पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. १ ] सर्वोतरज्ञानानें एषणात्याग. ४५ मौनाभाव ह्मणजे आत्मज्ञानोदय व अनात्मज्ञानाचा लोप यांनाच पांडित्य व बाल्य अशी अनुक्रमानें नांवें आहेत. तो मौनाभाव पूर्णपणे संपादन करून — व मौन ह्मणजे अनात्मज्ञा- नाचा पूर्ण लोप करण्याचे फळ तें मौनही पूर्णपणे जाणून- ब्राह्मण कृतकृत्य होतो. सर्व ब्रह्मच आहे असें ज्ञान होतें. तो ब्राह्मण कृतकृत्य झाला ह्मणून ( खरा ) ब्राह्मण ह्मणावा. त्याला त्या वेळी औपचारिक ब्राह्मण्य असत नाही, ह्मणून ( श्रुति ) ह्मणते की, 'तो ब्राह्मण कसा राहतो, कोणता आचार पाळितो ?' जो आचार ( कोणता तरी आचार ) पाळीत असेल त्या आचारानें तो जसानातसाच, ह्मणजे कोणत्याही आचारानें असला तरी जसानातसाच, ह्मणजे वर सांगितलेल्या लक्षणांनी युक्त असाच ब्राह्मण होतो. कोणत्याही आचारानें असें स्तुतिकरितां झटले आहे. वर जी ब्राह्मण्यावस्था सांगितली, तिची स्तुति केली आहे. आचाराविषयी आदर नाही असें नाहीं. ह्मणून या अशनायादिकांच्या पलीकडे असलेल्या नित्यतृप्त अशा आत्मस्वरूप ब्राह्मण्या वस्थेंहून निराळें जें एषणारूप अविद्याविषय अन्य वस्तु आहे, तें आर्त ह्मणजे विनाशी, आर्तीनी ( पीडांनी ) व्याप्त, स्वप्नांतील किंवा गारुडांतील वस्तूंप्रमाणे किंवा मृगजळाप्रमाणें असार ह्मणजे, मिथ्या आहे. एक शुद्ध आत्मा मात्र नित्यमुक्त आहे, असें ( याज्ञवल्क्यानें झटलें ). नंतर कुषी- तकपुत्र कहोल स्तब्ध राहिला. अध्याय ३, ब्राह्मण ५ समाप्त.