पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहदारण्यकोपनिषद. [ अ. ३ ग्रा. ५. दैववित्तांतून उठणें होतच नाही, असें कांहीं ह्मणतात; कारण, दैववित्ताचें बल घेऊनच उठणें होतें. पण हें (ह्मणणें ) खरें नव्हे; कारण, दैववित्त झाले तरी त्याचा एषणेमध्ये संग्रह आहे. “ येथपर्यत कामचं आहे" असें श्रुतीनें झटलें आहे हिरण्यगर्भ वगैरे देवतांविषयीं वर्णन करणारी विद्या वित्तच झटली जाते; कारण ते विद्यारूप वित्त देवलोकप्राप्तीला कारण होतें. निरुपाधिक उत्तम ज्ञानस्वरूप ( परमात्मा ) वर्णन करणारी ब्रह्मविद्या देवलोकप्राप्तीचें कारण नाहीं. "त्यापा- सूनं तें सर्व उप्तन्न झालें,” “ तो ह्यांचा आत्माच आहे” अशी श्रुति आहे. तिच्या (ब्रह्मविद्येच्या) बलानें उठणें होतें; कारण, ' ह्या त्या आत्म्यालोंच जाणून, ' (एषणांपासन उठतो) असें विशेष रीतीनें येथें ह्मटले आहे, त्यावरून ह्या तिन्ही अनात्म (जड ) लोकप्राप्तीला कारणीभूत एषणा- विषयांतून उठतो. “ येथपर्यंत काम” या श्रुतीवरून एषणा ह्मणजे काम ह्या त्रिविध ब्रह्मबाह्य- लोकप्राप्तीच्या साधनाविषयी कामना न ठेवितां ( उठतो ) हैं तात्पर्य आहे. साधनेच्छा ती सगळी फलेच्छाच होय. ह्मणून श्रुति इच्छा तेथून एकच आहे अशी व्या- ख्या करिते. कशी ह्मणाल तर जी पुत्रैषणा तीच वित्तैषणा. दोन्हीमध्यें दृष्टफलें प्राप्त करून देण्या- चा धर्म सारखाच आहे. जी वित्तैषणा तीच लोकैषणा. फलप्राप्तीकरितांच वितैषणा असते. सर्व लोक फलप्राप्तीकरितां साधनांचा स्वीकार करितात. जी लोकैषणा ती तरी साधनाशिवाय सिद्ध करणे शक्य नाहीं; ह्मणून एषणा तेथून एकच. साध्यसाधनभेदानें ह्या दोन एषणाच आहेत; ह्मणूनच ब्रह्मवेत्त्याला कर्म नाहीं व कर्मसाधनही नाही. ह्मणून जे त्यांतून ( कर्माच्या) पलीकडे गेलेले ब्राह्मण ( आहेत ते ) सर्व कर्मों व कर्मसा- धनें ह्मणजे देव, पितर, मनुष्यें, यांच्या निमित्तानें जी यज्ञोपवीतादि साधनें आहेत, (ती बाळगीत नाहींत. ) यज्ञोपवीत वगैरे घालून दैव, पित्र्य, व मानुष कर्मे करण्यांत येतांत. " मनुष्याच्या कर्मात निवीति ” इत्यादि श्रुति आहे; ह्मणून पूर्वीचे ब्रह्मवेत्ते ब्राह्मण कर्मातून व कर्मसाधनांतून ह्मणजे यज्ञोपवीतादिकांतून उठून, परमहंस परिव्राट (संन्याशी ) होऊन, भिक्षाचार (भिक्षावृत्ति) ह्मणजे भिक्षेकरितां फिरण्याचा नियम पाळून असत. स्मृत्युपदिष्ट चिन्हें केवळ आश्रम घेणाऱ्या लोकांचीं पारित्राज्य ( संन्याशीपणा ) सुचवणारी पोट भरण्याची साधनें टाकून देत असत. विद्वान् नेहमी चिन्हरहित असतो; कारण चिन्हरहित राहून, धर्मज्ञान करून घेऊन, स्पष्ट चिन्हें न बाळगतां किंवा स्पष्ट आचार न दाखवितां राहतो, अशा स्मृति आहेत. "मग संन्याश्यानें बिनरंगी वस्त्रें नेसून, मुंडण करून, परिग्रहरहित असावें " इत्यादि श्रुति आहे. " शेंडी व केस काढून यज्ञोपवीत टाकून देऊन असावें " अशीही श्रुति आहे. २ १ –' एतावान् वै कामः, ' बृ. १-४-१७. ३ –' आत्मा ह्येषां स भवति, ' वृ. १- ४- १०. 'तस्मात्तत्सर्वमभवत्, ' बृ. १-४-१०. ४–बृ. १, ४, १७. ५ - पुत्रैषणा व वित्तैषणा साधनरूप आहेत, आणि लोकैषणा साध्यरूप आहे. संतति व संपत्ति हाच लौकिक कृतार्थतेचीं साधनें आहेत. ६ -' निवीतं मनुष्याणाम् देवांच्या कर्मात डाव्या खांद्यावरून उजवीकडे जानवें करितात, त्याला उपवीति ह्मणतात. मनुष्यांच्या कर्मात गळ्यावरून जानवें लोंबतें ठेवितात त्याला निवीति ह्मणतात. पितरांच्या कर्मात उजव्या खांद्यावरून डावीकडे असतें, न्याला प्राचीनावीति ह्मणतात. ७ —— अथ परित्राड्विवर्णवासा मुण्डोऽपरिग्रहः' जाबाल.