पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर्वोतरज्ञानानें एषणात्याग. " पूर्वपक्ष- ( कर्मातून वगैरे ) उठून भिक्षावृत्ति पाळितात, असें वर्तमानकालवाचक क्रि यापद घातल्यामुळे वरील श्रुति अर्थवादरूप आहे. लिङ् (विधिवाचक), लोट् (आज्ञावाचक), किंवा तव्य (आवें-रीतिवाचक ) यांपैकी कोणताही विधान करणारा प्रत्यय ( क्रियापदांत ) नाहीं; ह्मणून केवळ अर्धवादरूप श्रुतीनें श्रुतिस्मृतिविहित यज्ञोपवीतादि साधनें टाकविणे शक्य नाहीं. 'यज्ञोपवीत असेल त्यानेंच अध्ययन, यजन किंवा याजन करावें' (अशी आज्ञा आहे.) सं- 'न्यासाश्रमामध्ये तर अध्ययन विहित आहे. 'वेद टाकून दिला तर शूद्र होतो ह्मणून वेद टाकूं नये,' असें ( वचन आहे, ) आणि वाणींना 'वेदाध्ययनांतच लावतो,' असें आपस्तम्ब (ऋषि) ह्मणतो. " वेदत्याग, वेदनिंदा, खोटी साक्ष, मित्रहत्या, निंद्यान्नभक्षण, निंद्यपान हीं सहा सुरा- पानाप्रमाणे आहेत, " असा वेदत्यागाचा दोष सांगितला आहे. गुरूंची, वृद्धांची, किंवा अति- थींची उपासना करितांना, होम, जप, जेवण, आचमन, आणि वेदाध्ययन हीं करितांना, यज्ञो- पवीतयुक्त असावें, असें ( वचन आहे; ) व संन्याश्याच्या धर्मात गुरूपासना, वेदाध्ययन, जेवण, आचमन वगैरे कर्मों श्रुतिस्मृतीत कर्तव्यरूपानें विहित आहेत; ह्मणून गुरूपासनावगै- 'रचें अंग ह्मणून यज्ञोपवीत आवश्यक आहे; ह्मणून त्याचा त्याग मनांत सुद्धां आणणे शक्य नाहीं. जरी एषणांपासून उठावें, अशी आज्ञा आहे; तरी पुत्रैषणा वगैरे तीनच एषणांपासून 'उठणें ( सांगितले आहे ); पण सर्व कर्मातून आणि कर्मसाधनांतून उठून जाणें ( सांगितलें ) नाहीं. सर्वांचा परित्याग केला, तर जें श्रुति सांगत नाहीं, तें केल्यासारखें होईल; आणि यज्ञो- पवीतादिक श्रुतीत सांगितलें आहे, तें टाकल्यासारखें होईल; तसें केल्याने विहित कर्म न करणें, व प्रतिषिद्ध कर्म करणें, हा मोठा अपराध केलासा होईल; ह्मणून यज्ञोपवीतादिक चिन्हें • टाकणें, ही केवळ अंधपरंपराच आहे. उत्तरपक्ष – (हें ह्मणणे बरोबर ) नाहीं; कारण, 'यज्ञोपवीत आणि वेद सर्व कांहीं संन्याश्यानें वर्ज करावें, ' अशी श्रुति आहे. शिवाय (ह्या ) सर्व उपनिषदाज्ञा आत्मज्ञान विषयक आहेत. “आत्मा पहावा, ऐकावा, ( व त्याचें ) मनन करावें, " असे सांगण्याचा मुख्यत्वें आरंभ आहे; आणि तो आत्मा प्रत्यक्ष, समक्ष, सर्वांतर, व अशनायादिक संसारधर्मीपासून निराळा आहे, असा जाणावा, हें तर प्रसिद्ध आहे. हें एकंदर उपनिषद अशा अर्थाचें असल्या- मुळे, तें अन्य विधीचें अंग नाहीं, ह्मणून तें अर्थवादरूप नाहीं; कारण आत्मज्ञान कर्तव्य आहे, आणि आत्मा अशनायादिकांनी युक्त नव्हे ह्मणून साधनें व फलें ह्यांहून भिन्न आहे, असें जाणावें. ह्मणून ( कर्मे, साधनें, व फलें ह्यांशी ) आत्मा एकरूप आहे असे समजणें, ही अविद्या होय. 'तो निराळा व मी निराळा आहें, ' ' तो जाणत नाहीं, ' ' ( एका ) मृत्यूंतून ( दुसऱ्या ) मुल्यूंत प्राप्त होतो,' जो इहलोकी वस्तु पृथक् पृथक् असल्याप्रमाणे पाहतो,' 'एक- रूपानेंच पहावें, ' एकच अद्वितीय,' ‘तें तूं आहेस,' इत्यादिश्रुतींवरून क्रिया, फल, आणि 6 १--' यज्ञोपवीतं वेदांश्च सर्व तद्वर्जयेद्यतिः' कठश्रुति ४. २ --' अन्योऽसौ अन्योऽहमस्मीति ? ‘ न स वेद' १-४-१० ३––‘मृत्योः स मृत्युमाप्नोति.' ४-४-१९ ४ - ‘य इह नानेव पश्यति.' ४-४-१९. ५--‘ एकधैवानुद्रष्टव्यम्, ' ४-४-२० ६ –' एकमेवाद्वितीयं. छां. १ ६--२-१ ७ –' तत्वमसि. छां. १ ६-८-७; ६-९-४; ६-१०-३. वगैरे, ,