पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उद्दालक ब्राह्मण. अन्तर्यामी. अध्याय ३, ब्राह्मण ७. ऋचा १ - त्यानंतर त्याला आरुणी उद्दालकानें प्रश्न केला. हे याज्ञवल्क्या, अशी हाक मारून ह्मणाला. आम्ही मद्रदेशांत कपिगोत्री पतञ्चलऋषीच्या घरीं यज्ञ (विधीचें) अध्ययन करून रहात होतो. त्या ऋषीची बायको गन्धर्वानें झडपलेली होती. त्या गन्ध- वाला आम्हीं प्रश्न केला कीं, तूं कोण आहेस ? तो म्हणाला मी अथर्वणाचा पुत्र कबंध आहे. तो काप्य पतञ्चलाला व आम्हा याज्ञिकांस ह्मणाला, काप्या, ज्या सूत्रानें हा लोक व परलोक आणि सर्व भूतें बांधलेली आहेत, तें सूत्र तूं जाणतोस काय ? काप्य पतञ्च- लानें उत्तर दिलें, हे मान्य पुरुषा, मी तें जाणत नाहीं. त्यानें काप्य पतञ्चलाला व याज्ञि- कांना भाषण केलें कीं, अरे, काप्या, तूं जो अन्तर्यामी पुरुष ह्या लोकांचे व परलोकांचे व सर्वभूतांचे आंत राहून नियंत्रण करितो, त्याला जाणतोस काय ? काप्य पतञ्चलानें उत्तर दिले, हे मान्य पुरुषा, मी त्याला जाणत नाहीं. त्यानें काप्य पतञ्चलाला व आह्मां याज्ञिकांना ( पुनः ) असें ह्मटलें कीं, हे काप्या, जो कोणी तें सूत्र व तो अन्तर्यामी जाणील तो ब्रह्मवेत्ता, लोकवेत्ता, देवज्ञानी, वेदज्ञ, तो भूतज्ञ, आत्मज्ञानी तो सर्वज्ञ असे त्यांना (गन्धर्वानें ) सांगितलें, तें (सूत्र वगैरे) मी जाणतों. याज्ञवल्क्या, तूं ते सूत्र जा- प्रणत नसल्यास व तो अन्तर्यामी जाणत नसतां ब्राह्मणांच्या गायी नेत असलास, तर तुझा मस्तक पडेल. याज्ञव उत्तर दिलें, गौतमा, मी तें सूत्र व तो अन्तर्यामी खचित जा णत आहे. (गौतम ह्मणतो) हें मी जाणतों जाणतों असें कोणीही ह्मणेल ? जसें जाणत असशील, तसे सांग. भाष्य – आतां ब्रह्मलोकांच्या अगदी आंत असणारें सूत्र सांगावयाचें आहे; त्याकरितां ( पुढील ग्रंथाचा ) आरंभ आहे. तें श्रुतिरूपानेंच विचारावयाचें ह्मणून इतिहासरूपानें श्रुतीचा आरंभ केला आहे. 'त्यानंतर त्याला' अरुणाचा पुत्र ' आरुणी उहाल्लक' नांवाच्या (ऋषीनें) प्रश्न केला. याज्ञवल्क्या, अशी हांक मारून ह्मणाला, मद्रदेशामध्ये आह्मीं रहात होतों. कपि- गोत्री पतञ्चल नांवाच्या ऋषीच्या घरी यज्ञशास्त्र अध्ययन करीत होतों. 'त्या ऋषीची बायको गन्धर्वानें झडपलेली होती.' ( तिच्या अंगांत येणाऱ्या ) त्या गन्धर्वाला आह्मीं प्रश्न केला की, तूं कोण आहेस ? तो ह्मणाला मी अथर्वणाचा पुत्र आथर्वण कबन्ध नांवाचा आहे. १- मद्रास व त्या इलाख्यांतील कांही भागाला मद्रदेश ह्मणत असत.