे त्या त्या लोकांत राहणारे अग्न्यादिक देवांस जाणतो; सर्वास प्रमाणभूत जे वेद ते जाणतो; ब्रह्मादिक भूतें सूत्रानें घरलेली आहेत; व सूत्रान्तर्गत अन्तर्यामी नियंत्रित झाली आहेत, ती जाणतो; तो कर्तृत्वभोक्तृत्वगुणयुक्त आत्म्याला त्याच अंतर्यामी आत्म्यानें नियंत्रित केले आहे, असें जाणतो; सर्व जग तसेंच नियंत्रित झालेले आहे, असें जाणतो. ह्याप्रमाणें स्तविलेल्या सूत्र व अन्तर्यामी यांच्या ज्ञानाविषयीं अत्यंत लोभ उत्पन्न होऊन काप्य व आह्मीं त्या गंन्धर्वाच्या समोर बसलों; तेव्हां गन्धर्वानें सूत्र व अन्तर्यामी ( ह्यांचें स्वरूप ) आह्मांस सांगितलें तें सूत्र आणि अन्तर्यामी यांचें ज्ञान गंन्धर्वाच्या सांग- ण्यावरून मला झालें आहे. याज्ञवल्क्या, तें सूत्र व तो अन्तर्यामी तूं जाणत नसलास तर, व ब्रह्मवेत्ता नसून ब्रह्मवेत्त्या- करितां ठेवलेल्या गायी अन्यायानें नेत असलास तर, त्या अन्यायाकरितां माझ्या शापानें तुझें भस्म होऊन, तुझें मस्तक देखत देखत खाली पडेल. असें बोलल्यावरून याज्ञवल्क्य उत्तर देतो कीं, हे गौतमगोत्रोप्तन्ना, जें गन्धर्वानें तुझांस सांगितलें तें सूत्र, आणि ज्या अंतर्यामी पुरुषाचें ज्ञान गन्धर्वापासून तुझांस झालें तो अंतर्यामी, मी जाणतों. असें हाटल्यावर गौतमानें प्रत्युत्तर केलें कीं, आत्मश्लाघा करणारा कोणीही अज्ञानी मनुष्य तूं ह्मटल्याप्रमाणें ह्मणेल; कसें भी जाणतों, जाणतों. ती बडबड ऐकून काय करावयाचें ? ( कृतीनें ) दाखीव. तुला जसें ठाऊक असेल तसें बोलून दाखीव. तर, ऋचा २ – त्यानें उत्तर दिलें, गौतमा, वायूच तें सूत्र होय. गौतमा, वायुरूप सूत्रानेंच हा लोक, परलोक, व सर्व भूतें संग्रथित आहेत. त्या करितांच गौतमा, ( वायु