पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. १ ] सर्वोतरज्ञानाने एषणात्याग. ( एषणांतून) उठून भिक्षावृत्ति धरतात, या वाक्यानें संन्यास सांगितला आहे, व संन्यासाश्रमामध्यें यज्ञोपवीतादि साधनें व चिन्हें श्रुतींनी आणि स्मृतींनीं विधिरूपानें सांगि- तली आहेत, ह्मणून ती एषणारूप असली तरी वगळून इतर एषणांतून उठावें, असें ह्मणालं, तर तसे नाहीं. एकाच कर्त्यानें आत्मज्ञान मिळविणें, व एषणांतून उठून जाणे, ह्या संन्यासाहून निराळा ( आश्रम ) संन्यास असावा, असें ह्मणणे योग्य होईल; कारण, एषणांतून उठून जाण्याचा जो संन्यास, तो आत्मज्ञानांगभूत आहे. तो आत्मज्ञानाला विरुद्ध असलेल्या एपणा टाकण्याच्या स्वरूपाचा आहे, व एषणा अविद्यामय आहेत. ह्या ( आत्मज्ञानांगसंन्यासा ) हून निराळा आश्रम- संन्यास आहेच. ( तो ) ब्रह्मलोकादि फळे प्राप्त करून देण्यास साधणीभूत होतो, आणि त्या संन्यासाच्या संबंधानें यज्ञोपवीतादि साधनें, व ( त्रिदण्डादि ) चिन्हें धारण करणे ( श्रुति: स्मृतींनीं ) सांगितलेलें आहे. एषणारूप साधनांचा स्वीकार निराळ्या आश्रमसंन्यासात संभवत असतां, सर्व उपनि- षदांनी आज्ञापिलेल्या आत्मज्ञानाला बाक आणणें ( हेही ) योग्य नाहीं. अविद्यामय एषणारूप यज्ञोपवीतादि साधनें घेण्याची इच्छा ठेविली असतां, जो साधनरूप नव्हे अशा, व अशनायादि संसारधर्म ज्यांस नाहींत अशा (आत्म्या) चें, मी ब्रह्म आहे, असें जें ज्ञान, त्यास खचित बाध. येईल; आणि त्या आत्मज्ञानाला बाध आणणे योग्य नाहीं; कां तर, सर्व उपनिषदें ( आत्मज्ञान- रूप ) पुरुषार्थपर आहेत. ' भिक्षावृत्ति धरितात ' ही श्रुति ( निदान भिक्षावृत्तीपुरती ) एषणा गळ्यांत बांधिते, त्यावरून स्वतःच बाघ आणते, असें ह्मणाल तर; आणि एषणांतून उठावें असे सांगून पुन्हा एषणे- पैकी एक ( भिक्षावृत्ति हा ) अंश ठेवावा असें सांगणारी श्रुति, त्या ( भिक्षावृत्तीशीं ) संबंध असलेलें दुसरेंही ( यज्ञोपवीतादिक ) घ्या ह्मणतेच, असें ह्मणाल तर, तसें नाहीं. होम केल्या- नंतरचें ( शिलकी पुरोडाशाचें ) ( नवा पुरोडाश तयार करण्याला कारण होत नाहीं, ) त्या प्रमाणें भिक्षावृत्ति यज्ञोपवीतादिकाला कारणीभूत होत नाहीं. तें ( होमशेषभक्षण किंवा भिक्षा- वृत्ति ) उरलेल्याची ( होमद्रव्याची किंवा आयुष्याची ) व्यवस्था लावण्यासाठी आहे; ह्मणून ( यज्ञोपवीतादिकांस ) कारणीभूत होत नाहीं; आणि ( भिक्षावृत्तीपासून कर्त्यावर ) कांहीं संस्कार होत नाहीं. भक्षणापासून पुरुषावर कांहीं संस्कार तरी होईल, पण भिक्षावृत्तीपासून ( कांहींच संस्कार होत नाहीं.) भिक्षावृत्तीच्या नियमापासून त्याचें कांहीं अदृष्ट फल ( पुण्य ) असलें तरी त्या फलाची ब्रह्मवेत्त्याला इच्छा नसते. 1 भिक्षावृत्तीच्या नियमाच्या अदृष्ट फलाची त्याला इच्छा नाहीं तर भिक्षावृत्ति कशाला १. अर्से ह्मणाल तर ( तें ह्मणणें योग्य ) नाहीं; कारण ( अविद्ये पैकी ) दुसऱ्या ( सर्व ) साधना- पासून उठावें, असें सांगितलें आहे. ( भिक्षावृत्तीविषयीं आज्ञा आहे ) ती तरी काय ह्मणून १. असें ह्मणाल तर, त्याशिवाय चालेल तर ठीक आहे. तें आह्मांस कबूल आहे. १ - हा पक्ष शंकराचार्यांच्या मंडळीपैकींच कोणाचा तरी आहे. २ – आत्मज्ञानाने सर्व गोष्टींची निवृत्ति होते, भिक्षा मागण्याचेंहि कारण नाहीं, हे आह्मास कबूल आहे; असें ह्मणण्याचा आचार्याचा अभिप्राय आहे.