पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहदारण्यकोपनिषद.. साधन ही अनायादिक संसारधर्मापलीकडे असणाऱ्या आत्म्याहून भिन्न आहेत, ( असें सिद्ध होतें ). 'जेव्हां द्वैत भासतें, ' ‘ तो निराळा व मी , ( ह्मणतो ) ' तो जाणत नाहीं, 'श्रुतीवरून ( ही साधनफलानां अविद्याविषयत्व आहे. ) [ अ. ३. ब्रा. ५ असून अविद्येपैकी निराळा आहे, , 6 'पण याहून भिन्न रीतीनें जे जाणतात' अशा शेकडों विद्या व अविद्या (ज्ञान व अज्ञान) एका पुरुषाला एके वेळी असत नाहीत; कां तर, त्यांचा अंधार आणि प्रकाश ह्यांप्रमाणें ( परस्पर) विरोध आहे; ह्मणून अविद्येपैकी क्रिया, साधनें, व फलें वगैरेंचा आत्मज्ञान्याला अधिकार नाही, असे समजावें, कर्मे करणारा " तो मृत्युंतून मृत्यप्रत जातो ” इत्यादि श्रुतींनी ( कर्माची ) निंदा केली आहे. सर्व क्रिया, साधनें, व फलें ही अद्येपैकी आहेत. त्यांशीं आत्मविद्येचा विरोध असल्यानें तो टाकणें इष्ट आहे. यज्ञोपवीतादिक साधनेंही अविद्येपैकींच आहेत; ह्मणून साधनफलरूप आत्मा नसल्यानें अविद्ये- पैकी ( आत्म्याहून) भिन्न असलेल्या एषणा त्यास विरुद्ध आहेत. साधनें व फलें ही दोन्हीं एषणारूपच आहेत. यज्ञोपवीतादिक व त्यांनीं साधणारी कर्में हीं ( फलांची ) साधनेंच आहेत. ‘( साधनें व फलें ) ही दोन्हीं एषणारूपच आहेत' या हेतुदर्शक वाक्यावरून हाच निश्चय होतो कीं, यज्ञोपवीतादि साधनें व तत्साध्य कर्में अविद्याविषय असल्यानें, एषणारूप असल्यानें, .आणि ह्मणून टाकून देण्याजोगी असल्याने, त्यांपासून उठण्याचा विधि सांगणें इष्टच आहे. ( हैं ) उपनिषद्, आत्मज्ञानाविषयीं उठून जाण्याबद्दलची श्रुति, (आत्मज्ञानाच्या) स्तुती •ऐवजी घ्यावी, आज्ञार्थी घेऊं नये, ( असें ह्मणतां येत ) नाहीं. कारण विज्ञानविधि व व्युत्था- नविधि एकाच कर्त्याला सांगितला आहे. जी गोष्ट करावयाची नाहीं ती, व जी गोष्ट कराव- याची ती, ह्या दोहोंचा कर्ता एक असें वेदांमध्ये कधींही असण्याचा संभव नाहीं. सोमरस काढणें, होम करणें, खाणें, ह्रीं कर्तव्ये सांगतांना जसें 'सोमाचा रस काढून होम करून खातात' असें वाक्य वेदांत येतें, त्याप्रमाणेच आत्मज्ञान, एषणांतून उठून जाणें, भिक्षावृत्ति अवलंब्रिणें, या कर्तव्यांचाच श्रुतिमध्यें एक कर्ता संभवेल. ( यज्ञोपवीतादिक ) अविद्येपैकी आहेत, व एषणारूप आहेत, आणि आत्मज्ञान विहित आहे; त्यावरून यज्ञोपवीतादिकांचा त्याग अर्थप्राप्त होतो, पण विहित नाहीं, असें ह्मणाल तर तसें नाहीं; का तर, यज्ञोपवीतादिकाचा त्याग आत्मज्ञान विधीबरोबरच एका कर्त्याला सांगि- तलेला आहे, त्यामुळे ( यज्ञोपवीतादित्यागांचें ) चांगले दृढीकरण होतें. तसेंच भिक्षाचर्याचेंही दृढीकरण होतें. ( भिक्षावृत्ति धरितात असें ) वर्तमानकाळी क्रियापद घातल्यानें तो फक्त अर्थवाद ( स्तुति) आहे, असें जें तुझीं ह्मटलें, तें योग्य नाहीं. उंबराच्या झाडाचा ग्रूप ( यज्ञस्तंभ ) असतो वगैरे विधीप्रमाणेंच हाही विधि असल्यामुळे येथें वर्तमानकाळ घातला आहे, तो दोष नाहीं. 'मृत्योः १ –' यत्र हि द्वैतमिव भवति.' २-४-१४ २ – ' अथ येऽन्यथाऽतो विदुः ३. – " स मृत्युमाप्नोति " वृ. ४-४-१९.