पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहदारण्यकोपनिषद. [ अ. ३ बा. ५ संन्यासासंबंधानें ' यज्ञोपवीत धारण करून स्वाध्याय करावा,' वगैरे जी वचनें सांगि- सली आहेत, ती अविद्वानानें केवळ आश्रमसंन्यास कसा करावयाचा ह्याविषयीं आहेत, असें ( घेतलें ह्मणजे ती वचनें आत्मज्ञानांगभूत संन्यासाविषयीं ) नाहींत. असें न घ्यावें तर आत्मज्ञानाला बाध येईल असे सांगितलें. 66 "" ज्याला कांहीं इच्छा नाहीं, जो कोणताच उद्योग करीत नाहीं, जो नमस्कार करीत नाहीं, स्तुति करीत नाहीं, ज्याचीं कम सुटलीं आहेत, पण जो क्षीण नसतो, देव त्याला ब्राह्मण समजतात, हें स्मृतिवचन विद्वानाला कोणतेंच कर्म नसतें असें दाखवितें. “ विद्वान् चिन्ह- रहित असतो. ” “तो धर्मज्ञ, त्यामुळे खुणारहित असतो.” असेंही आहे. याकरितां (एपणांतून ) उठणें ज्यांत आहे असा परमहंस संन्यास आत्मवेत्त्यानें ध्यावा, ह्मणजे त्यांत सर्व कर्मे व साधनें ह्यांचा परित्याग होतो. ज्या अर्थी पूर्वीचे ब्राह्मण साधनें व फलें ज्याला नाहींत अशा आत्म्याला जाणून सर्व साधनफलरूप एषणारूप ( संसारांतून ) उठून भिक्षावृत्ति धरीत असत, व दृष्टफल देणारी व अदृष्ट फल देणारी कर्मों व त्यांची साधनें टाकून ( देत असत ); त्या अर्थी हल्ली सुद्धां ब्रह्मवेत्त्या ब्राह्मणानें पांडित्य ह्मणजे आत्मज्ञानरूपी पंडितपणा पूर्णपणे जाणून, समग्र आत्मज्ञान संपादन करून, आचार्योपदेश घेऊन, व श्रुतिस्मृतिज्ञानानें एषणांपासून उठून (जावें). एषणेंतून उहून जाईल, तेव्हां पांडित्याचा कळस होतो; कां तर, तें एषणांशी विरुद्ध असल्यामुळें एषणांचा तिरस्कार केल्यापासून उत्पन्न होतें. एषणांचा तिरस्कार न केला तर आत्म्याच्या संबंधानें पांडित्य उत्पन्न होत नाहीं. यावरून एषणांतून उठून जाणें आत्मज्ञानपूर्वक विहित आहे. आत्मज्ञानाचा (व उठण्याचा ) कर्ता एकच हे दाखविणारा 'त्वा' (ऊन ) प्रत्यय घेणाऱ्या श्रुतीवरून ( सर्व एषणांतून उठणें ) निश्चित झालें. करितां एषणांतून उठून बाल्य ह्मणजे ज्ञानाचे बलाचा स्वभाव घेऊन राहण्याची इच्छा करावी. आत्मज्ञानवेत्त्यांहून इतरांना साधनाचा व फलांचा आश्रय करणें हें बल असतें; तें बल टाकून विद्वानानें ज्यांत साधनें नाहींत व फळें नाहींत, असें जें आत्मज्ञानरूप बळ त्याच्या सत्ते- चाच आश्रय करावा. त्या बलसत्तेचा आश्रय केला ह्मणजे त्याला इंद्रियें (आत्मज्ञानांतून काढून एषणाविषयांत घालण्यास समर्थ होत नाहीत. ज्याला ज्ञानबळ नाही अशा मूढालाच ज्यांची फलें कांहीं दृष्ट व कांही अदृष्ट आहेत अशा एषणांमध्यें इंद्रियें घालतात. बल ह्मणजे आत्म- विद्येनें एकंदर विषयावर दृष्टि असते, ती लुप्त करून टाकणें. ह्मणून बलसत्तेनें (बाल्यानें ) राहण्याची इच्छा करावी. अशा अर्थी “आत्म्याच्या योगें बळ प्राप्त होतें" अशी अन्य श्रुति आहे. आणि ' हा आत्मा बलहीनाला मिळत नाही. ' ( अशी श्रुति आहे. ) बाल्य व पांडित्य पूर्णपणें संपादन करून मग मनन केल्यानें मुनि ह्मणजे योगी होतो. आणखी हें जें सर्व अनात्मज्ञान लुप्त करणें तें साधून कृतकृत्य योगी व्हावयाचें असतें तेवढेंच ब्राह्मणानें करावें. १ --" आत्मना विन्दते वीर्यम् " केन १२. २. " नायमात्मा बलहीनेन लभ्य: १७ मुण्ड, ३-२-४.