पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. १ ] अक्षर. ४७ व याज्ञवल्क्याचे सांगणें ) अनुमान ( वाक्य ) मांडावें तसें आहे. जें कांहीं ( जगामध्ये ) कार्यरूप परिछिन्न (मर्यादित), स्थूल असतें तें ( क्रमानें ) कारणरूप, अपरिच्छिन्न (अमर्यादित), सूक्ष्म पदार्थ यांनी व्याप्त असतें, असें पाहिले आहे; उदाहरण पृथिवी उदकानें व्याप्त आहे. याप्रमाणे ( वरील ब्राह्मणांतील ) पूर्व पूर्व वस्तु पुढच्या पुढच्या व्यापक वस्तूनें (व्याप्त) असली पाहिजे. हा ( सिद्धांत ) सर्वान्तर आत्म्यापर्यंत लागूं आहे असा (गार्गीच्या) प्रश्नाचा अर्थ आहे. 66 त्यांत ( असा अर्थ घेतला ह्मणजे ) पंचमहाभूतेंच पुढील पुढील ( गंधर्व लोकादिक ) सूक्ष्म, व्यापक, व कारणरूपानें व्याप्त होऊन एकत्र असतात, ( हें सहज ध्यानांत येईल ). आणि परमात्म्याच्या अलीकडे परमात्मव्यतिरिक्त इतर वस्तु असते असें नाहीं; कां तर स- त्याचें सत्य (तो आहे)” अशी श्रुति आहे. भूतपंचक हें सत्य; त्या सत्याचें सत्य परमात्मा आहे. 'उदक कोणत्या वस्तूंमध्यें गोंवलेले आहे ? ' उदक हें कार्यरूप स्थूल व परिच्छिन्न (मर्या- दित ) असल्यामुळे कोठें तरी गोंवलेले असले पाहिजे, तें कोठें गोंवलेले आहे. याप्रमाणेंच पुढील पुढील प्रश्नांचें उपपादन करावें. 'हे गार्गी, वायूमध्यें' हें काय ? अग्नींत ( गोविलें ) आहे असें ह्मणावयाला पाहिजे होतें. पण ह्यांत दोष नाहीं; कांतर, अग्नीला पार्थिव किंवा उदकमय धातूमध्यें ( साकार पदार्थामध्यें ) आश्रय करून रहावें लागतें; इतर भूतांप्रमाणं अग्नि स्वतं- त्रपणें विद्यमान नसतो; ह्मणून त्यांत कांहीं गोंविलें आहे, असे सांगितलें नाहीं. , 'वायु कशांत गोंवलेला आहे ? गार्गी, अंतरिक्षलोकांत. पंचमहाभूतें एकत्र होऊन अंत- रिक्षलोक झाले. तींच भूतें गंधर्वलोकांत; गंधर्वलोक, आदित्यलोकांत; आदित्यलोक चंद्रलोकांत; चंद्रलोक नक्षत्रलोकांत; नक्षत्रलोक देवलोकांत; देवलोक इंद्रलोकांत; इंद्रलोक विराट्शरीराला कारण जीं भूतें तद्रूप प्रजापतिलोक त्यांत ; प्रजापतिलोक, ब्रह्मलोकांत; ब्रह्मलोक ह्मणजे ब्रह्मां- डाला आरंभ करणारी ( सूक्ष्म ) भूतें सर्व ठिकाणी एकापेक्षांएक अधिक सूक्ष्म अशा क्रमानें प्राण्यांच्या उपभोगाला आश्रयरूप झालेली (महा) भूतेंच एकत्र झाली आहेत. आणि तींच पांच आहेत ह्मणून प्रत्येक लोकाचें बहुवचन घेऊन वर्णिली आहेत. ब्रह्मलोक कशांत गोंवलेले आहेत ? याज्ञवल्क्य ह्मणाला, हे गार्गी, जास्ती विचारूं नकोस. न्यायसरणीच्या पलीकडे जाऊन ज्या देवतेविषयी ( केवळ ) श्रुतिप्रमाण विचारावयाचें, त्या देवतेविषयीं अनुमानपद्धतीने विचारूं नकोस, असा ( याज्ञवल्क्याचा ) अभिप्राय समजावा. ( तूं ही गोष्ट अशा रीतीनें ) विचारशील तर तुझा मस्तक प्रत्यक्ष पडेल. गार्गीनें देवते- विषयी प्रश्न केला तो श्रुतीनेंच कळणारा आहे. ( गार्गीच्या) प्रश्नसरणीपलीकडचा तो गार्गीचा प्रश्न होय. कांतर, त्याला आनुमानिक स्वरूप दिलें. (शेवटला ) तो प्रश्न ज्या देवतेच्या संबं- धानें होता ती देवता, अतिप्रश्न्या ( जास्ती प्रश्नाला योग्य ) नव्हे, अनतिप्रश्न्या ( ह्मणजे अनुमानानें प्रश्न करण्यास योग्य नव्हे); श्रुतीनेंच प्रश्न करण्याजोगी; केवळ श्रुतीनेंच समज- ण्याजोगी होय-असा अभिप्राय समजावा. त्या अनतिप्रश्न्य देवतेबद्दल तूं अतिप्रश्न करतेस, ह्या करितां हे गार्गी, तुला मरण्याची इच्छा नसेल तर असा अतिप्रश्न करूं नकोस, असें ह्मटल्यावरून वाचक्नवी गार्गी स्तव्ध झाली. अध्याय ३ ब्राह्मण ६ समाप्त. १ – आपला लोक पंचमहाभूतात्मक आहे. गंधर्वादिलोक पञ्चमहाभूतांहून भिन्न आहेत, असा अल्पशांस भास होतो तो खोटा आहे. २--‘ सत्यस्य सत्यं ' बृह.२-१-२० मैत्री. ६-३२.