पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गार्गी ब्राह्मण. अक्षर (क्षय न पावणारें तत्व ) अध्याय ३, ब्राह्मण ६. 110000 ऋचा १. ( याज्ञवल्क्याला ) वाचकवी गार्गीने प्रश्न केला. हे याज्ञ- चल्क्या, अशी हाक मारून म्हणाली. जें सर्व उदकामध्यें ( आडवें उभें) ऑवलेले व भरलेलें आहे, (तें ) काय ? पण उदक कोणत्या वस्तूमध्यें (आडवें उभें) गोंवलेले आहे ? हे गार्गी, वायूमध्यें. वायु कशांत (आडवा उभा) गोंवलेला आहे ? गार्गी, अंतरिक्षलो- कांत. अन्तरिक्ष लोक कशांत गोंवले आहेत ? गार्गी, गन्धर्वलोकांत. गन्धर्वलोक कशांत गोंवलेले आहेत ? गार्गी, आदित्यलोकांमध्यें. आदित्यलोक कशांत गोंवलेले आहेत ? गागी, चंद्रलोकांमध्यें. चंद्रलोक कशांमध्ये गोंवलेले आहेत ? गार्गी, नक्षत्रलोकांत. नक्षत्र लोक कशांत गोंवलेले आहेत ? गार्गी, देवलोकांत. देवलोक कशांमध्ये मोवलेले आहेत ? गार्गी, इंद्रलोकांत. इंद्रलोक कशांत गोंवलेले आहेत ? गार्गी, प्रजापतिलोकांत. प्रजापतिलोक कशांत गोंवलेले आहेत ? गागीं, ब्रह्मलोकांत. ब्रह्मलोक कशांत गोंवलेले आहेत ? याज्ञव- ल्क्य ह्मणाला, हे गार्गी, जास्ती विचारूं नकोस. तुझा मस्तक तुटून न पडो. ज्या देवते- विषयीं जास्ती प्रश्न विचारूं नये, त्या देवतेविषयीं जास्ती विचारतेस. गार्गी जास्ती प्रश्न करूं नकोस. मग गागी वाचक्रवी स्तब्ध झाली. १ - मग त्या भाष्य – तें ब्रह्म प्रत्यक्ष व समक्ष असून सर्वातर आत्मा होय, असें सांगितलें, त्या सर्वा- न्तर आत्म्याच्या स्वरूपज्ञानाकरितां शाकल्यब्राह्मणापर्यंत ग्रंथ आहे. पृथिवी आदिकरून आकाशा- पर्यंत भूतें आहेत तीं आंतलें बाहेरचें ह्या स्वरूपानें ठेविलेली आहेत, त्यांपैकी बाहेरचें बाहेरचें जाणून, तें दूर करून पाहणाराचा प्रत्यक्ष सर्वान्तर मुख्य आत्मा सर्व संसारधर्मीपासून पूर्ण मुक्त झालेला दाखवावयाचा आहे, ह्मणून ( या ब्राह्मणाचा ) आरंभ केला आहे. " मग त्या ( याज्ञवल्क्या ) ला गार्गी नांवाची वचक्क्रूची कन्या इनें प्रश्न केला. 'याज्ञवल्क्या," अशी हाक मारून बोलली. हें जडधातुरूप सर्व पृथिवीमय ( जगत् ) उदकामध्यें 'ओत ' झणजे कापडाच्या लांब ( उभ्या ) दोन्याप्रमाणें ओवलेलें, आणि 'प्रोत " ह्मणजे आडव्या दोयाप्रमाणें भरलेलें आहे; किंवा ( त्या शब्दांचा ) ह्याच्या उलट (अर्थ घ्यावा ). चोहोंकडून आंतबाहेर असलेल्या उदकांनी व्याप्त केलेले आहे. असा ( ओतप्रोत यांचा ) अर्थ समजावा. असें नसतें तर सातूच्या (मूठभर ) पिठाप्रमाणें उधळून गेलें असतें. हें ( गार्गीचें विचारणें १ – गार्गीब्राह्मण, उद्दालक ब्राह्मण, व दुसरें गार्गीब्राह्मण या तीन ब्राह्मणांनंतर शाकल्य ब्राह्मण आहे. गार्गी स्त्री असून तिची मोठ्या आचार्यात गणती होत आहे.